Sunday, 1 December 2019

आम्हाला छत्रपती शासन हवयं

अध्यक्ष महाेदय

             आज सभागृहात फडणवीस आणि ठाकरे हा विषय फार रंगला, राज्यात दाेन्ही पक्षाकडून ह्या नेत्यांचे काैतूक झाले.   जनतेला हि आवडले. महाेदय पहा ना जनतेने युतीला मतदान केल आणि जनादेश दिला आणि हे दाेन हिरे सभागृहात चमकले. गीतेत लिहले आहे कि " जे हाेत ते चांगल्यासाठी च हाेत आहे" . ह्या वरून युती तुटली हे चांगलच झाले कारण महाराष्ट्राला उध्दव ठाकरे समजता येईल साेबत फडणवीस आहेतच. ४० टक्के वाले कदाचित ह्यांच्याकडून शिकतील आणि सुधारतील.

महाेदय, आमच्या साठी ठाकरे सरकार असाे  या फडणवीस या पवार. फक्त ते जनतेचा हवा मजूर गरीब कष्टकरी ह्यांचा हवा. उद्याेगपती ह्यांना साेबत घेऊन विकासाची नांगर चालवणारा हवा. भ्रष्टाचारी नेत्यांचा कर्दनकाळ हवा. बस्स.

महाेदय, जातीच राजकारण करत राज्यातल्या जनतेला खेळवत ठेवणारी सरकार आम्हाला नकाेय, ज्यांच्यावर गुन्हेगारी खटले चालू आहेत ते नेते आणि त्यांचा पक्ष नकाेय, शेतकऱ्यांना फसवणारा.. हमीभावासाठी  खाेट  नाटक करून शेतकर्यावर गाेळ्या झाडणार सरकार नकाेय.. निवडणूकीच्या ताेंडावर आमिष दाखवून मत गाेळा करणारा सरकार नकाेय.. महाेदय..  आम्हाला दंगलीत मारू पाहणार सरकार नकाेय..आम्हाला मागास ठेवून स्वताची प्रगती करून घेणार सरकार नकाेय..

महाेदय आम्हाला छत्रपती शासन हवयं, जे बारापगड जातीच हाेत जे लहानापासून थाेरांच हाेत जे सत्याच हाेत.

जय महाराष्ट्र
#आहेतेआहे।
#सचिन_तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale