Monday, 17 September 2018

स्वछंद असा हा छंद

स्वछंद असा हा छंद , तुझा रंग , माझ्या संग
चंदनाचा सुगंध, दरवळे अंगअंग, तुझ्यात मी मग्न

पाहुनी झालो दंग, असा बेभान, तुझ्या रुपान 
फुलपाखराचे पंख, त्याचे ते रंग, करी मनात खंत
स्वछंद  असा हा छंद , तुझा रंग , माझ्या संग ...

आकाशी दिसे चंद्र, तुझे ते नेत्र, बेधुंद सागरात
रणकंद उठे मनात, पाहता अंत, तुझ्या भेटीत

जलतरंग , करी नृत , तुझ्या माझ्या प्रीतीत
त्या एकांतात,अश्या विरहात, भेट तुझी आसवंत
स्वछंद  असा हा छंद , तुझा रंग , माझ्या संग ...

झुंज माझ्या शब्दास , तुझेच भास, आसपास
आतुर मनास, ह्या ओठांस, लागे तुझीच प्यास

होऊनि रसवंत, घडावे सवांद , असे प्रेमाचे
काव्यातून,  मिलनातून, शब्द फुटावे अमृताचे 
स्वछंद  असा हा छंद , तुझा रंग , माझ्या संग ...

-सचिन कृष्णा तळे 
7709099646

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale