२६
जुलै १९८६ ला मुंबई त
त्यांचा जन्म झाला. पुस्तकी ज्ञान पेक्ष्या प्रत्येक्षात अनुभवावर त्यांचा जास्त जोर होता. चित्रकला, लेखन आणि वाचन ची लहानपणापासून आवड.
लहानपणीचं त्यांच्या वडिलांनी त्यांना एक कानमंत्र दिला
" जन्माला आलासं म्हणून जगू नकोस. नाव कमवण्यासाठी जग. मग हे नाव
कमावण्यासाठी तुला आर किंवा पार
जरी जावं लागलं तरी चालेल" आणि ईथुनचं सुरवात झाली एका चळवळ्या धडपड्या कार्यकर्त्याची.
कॉमर्स
मधून शिक्षण घेत मिळणारा रविवार चा दिवस मित्रांमध्ये
घालवण्यापेक्षा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी पत्रकारिता पूर्ण केली. वयाच्या १८ वर्ष पूर्ण
झाल्यावर आणि १२ वी पास
झाल्यावर वडिलांच्या मार्गदर्शन खाली LIC ची agancy मिळवून महाविद्यालय चे शिक्षण घेत
घेत पोलिसी काढत फिरू लागला. घरातली परिस्तिथी तशी चांगली नव्हती. गारमेंट्स मधील कॉलर शिवण्यात आई वडिलांना मदत
करत परिस्तिथीवर मात करत सचिन मोठा होत होता. कलेची आवड म्हणून पुण्यातून त्यांनी २डी आणि ३ डी अनिमेशन
शिकून काही काळ मुंबईच्या स्टुडियोत काम देखील केले.
सामाजिक
आणि राजकीय कार्याची आवड त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालीच होती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे हे त्यांच्या वडिलांचे
दैवत. त्यामुळे ठाकरी बाळकडू त्यांना वडिलांकडून लहानपणीच मिळाला. सामाजिक क्षेत्रात पहिलं पाऊल पडलं ते ठाण्यातील स्वामी
विवेकानंद केंद्रात.
राजकीय
सत्तेशिवाय तुम्ही लढू शकत नाही म्हणून ३ मार्च २००९
रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत सांगली जिल्हा सह संपर्क प्रमुख
म्हणून पदभार स्वीकारलं अन एका राजकीय
प्रवासाला सुरवात झाली. २००९ मध्ये त्यांच्या नेतृत्वखाली सांगली समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील आंदोलन यशस्वी झाले आणि जिह्ल्यातील ४२ हजार ५०५
विद्यार्थींना २८ कोटी ४९
लाखाचा धनादेश वाटप झाला. शाळेची फी वाढ असो
किंवा शाळेवरील अनधिकृत टॉवर तर कधी शाळेत
घडलेल्या विनयभंगाच्या घटना सचिन तळे यांनी आवाज उचलून धरला. मुंबईतील ग्रंथालय वाचवण्यासाठी "ग्रंथालय वाचवा, वाचन संस्कृती जपा" हि मोहीम राबवली.
राज्यातील
३८ हजार ४८ शाळांमध्ये स्वयंपाकगृह
बांधण्यासाठी २००८ -०९ या वर्षी
केंद्रातून २२८ कोटी २८ लाख मंजूर
झाले परंतु काही कारणास्तव हि योजना तशीच
पडून होती. सचिन तळे यांनी त्या योजनांचा पाठपुरावा केला आणि २०१६ मध्ये हि योजना पूर्ण
झाली.
माहितीच्या
अधिकाराखाली अनेक माहिती गोळा करून प्रश्न विचारायचं काम सचिन तळे यांनी केले. महापालिकेचे १० मंड्या खाजगी
बिल्डरच्या घश्यात पालिकेने टाकली यावर असो किंवा मिठी
नदीवरील अतिक्रमणांचा विषय असो किंवा पालिकेतील १० हजारी गुणवंतेचे
कौतुक असो किंवा पुण्यातील ऐतिहासिक घोरपडे घाट च सुशोभीकरण असो.
अश्या अनेक मोठे विषय सचिन तळे यांनी त्यांच्या कार्यकाळात हाताळले.
कामानिमित्त
पुण्यात आल्यावर त्यांना साहित्याची आवड निर्माण झाली. पुण्यातील शुक्रवार पेठेतील साहित्य चपराक च्या साप्ताहिक आणि मासिकातून त्यांचे लेख अन कविता प्रकाशित
होऊ लागल्या. हळू हळू हा साहित्य प्रवास
चित्रपट श्रुष्टि कडे वळला अन " कन्फयुज " या मराठी चित्रपटात
३ गाणी त्यांनी लिहिली तर " डॉ. तात्याराव लहाने " या चित्रपटात अलका
कुबल यांच्या स्वरात चित्रपटाचा शेवट लिहिला. "कस्तुरी" ह्या न प्रकशित झालेल्या
मालिकेची १५ एपिसोड लिहून
पूर्ण केले.
अनेक वृत्तपत्रातून
साप्ताहिकातून मासिकातून त्यांच्या कविता , लेख , पुस्तक परीचय, मुलाखत प्रकाशित झाले.
दैनिक पुण्य नगरीतून संस्था परिचय हा सदर गेली दोन वर्ष त्यांनी चालवला. सावरकरांच्या
सहा सोनेरी पाने या पुस्तकावर गद्य व पद्य लिखाण तसेच "रंगा" या नावाची एक
कादंबरी लिहून पूर्ण झाली आहे. नोकरी संभाळून
समाजसेवा आणि स्वतःच छंद आवड जोपासत सचिनजी यांचे कार्य चालू आहे.
चित्रकार
, लेखक , कवी , गीतकार तर कधी सामाजिक
अन राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख समाजात निर्माण झाली. त्यांच्या ह्या सर्व प्रवासापाठी जे जे हात
पाठीशी उभे राहिले ते हात आजही
त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून आज त्यांचं एक
स्वप्न पूर्ण होत आहे. अश्या ह्या चळवळ्या धडपड्या कार्यकर्त्याला त्याच्या पुढच्या सर्व प्रवासाला आणि "दरवळ मराठी साहित्य संस्थांचा " या त्यांच्या पहिल्या
मराठी पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा. या पुस्तकाला खुद्द
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , मनसे अध्यक्ष राज ठाकरे अन वैद्यकीय सहाय्यता
कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे शुभेच्या संदेश मिळाला. या पुस्तकाची दखल शासकीय
दरबारात घेतली गेली आणि पुढे हि या पुस्तकाची
दखल घेतली जाणार यात शंका नाही.
पुन्हा
एकदा सचिन कृष्णा तळे यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा ....
No comments:
Post a Comment