कविता
भर दुपारची ती वेळ होती
ती आणि मी भटकलेल्या वाटेवरती
हातामध्ये हात होता
अन तळपत्या सूर्या ची किरणे ती
अचानक गार गार वारा
तिच्या केसातून मला भुलवत होता
मी तिच्या नजराणा नजर भिडवत होतो
त्यातच पावसाने आपली हजेरी लावली
आश्रयाला काहीच नव्हते आमच्या भोवती
मी ही भिजलो अन तीही चिंब चिंब भिजलीच होती
भर दुपारची ती वेळ होती
भिजले होते केस तिचे
भिजली होती डोळ्यावरील पापणी
भिजलेल्या त्या ओठांवर
अलगत उमटली पावसाची गाणी
दोघांच्या हि नजरा समांतर होत्या
दोघांच्या ही ओठांवर पावसाचे थेंब होते
काही थेंब लाजणारे
तर काही छेडणारे भेटले
ह्या तारुण्याला भुलवणारी
भर दुपारची ती वेळ अशी होती
पाऊस थांबला … प्रश्न होता घरी जाण्याचा
वाट पाहत होतो दोघे ही सूर्याच्या किरणांचा
काही अंतर चाललो … एकांतात
दोघांच्या ही हाताची घडी होती
अन थर थर नर दोघांच अंग होत
शब्द ही अडखळत अडखळत पडत होते
कारण मी भिजलो होतो
ति ही चिंब चिंब भिजलीच होती
भर दुपारची ती अशी वेळ होती
दोघांच्या हि मनात एकमेकांबद्दल प्रेम होत
विचारण कधीच आम्हाला जमल नव्हत
त्याच क्षणी तिचा हात हाती घेतला
विचारता तिला होकार तिने दिला
कळलंच नव्हत त्या क्षणी काय घडत होत ते
पावसाचे येणे
आम्हाला भिजवणे
दोघानाही जवळ आणणे
हेच का नियतीच्या मनी होत
त्यावेळी मी ही भिजलो होतो
तीही चिंब चिंब भिजलीच होती
भर दुपारची ती अशी वेळ होती
भर दुपारची ती अशी वेळ होती
सचिन कृष्णा तळे
भर दुपारची ती वेळ होती
ती आणि मी भटकलेल्या वाटेवरती
हातामध्ये हात होता
अन तळपत्या सूर्या ची किरणे ती
अचानक गार गार वारा
तिच्या केसातून मला भुलवत होता
मी तिच्या नजराणा नजर भिडवत होतो
त्यातच पावसाने आपली हजेरी लावली
आश्रयाला काहीच नव्हते आमच्या भोवती
मी ही भिजलो अन तीही चिंब चिंब भिजलीच होती
भर दुपारची ती वेळ होती
भिजले होते केस तिचे
भिजली होती डोळ्यावरील पापणी
भिजलेल्या त्या ओठांवर
अलगत उमटली पावसाची गाणी
दोघांच्या हि नजरा समांतर होत्या
दोघांच्या ही ओठांवर पावसाचे थेंब होते
काही थेंब लाजणारे
तर काही छेडणारे भेटले
ह्या तारुण्याला भुलवणारी
भर दुपारची ती वेळ अशी होती
पाऊस थांबला … प्रश्न होता घरी जाण्याचा
वाट पाहत होतो दोघे ही सूर्याच्या किरणांचा
काही अंतर चाललो … एकांतात
दोघांच्या ही हाताची घडी होती
अन थर थर नर दोघांच अंग होत
शब्द ही अडखळत अडखळत पडत होते
कारण मी भिजलो होतो
ति ही चिंब चिंब भिजलीच होती
भर दुपारची ती अशी वेळ होती
दोघांच्या हि मनात एकमेकांबद्दल प्रेम होत
विचारण कधीच आम्हाला जमल नव्हत
त्याच क्षणी तिचा हात हाती घेतला
विचारता तिला होकार तिने दिला
कळलंच नव्हत त्या क्षणी काय घडत होत ते
पावसाचे येणे
आम्हाला भिजवणे
दोघानाही जवळ आणणे
हेच का नियतीच्या मनी होत
त्यावेळी मी ही भिजलो होतो
तीही चिंब चिंब भिजलीच होती
भर दुपारची ती अशी वेळ होती
भर दुपारची ती अशी वेळ होती
सचिन कृष्णा तळे
No comments:
Post a Comment