Sunday, 18 November 2018

दारुड्याची भूक उपाशी

थोडी देशी थोडी विदेशी, दारुड्याची भूक उपाशी
थोडी गुंगशी थोडी वीकशी, घरातली भांडीकुंडी

घरातली भांडीकुंडी  , संसाराची तीच रे तिजोरी
दारूसाठी पार्टीसाठी , घरादाराची राखरांगोळी

घरादाराची राखरांगोळी, कोणास हवी हि दिवाळी
मुलांबाळांसोबत खावी , घरातली ती चटणी भाकरी

घरातली ती चटणी भाकरी, सुखाची अन आनंदाची
दारूपायी उध्वस्त झाली, लाखो घरांची तरुणाई

लाखो घरांची तरुणाई, ती पालकांची खरी कमाई
डोळयांदेखत घेऊन जाते, दारू म्हणजे यमाची स्वारी

दारू म्हणजे यमाची स्वारी, हवी कश्याला हि पायरी
जगण्याचा आनंद मोठा, दारुविना होऊ दे साजरी

दारुविना होऊ दे साजरी, मनाची कर हि तयारी
तुझ्या ह्या वाटेवर मित्रा, नकोच दारुड्यांची मैत्री

नकोच दारुड्यांची मैत्री, नकोच ती नशेची धुंदी
थोडी देशी थोडी विदेशी, दारुड्याची भूक उपाशी

- सचिन कृष्णा तळे , पुणे
७७०९०९९६४६

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale