उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे हे दोन नाव महाराष्ट्राच्या राजकारणात वजनदारच नाही तर प्रतिष्टेच देखील आहे. हि दोन चुलत भाव राज्याच्या राजकारणात एकत्र यावं आणि एकत्र निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे. अनेकांना वाटत कि राज उद्धव जोडी हि एकत्र आली तर राज्याचं राजकारण हे बदलेल. काही दिवसापूर्वी हि दोन मंडळी एकत्र एका कार्यक्रमात दिसलीत आणि त्यावर चांगलीच चर्चा झाली. एक शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत तर दुसरे बाळासाहेबांचे पुत्र. पण बाळासाहेब असतानाच राजसाहेब दुरावले. काही अंतर्गत वादातून राजसाहेब सारखे अनेक नेते हळू हळू शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र" करून निघून गेले आणि हे चित्र काही थांबेना. आज दुर्दव्य कि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दोन गटात रूपांतर झालं. त्याला कोण जवाबदार हा आजचा विषय नाही. असो , आजचा विषय हाच आहे कि राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन चुलत भाऊ एकत्र आले पाहिजे कि नाहीत ? जर एकत्र आले तर त्याचा फायदा होणार कि तोटा? आजची परिस्तिथी पाहता ठाकरे या नावाचा खरा वारसदार नक्कीच उद्धव ठाकरे आहेत कि राज ठाकरे ?
https://youtu.be/bbrP_15GYN0?si=rcCN4-b-qgW_W4yx
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यापेक्षा आठ वर्षाने मोठे आहेत पण
शिवसेना या संघटनेच्या नेतृत्वात राजसाहेब हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे
ठरतात. कारण राजकारणात वारसा हा फक्त एका कालावधी साठी असतो पण अनुभवातून जो
नेतृत्व करतो तो चिरकाल टिकतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन स्वतंत्र वाहते
प्रवाह आहे. चला हा प्रवाह नक्की कसा आहे ते पाहू.
लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून
राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान
देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. शिवसेनेला तरुणांचा
बळकट पाठिंबा मिळवण्यात राज ठाकरे यांचा फार वाटा महत्त्वाचा समजला जातो.
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एकेकाळी राज ठाकरे
याच्याकडेच बोट दाखवले जायचे. उत्तम वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्व असलेले राज
ठाकरे हे तरुणांचे नेते मानले जातात. राज ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर बाळासाहेब
यांनी त्यांच्यावर विद्यार्थी सेनेचे नेतृत्व सोपवलं होत. याच काळात लाखोंच्या
संख्येने विद्यार्थी तरुण मंडळी राज साहेब यांच्या नेतृत्वात काम करू लागली .
विद्यार्थी सेनेसोबत शिव उदयॊग सेने चे काम देखील जोरात चालू झाले होते. कधी
बाळासाहेब यांच्यासाठी कार्यकर्ता म्हणून तर कधी बाळासाहेबांच्या शिलेदारातील
प्रमुख शिलेदार म्हणून राजसाहेब भूमिका पार पाडत होते.
पण महाबळेश्वर येथील २००३ च्या शिवसेनेच्या अधिवेशनात जे घडलं
त्यानंतर या बाहुबली ला एक पाऊल मागेच टाकावे लागले. हा राजकीय अनुभव राजसाहेब
ठाकरे यांच्याकडे होताच. शेवटी २००६ मध्ये ९ मार्च ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची
स्थापना केली आणि या नव्या पक्षाने अनेक तरुणांना राजकारणात येण्याची संधी दिली.
त्याउलट उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निपुण छायाचित्रकार. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. सुरवातीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. २००२ नंतर उद्धव साहेब ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला. पुढील वर्षी २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बाळासाहेब लढले त्याच दोन विरोधी पक्षांसोबत उद्धव साहेब यांनी मैत्री करून सत्ता स्थापन केली. सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले व राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. २१ जून २०२२ रोजी शिवसेनेतील एकनाथ शिंदे सह 40 आमदारांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला.
https://youtu.be/bbrP_15GYN0?si=rcCN4-b-qgW_W4yx
हा झाला या दोघांचा एक छोटासा परिचय.
