हॉव इज द जोश ...
?
दिवसभर
पक्षाच्या कार्यालयात प्रचाराची तयारी पूर्ण करून रात्री तो उशिरा घरी येतो. कपाटातले
पांढरे खादीचे कपडे बाहेर काढून त्याला कडक इस्त्री करून बुटाला पॉलिश करून न जेवता
तो झोपतो. असं हि त्याला जेवण जाणार नव्हतं कारण उद्या चा उजाडणार दिवस हा त्याच्या
साठी खूप महत्वाचा असतो . तो ज्या पक्षासाठी नेत्यासाठी दिवसरात्र लढायचा आज तोच नेता
त्याच्या भागात गावात येणार होता. शेजारच्या गावात तस सभेचं रणशिंग फुंकेलेल होत. उद्या
साहेंबाना पाहता येणार भेटता येणार त्यांना केलेलं काम दाखवता येणार म्हणून तो खूप
खुश होता. कधी दिवस उजाडेल आणि मी साहेबाना भेटेल असं झालत त्याला. आपल्या सोबत ..
साहेबाना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला त्याने कधी कुठे भेटायचं किती वाजता जमायचं
ह्याचा एक मेसेज टाकला होता. घड्याळातला आलार्म चेक करून पंखा थोडा वाढवून जमीनीवर
चादर हाथरुन शांत पडला. दिवसभर प्रचाराच्या गडबडीत थकल्याने त्याला
कधी झोप लागली ते कळलंच नाही.
सकाळ
होते. आलार्म वाजतो. अंथरून आटपून मनातली उत्सुकता शिगेला पोहचते. तो तयार होतो थोडा
नास्ता करून लगबघिने घरा बाहेर पडतो. गाडीला पक्षाचा झेंडा , डोक्यावर पक्षाची टोपी
सोबत केलेल्या कामाची फाईल कात्रण. ठरलेल्या वेळेत सगळे जमतात. स्वागताची आणि रोड शो
ची पूर्ण तयारी होते. साहेब कुठपर्यंत पोहचले ह्यावर फोना फोनी चालू होते. पहाटेपासून
सगळे कार्यकर्ते साहेबांच्या भेटीला रस्त्यावर उभे असतात. पाण्याची बाटली अन बाजूच्या
टपरीवर वडापाव खाऊन सगळे कार्यकर्ते गावाच्या वेशीवर. जागोजागी स्वागतासाठी छोटे मोठे
जाहिराती आणि तयारी.
घड्याळाचा
काटा सकाळच्या वाटेवरून दुपारच्या वाटेवर चालू लागतो. कार्यकर्त्यांच्या गर्दीत एकच
कुजबुज . आरे साहेब आता इथे आहेत साहेब तिथे आहेत , साहेब अमुक ठिकाणी नास्ता करत होते
म्हणून उशीर झाला , साहेब रस्त्यात अमुक अमुक व्यक्तीच्या बंगल्यावर थांबलेत . असो
ह्या सगळ्या गडबडीत तो मात्र साहेबाच्या गाडीकडे नजर लावून बसलेला असतो. त्या दिवशी
त्याच्या घरात काय चालू आहे हे त्यालाही माहित नसत (जेवढी आपण आपल्या नेत्याची वाट
पाहत भर रस्त्यावर थांबतो तेवढी वाट आपण आपले आई वडील जेव्हा परगावावरून घरी येतात
तेव्हा त्यांना स्टॉप वर घेण्यासाठी हि पाहत नाही). त्याला आतुरता असते ती फक्त साहेबाची.
उन्हाचा पारा ३०-३५ च्या घरात पोहचतो. साहेबाची गाडी आणि त्याचा ताफा येण्यास अजून
तरी वेळ असते. खबरी फोनाफोनी चालू असते. सगळे आपापल्या ग्रुप मध्ये उभे. बाजूच्या ग्रुपचा
एक मुलगा वाट पाहत गर्मीने बेहोश पडतो . थोडी धावपळ चालू होते आणि लांबून साहेबाचा
ताफा दिसतो.
