… आणि
स्वातंत्र्य सूर्याचे तेज घेवून तळपलेले वीर
जे फासावर देशासाठी चढले
जे परकीयांच्या गोळीला हि न घाबरले
जे एकतेने देश देव धर्मासाठी लढले
त्या क्रांतिकारकांच्या रक्ताचे थेंब
ह्या मातीच्या काळजात सोडा …
आणि पहा... रे
त्या मातीतून उगवणारी पिढी
हि कोणत्या धर्माची आहे
कोणत्या जातीची आहे
कोणत्या राज्याची आहे
कोणत्या पक्षाची आहे
त्यांची जात , धर्म , राज्य व भाषा
फक्त एकचं असणार
तो म्हणजे …
माझा हिंदुस्थान …
आपलं भारत ...
माझा तिरंगा
मग
ते हि आझादी मागतील
भारतावर वारंवार ज्यांनी आक्रमणे केली त्यांच्या पासून
भारताची अफाट संपत्ती ज्यांनी लुटली त्या लोकांपासून
ज्यांनी मंदिरे व बुद्ध विहार तोडली व लुटली त्यांच्या पासून
ज्यांनी आमच्या संस्कृतीवर घात केला त्यांच्या पासून
हिंसेने धर्मांतर करायला लावले त्यांच्या पासून
राष्ट्रांचे ज्यांनी तुकडे केले त्यांच्या पासून
दंगली ज्यांनी माजवली त्यांच्या पासून
स्वार्थासाठी राजकारण ज्यांनी केले त्यांच्या पासून
देशविरोधी ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्यापासून
देशविरोधी ज्यांनी कारवाई केल्या त्यांच्यापासून
देशात आतंकी हल्ले घडवण्यात
ज्यांनी मदत केली त्यांच्यापासून
आणि हो...
ते आझादी मागतील
अखंड हिंदुराष्ट्रासाठी
भारताच्या हितासाठी
हो ते आझादी मागतील
खोट्या राजकीय नेत्यांपासून
खोट्या राजकीय भाषणापासून
खोट्या सभेपासून
खोट्या गर्दीपासून
स्वार्थासाठी सत्तेसाठी चाललेल्या
ह्या निवडणुकी पासून
त्या बिनबुडाच्या कार्यकर्त्यापासून
त्यांच्या धमक्यापासून
त्यांच्या राजकीय विचारापासून
हो ते आझादी मागतील
लोकशाहीच्या उंबरटयावर बसून
आक्रोश करत
नव्या संघटनाला जन्म देत
नव्या क्रांतीच जाळ विणत
नव्या तरुणांना साद घालत
नव्या भारतासाठी
नव्या लोकशाहीसाठी
सत्यासाठी
जग जिंकण्यासाठी
अधिकार मिळवण्यासाठी
शिक्षणासाठी
असत्या विरोधी चळवळ उभारण्यासाठी
हो ते आझादी मागतील
लेखकांच्या लेखातून
ज्वलंत काव्यातून
हजारो लोकांच्या विचारातून
घरा घरातून
वृत्तपत्रातून संपादकीय शब्दातून
वैचारिक चळवळीतून
ते आझादी मागतील
वंचितांच्या हक्कासाठी
शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी
कामगारांच्या प्रश्नासाठी
ते आझादी मागतील
बलात्काराच्या घटनेतून
गुन्हेगारीच्या जगातून
पैशाच्या काळा बाजारातून
देहाच्या विक्रीतून
हो ... ते आझादी मागतील
अखंड भारतासाठी
सिंधू नदीच्या स्वागतासाठी
गंगेच्या पूजेसाठी
स्वच्छ सुंदर भारतासाठी
भारतात जन्मलेल्या धर्मासाठी
भारताच्या एकतेसाठी
भारतीयांसाठी
हो ते आझादी मागतील
सचिन कृष्णा तळे
कात्रज पुणे
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment