आपल्या मायमराठीत वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमधून समृद्ध प्रवाह आणण्याचे महत्त्वाचे काम लेखक अन साहित्यिक मोठ्या उमेदीने करत असतात. संतांनी हि ह्याच साहित्याच्या जोरावर देवाला हि आपलसं करून ठेवलं. वाचकांच्या मनाला आनंद देणार साहित्य, वाचनाची आवड निर्माण करणार साहित्य आणि मार्गदर्शन करणार साहित्य असे महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण साहित्य लेखकांच्या हातून घडले पाहिजे. त्यासाठी त्या लेखकांना साहित्यिकांना वेळोवेळी प्रोत्साहन देणे त्यांच्या लेखणीला बळ येण्यासाठी त्यांना मानधन देऊन त्यांचे गौरव होणे गरजेचे आहे. त्यासाठी देशात राज्यात अनेक संस्था ह्या सक्रिय आहेत. ह्या सर्व संस्थे मध्ये मानाची संस्था म्हणजेच भारतीय साहित्य अकादमी आहे.
भारतीय साहित्य
अकादमी तर्फे साहित्य अकादमी पुरस्कार हा पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे
योगदान देणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया,
कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली,
बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी
ह्या २४ भाषा मधून सर्वात्तम ठरणाऱ्या लेखकाला एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन
गौरवण्यात येते. वर्षभराच्या चर्चा आणि निवडीनंतर हे पुरस्कार जाहीर केले जातात. प्रथम
पुरस्कार हा १९५५ मध्ये दिला गेला त्यावेळी पुरस्कारा सोबत पाच हजार रूपये मानधन देण्यात
आले त्यानंतर १९८३ मध्ये हीच राशी वाढवून दहा हजार करण्यात आली. त्यानंतर २००१ मध्ये
चाळीस हजार अन २००३ मध्ये पन्नास हजार होती. वेळोवेळी साहित्य अकादमीने पुरस्काराचे
मानधन हे वाढवले आहे.
भारताला
स्वातंत्र्य मिळण्याच्या खूप आधीपासून, भारतात साहित्याची राष्ट्रीय संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव देशातील ब्रिटिश सरकारकडे विचाराधीन होता. १९४४ मध्ये, भारत सरकारने रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालचा प्रस्ताव
तत्त्वतः मान्य केला की सर्व प्रदेशांमध्ये
सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय सांस्कृतिक ट्रस्टची स्थापना केली जावी. ट्रस्टच्या अंतर्गत साहित्य अकादमीसह तीन अकादमी होत्या. स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारत सरकारच्या प्रस्तावानंतर, विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी बैठकांची मालिका बोलावण्यात आली. एक साहित्यासाठी, दुसरी
व्हिज्युअल आणि तिसरी नृत्य, नाटक आणि संगीतासाठी.
लक्ष्मणशास्त्री
जोशी , बाळ सीताराम मर्ढेकर ,विष्णु सखाराम खांडेकर , रणजीत देसाई, इरावती कर्वे, 'कुसुमाग्रज' ,आरती
प्रभु' , मंगेश के. पाडगाँवकर, व्यंकटेश माडगूळकर,विश्वास पाटील, नेमाडे,नामदेव धोंडो महानोर, ग्रेस',आसाराम लोमटे इत्यादी अश्या अनेक साहित्यिकांना लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार मराठी विभागा तर्फे गौरवण्यात आले आहे. २०१० पासून ह्याच संस्थे मार्फत बाल साहित्य पुरस्कार हि दिला जात
आहे. त्यात अनिल अवचट , बाबा भांड, अनंत भावे,राजीव तांबे इत्यादी लेखकांना हा पुरस्कार मिळाला
आहे.
सचिन कृष्णा तळे
No comments:
Post a Comment