साहेबाचा
ताफा ते भले मोठे ७ ते ८ फुलली एअर कंडिशन
हाईफाई गाडी. त्या पाठोपाठ आजून ५ ते ६ गाड्यांचा ताफा. त्या बेहोश पडलेल्या मुलाला
बाजूच्या टपरीवर पंख्याखाली सोडून साहेबांच्या भेटीला सगळे तुटून पडतात. कोणाच्या हातात
हार कोणाच्या हातात फुलाचा गुच्छा असतो. तर बरेच जण तो क्षण टिपण्यासाठी मोबाईल चा
कॅमेरा ऑन करून ठेवतात. साहेब तिथून थेट सरकारी विश्रांत गृह जाईपर्यन्त बाईक रॅली
आयोजीत होती. गावाच्या वेशीवर साहेबाची गाडी येऊन उभी राहते. पाठच्या गाडीतून साहेबाचे
बॉडीगार्ड बाहेर पडतात आणि त्या गाडीला कव्हर करतात. ( जस चित्रपटात दाखवतात सेम टू
सेम तस चालू असत) तो पाहत असतो. गाडीचा दरवाजा उघडतो. गाडीतली एअर कंडिशन हवा घेऊन
बाहेर उन्हाच्या झळामध्ये साहेब स्वागत स्वीकारत होते. कोणाची घोषणा , कोणी फोटो तर
कोणाची धावपळ चालू असते भेटीला. तो हि भेटीसाठी धडपडत असतो. साहेबाच्या भोवती कार्यकर्ते
त्यांना त्या कार्यकर्त्यांना सावरणारे बॉडीगार्ड आणि घामाच्या धारेत हलकीशी थंड हवेची
झुळूक. प्रत्येक कार्यकर्त्यासाठी तो अविस्मरणीय क्षण.
तापलेलं
वातावरण पाहत साहेब गाडीत बसतात. काहींची भेट होते काहींची तशीच राहते. सगळे रोड शो
साठी बाईक ला किक मारतात आणि साहेबाच्या गाडीसमोर
कर्कश आवाज करत झेंडे मिरवत गावात प्रचाराची धूळ उडवत शक्ती प्रदर्शन करत सरकारी
विश्रांत गृही पोहचतात. तो पुन्हा भेटण्याची आन कार्याची संधी शोधू लागतो. पक्षाच्या
आणि साहेबाच्या विश्वासातल्या लोकांना भेटतो. भेटी साठी त्यांना विनंती करतो. साहेब
प्रवासात थकलेत ते जेवण करून थोडा आराम करून पुन्हा सगळ्यांना भेटतील. तो त्या वेळेची
वाट पाहत पुन्हा थोडं हलकं फुलकं खाऊन घेतो. काही झालं तरी आज साहेबाची भेट घेयायची.
घराचं दार ओलांडल्यापासूनचा त्याचा तो जोश तसाच कायम असतो. काही कार्यकर्ते घराकडे
तर काही कार्यकर्ते तसेच तिथेच वाट पाहत. बाजूच्या गावात रात्री साहेबाची सभा असते.
त्या गावात हि तोच जोश तीच लागभग चालू असते. पण तो मात्र तिथेच साहेबाची वाट पाहत.
पुन्हा २-३ गाड्याचा ताफा येतो काही नेते मंडळी
गाडीतून उतरून साहेबाला भेटयाला जातात. तो हे सगळं न्याहारत संधीची वाट पाहत बसतो.
बातमी समजते कि ते नेते मंडळी आज पक्ष प्रवेश करणार आहे. मिटिंग चालू असते आणि सभेची
वेळ हि जवळ येत असते आणि त्याची उत्सुकता तशीच कायम आणि आशावादी.
मिटिंग
संपते साहेब बाहेर येतात. सोबत नेते मंडळी अन बॉडीगार्ड. जमल तस तो गर्दीतून वाट काढतो.
साहेबाच्या जवळ जातो . स्वतःची ओळख सांगतो.
साहेब पाठीवर थाप मारतो,साहेब एअर कंडिशन
गाडीत बसतो. ताफा निघतो त्याच्या डोळ्यासमोर ताफा हळूहळू दूर जातो. पण त्याला महत्वाची
असते ती साहेबानी त्याच्या पाठीवर मारलेली थाप. २ ते ३ सेकंद साठी झालेली भेट. भेटीत
साहेबांचे शब्द . तो अविस्मरणीय क्षण. चुकून तो क्षण कोणी टिपलाय का ? आजूबाजूला त्यासाठी
केविलवाणा प्रयन्त. आणि त्या साहेबांवर असलेली निष्ठा तशीच कायम ठेवत पक्षासाठी
पुन्हा कामाला लागतो.
हा
जोश असतो तो खंदे कार्यकर्त्यात असतो .
सचिन कृष्णा
तळे
पुणे कात्रज
दूरध्वनी - ७७०९०९९६४६

No comments:
Post a Comment