धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर
उत्तरम्य समुद्रस्य,
हिमाद्रे शैव लक्षणम्
वर्षम् भारतम् नाम् ,भारतीय यत्र संततिः
म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला अशी जी भूमी तिचे नाव आहे भारत अन् त्या भारतभूमीची संतती म्हणजेच जे भारतात जन्मले ते भारतीय. भारत ... हिंदुस्थान ... इंडिया. जगातल्या प्राचीन संस्कृती
पैकी एक. क्षेत्रफळात सातव्या क्रमांकावर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसंख्याच्या
बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणारा आपला भारत देश. अनेक भाषा , प्रांत, रीतिरिवाज
, तसेच अनेक सण आणि अनेक धर्माना आश्रय आणि श्रद्धा पूर्वक मानसन्मान देणारा एकमेव
देश म्हणजे आपला भारत . जिथे मंदिराची आरती होते ,मस्जिद ची आजण होते , बुद्धांचे स्मरण
होते , चर्चमधून प्रार्थना होते तर जिथे बदल अन परिवर्तन हे निश्चित आहे , जिथे अन्यायाला
न्याय मिळते , जिथे भारताचे संविधान तितकेच महत्वाचे मानले जाते जिथके धर्मग्रंथ आहेत.
अनेकतेतून एकता हीच ओळख आपल्या भारताची. हीच एकता कायम टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक
भारतीय हा प्रतन्यशील असतो फक्त काही राजकीय समाजकंठक अन धृत माणसं सोडली तर.
हिंदू म्हणून जन्मलो का हाच माझा अपराध आहे
माझ्याच देशात हिंदू म्हणून का माझा विरोध आहे
जागतिक
पातळीवर जर पाहिलं तर भारत हा असा एकमेव राष्ट्र
असेल जिथे त्याच्याच भूमिपुत्रांना हक्कासाठी लढावं लागत , मरावं लागत . देशासाठी त्याच्या
धर्मासाठी त्याला बलिदान द्यावं लागत. भाषेवरून अन धर्मावरून वेळोवेळो त्याचे खच्चीकरण
केले जात. जर प्राचीन भारतावर नजर फिरवली तर सहज लक्ष्यात येईल कि , हिंदू आणि बोद्ध
ह्या दोन विश्व सुंदर धर्माची , वटवृक्षाची मुळे हे भारतातच रुजली अन फुलली . इतर धर्म
कसे आले आणि लादले गेले हे इतिहासाच्या रक्तरंजित पानांनी आजही ग्रंथालय सजले आहेत.
त्याचे अवशेष सहज दिसून येतात. अन्न वस्त्र निवारा माणसाच्या ह्या मूलभूत गरजा
त्याशिवाय माणूस जगू शकत नाही.
ह्या गरजा जितक्या महत्वाच्या तितकंच महत्व आहे
धर्म भाषा आणि देश. मूलभूत गरजा जगण्यासाठी तर घडण्यासाठी आणि घडवण्यासाठी मानव हा
धर्म जात अन भाषाचे वापर करतो.
ज्या
समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचे आपण देणे लागतो ह्याच धर्मावर माणूस हा समूह करून
राहू लागला. आपली परंपरा संस्कृती जपणे आणि पुढच्या पिढीला ती समजून सांगणे हे आद्य
कर्तव्य. धर्माची रक्षा करणे धर्म वाढवणे म्हणजे आपल्या धर्मात असलेले चांगले विचार हे लोकांपर्यंत पोहचवणे , त्यांना मार्ग दाखवणे
. धर्मांतर हे स्वखुशीने असावे. ज्याला त्याला
मार्ग मोकळा आहे. ज्याचे त्याचे विचार हे स्वतंत्र आहे . परंतु धर्माच्या ह्या कडव्या
प्रचारात धर्मांतराची ठिणगी अशी पेटली कि माणूस हा अत्याचाराने , जबरदस्तीने , अन्यायाने
धर्मांतर करू लागला ... लादू लागला.
वाटून घेतली धर्म जात अन माती
वाटून घेतली भाषा रंग अन नाती
वर्चस्व
गाजवायच असेल तर एकता हि
तोडायलाच हवी . एकमेकांबद्दल मतभेद निर्माण करणे , वैर निर्माण करणे , फूट पाडून कार्य सिद्धी करणे. "तोडा फोड राज्य करा" कदाचित ह्याच वाक्यावर धर्मांतर आणि राष्ट्रांतरच बीज पेरलं गेलं असावं. राष्ट्रांतर घडलं ते धर्मांतराच्या जोरावर
हे जग जाहीर आहे.
जर इतिहासाची पाने चाळली तर धर्मांतरच्या वाहत्या
प्रवाहात किती राष्ट्रांचा जन्म झाला हे सहज कळेल.
जगाच्या पाठीवरती जितके युद्ध झाले ते सगळे युद्ध
स्वतःचे साम्राज्य वाढवण्यास कमी तर धर्माच्या प्रचारास
अधिक झाले हे कटू सत्य
आहे आणि ह्याच आगीच्या धुराळात असंख्य निष्पाप जीवांची होळी पेटवण्यात आली. पुढच्या पिढीला इतिहास कळू नये म्हणून असंख्य ऐतिहासिक स्थळे भुईसपाट करण्यात आले उध्वस्त केले गेले. आठ वर्षांपूर्वी अफगाणिस्थान
मधील हिंदुकुश पर्वतरांगात जगातील मोठ्या मुर्त्यांपैकी असणारी बमियानचे बुद्ध
नष्ट करण्यात
आले. इतकेच नाही तर रस्त्यात येईल
ते सर्व बोद्ध आणि हिंदूंचे धार्मिक स्थळांची तोडफोड अन विटंबना करून
नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
"देहकडून
देवाकडे जाताना मध्ये देश लागतो " सावरकरांच्या अश्या क्रांतिकारी विचारांना आपण
सहज विसरतो किंवा त्या शब्दांच महत्व कळत नाही. जशी आपली संस्कृती तसा आपला देश. जर हि संस्कृतीचं
बदली गेली तर देश हा
बदलणारच. धर्मांतर जर वाढले तर
राष्ट्रातंर हे होणारच.
No comments:
Post a Comment