एकाच मेहनतीने स्वबळावर पक्ष स्थापन करून राजकारणात स्थिर राहण्याचा
प्रयत्न सुरु आहे तर दुसर्याने जे वारसा हक्काने मिळवलं ते टिकवण्यात समर्थ आहेत २००३ पासून
ते आज पर्यंत बाळासाहेबांनी उभे केलेले अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात
असलेली मूळ शिवसेनेला सोडून बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केली. ज्यावेळी उद्धव ठाकरे
यांच्याकडे बाळासाहेबांचे शिलेदार होते त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा विचार
केला नाही. उलट मनसे कशी सत्तेपासून लांब राहील याचेच कटकारस्थान रचले गेले.
अर्थात हा एक राजकारणाचा भाग आहे. जर हे दोन नेते एकत्र येत असतील तर त्यात पहिला
अडथळा हा संजय राऊत यांचा असेल. राज साहेब यांच्या मनात संजय राऊत बद्दल काय मत
असेल हे तुम्ही राज साहेबाना विचारलं तर ते माझ्यापेक्षा चागलं उत्तर देतील. बाकी
संजय राऊत यांचं मत कोणाबद्दल काय आहे हे सुद्धा मला सांगायची गरज नाही.
असे आरोप हि होतात कि उद्धव साहेब यांच्यापर्यंत पोहचायचं असेल तर
तुम्हाला संजय राऊत यांच्या मार्फत च जावं लागत. आणि स्पष्ट सांगायचं तर संजय राऊत
याना मनसे अन भाजप ची जवळीक अजिबात नकोय. त्यांना काँग्रेस आणि शरद पवार गट जितका
जवळ वाटतो तितका हे दोन पक्ष नाही. त्यामुळे या दोन नेत्याने एकत्र न येण्याचं
संजय राऊत हे एक कारण असू शकत.
हि दोन भावंडं अलग झाल्यापासून तुम्ही उद्धव साहेबांना कधी राज साहेब
यांच्या घरी पाहिलं का ? किंवा राजसाहेब यांना नातू झाला तेव्हा
त्यावर उद्धवसाहेबांचं राजसाहेबाना शुभेच्छा दिल्यात पाहिलं का ? पण
उद्धव साहेब जेव्हा आजारी होते तेव्हा राजसाहेब स्वतः त्यांची विचारपूस करून
त्यांना मातोश्री पर्यंत पोहचवले. असे बारीसारीक अनेक घटना घडलेत हे विसरून चालणार
नाही. भावकी सत्तेसाठी एकत्र जरी आली तरी त्यांच्या मनात जे एकमेकांबद्दल आहे ते
जगजाहीर आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव साहेब यांच्यामुळे राजसाहेब याना
शिवसेना पक्षाचं अध्यक्ष होता आलं नाही, हि जी खंत आहे ती राजसाहेब यांच्या
मनात आजही असणार आणि पुढे हि राहणार.
राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे धोरण त्यांनी महाराष्ट्र व मराठीभाषा
व हिंदुत्व यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. कधीकाळी याच मुद्द्यावर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना होती पण उद्धव ठाकरे यांचे मित्र पक्षाची
विचारसरणी हि वेगळी असल्याने ते महाराष्ट्र व मराठीभाषा व हिंदुत्व var कधी कधी ठाम भूमिका मांडू शकत नाहीय.
त्यामुळे हे दोन नेते एकत्र येतील असं मला तरी वाटत नाही आणि आलेच तर
याचा फायदा सत्ता मिळवण्यासाठी अजिबात होणार नाही. शेवटी या क्लिप पहा आणि तुम्हीच
ठरावा.
सचिन कृष्णा तळे
No comments:
Post a Comment