Monday, 18 December 2017

माणुसकी मारली त्याने

दगडावर कोरली त्याने
जगताना चोरली त्याने

आभाळाच्या कुशीतून
मातित पेरली त्याने

ते ग्रंथ नव्हे
ते ज्ञान नव्हे
ते विज्ञान नव्हे
ती कविताच होती
चमत्कार सांगणारी
स्वार्थाची बाजारी होती
महापुरुषांची बदनामी होती
होती विश्वाची ती गंमत
होती मोठमोठाले ईमारती
त्यात सडली घडली डोके
त्या जाती धर्मामध्ये
त्या अनेक रंगामध्ये
त्या अनेक भाषांमध्ये
त्या माणसांच्या गर्दीमध्ये
माणुसकी मारली त्याने
आरे ..
त्या माणसांच्या गर्दीमध्ये
माणुसकी मारली त्याने

सचिन कृष्णा तळे
पुणे


Saturday, 16 December 2017

दादा हजर हाय गावा गावात

दादा हजर हाय गावा गावात

डोक्यावर टोपी अन हाप चड्डी
छबी ही आमच्या मना मनात ..२

गंगू जरा थांब ना ग आता
दादा हजर हाय गावा गावात ...२

गावटी जत्रा भरवली तुम्ही
ईश्काचा बाजार राना वनात
सोळा वा सोडा साठीचा ही
नाचतोय खुशाल घरा घरात
भोर गावचा त्या नायगावचा
ह्या बँड वाल्या दादाची...
सोगंड्या गाजतोय देशा देशात

गंगू जरा थांब ना ग आता
दादा हजर हाय गावा गावात ...२

आंधळा मारतोय डोळा
गंगाराम चा राम राम घ्या
पांडू हवालदार येईल
बोट लावील तीथे गुदगुल्या
तुमचं आमच जमतय..बघा
दादांच्या नावे मुका घ्या मुका
ह्योच नवरा पाहीजे आता
सदाशिवचा जीव एकटा

गंगू जरा थांब ना ग आता
दादा हजर हाय गावा गावात

दाजीबा जरा लाज धरा
तुम्हा ईन नाही कोणी जगा जगात
लैच्या लैय गाजून नाचून गेले
दादा शिवा कोण हाय वाड्या वाड्यात

गंगू जरा थांब ना ग आता
दादा हजर हाय गावा गावात

चंदेरी दुनियेचा हा सितारा
उगवला महाराष्ट्राच्या माती मातीत
येड तुमच्या अभिनयाचा
तुमच्या कलागुणांचा
मोठ्या साहेबांनी घेतला क्षणो क्षणी
भाषाचा अर्थ  लावू नका
फूकट वेळ तूम्ही आता घालवू नका
दादा च नेता थोर अभिनेता
दादांची गीते वाजतायत गल्लो गल्लीत

गंगू जरा थांब ना ग आता
दादा हजर हाय गावा गावात ...२

मराठमोळ्या साधा भोळ्या दादांची
छबी ही आमच्या मना मनात
गंगू जरा थांब ना ग आता
दादा हजर हाय गावा गावात

- सचिन तळे

Thursday, 14 December 2017

धर्मांतर चालू आहे राष्ट्रांतर चालू आहे
देशात आपल्या, हे निरंतर चालू आहे

ज्याची त्याची ईच्छा ज्याची त्याची मनमानी
हेच सांगा, का हे मरणांनंतर चालू आहे

सचिन तळे 

Tuesday, 5 December 2017

विश्ववक्ता विश्वनेता विश्वरत्न तू ..
बहूजनाचा विश्वासू विश्वनायक तू ..

अनंता तू भारता तू अभ्यासक तू ..
भारतरत्न तेजप्रताप तेजवंत तू ..

सत्य तू संघर्ष तू चळवळ ही तू ..
मानवतेचा न्यायकर्ता उध्दारक तू ..


#सचिन_तळे


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale