घेतो कोण आता ,दखल तेवढे सांगा
शिल्लक आहे थोड्या ,आजून तक्रारी
मी कुठे म्हणालो ,हवी घोडा गाडी
सुखाची गोडी ,लोगो माझ्या संसारी
नकोच मला ती, फुले ताजीतवानी
कष्टानेच फुलु दे, कष्टाची बाग प्यारी
डोळ्यातल्या अश्रुना, स्वप्ने सुखाची
माती होण्याआधी, मिठावी उधारी
माझ्या फांदीवर, घरटे चार उभी
होतील मोठी, तेव्हा वैकुंठाची पायरी
उभा आहे आज, पाठीशी तुझी थाप
तुझ्या या लेकरास, मिळू दे भरारी
सचिन कृष्णा तळे , पुणे
७७०९०९९६४६


No comments:
Post a Comment