घडा आणि घडवा
एखादा माणूस आपल्या पूर्ण जीवनकाळात असे काही धाडसी व सामाजिक भान ठेवून महत्वपूर्ण कार्य, देशकार्य करतो कि त्यामुळे इतर लोकांना त्या व्यक्ति कडून प्रेरणा मिळते, एक नवी दिशा मिळते आणि त्याच ध्येय वेड्या लोकांचे चरित्र लिहल जात , वाचल जात त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. अश्याच व्यक्तीमध्ये एकनाथजी रानडे आहेत ज्यांच्या कार्यातून वेवकानंदांच्या विचाराची गंगा सतत विश्वभर वाहत राहिली आणि आजून हि वाहत आहे.
खरे एकनाथ जी रानडे मला विवेकानंद केंद्रातच अनुभवता आले कारण लेखक चा जसा विवेकानंद केंद्रा मधून सामाजिक प्रवास चालू झाला तसाच माझ्या हि प्रवासाची सुरवात विवेकानंदांच्या विचारातून झाली " घडा आणि घडावा ". ह्या पुस्तकाला समीर नर्लेकर ह्यांच मुख पृष्ठ असून त्याला विवेक विचार चे संपादक सिद्धाराम पाटील ह्यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यामुळे कन्याकुमारी इथे उभारण्यात आलेल्या शीला स्मारक ह्याचा इतिहास कसा आहे, त्यासाठी कोण कोणते प्रयंत्न करण्यात आले आणि ती भव्य सुंदर शीला कशी उभी राहिली ह्याच वर्णन अतिशय सुंदर रित्या ह्या पुस्तकात मांडण्यात आले आहे . ४५ पानात आणि मोजक्या शब्दात एकनाथजी रानडे हे चरित्र मांडणे सोप कार्य नव्हते पण सामान्य वाचक वर्गाला देखील समजेल अश्या साध्या सोप्या भाषेत ह्या पुस्तकाची निर्मिती करून सामन्यापर्यंत नाथांना पोहोचवण्याच कार्य पत्रकार सागर सुरवसे ह्यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या मातीतून असे काही हिरे घडवले कि त्यांचा इतिहास देशाबरोबर जग हि वाचतंय. भारताच्या शेवटच्या टोकावर ज्या शिळेवर माता पार्वती ह्यांनी तप केला त्या कान्यकुमारीत श्रीपाद ह्या शिळेवर विवेकानंद ह्यांना अखंड भारताचे दर्शन झाले, अखंड भारताचे स्वप्न उभे राहिले त्याच शिळेवर मऱ्हाटमोळ्या नाथांनी एका भव्य स्मारकाचे स्वप्न पहिले आणि ती अस्तित्वात उतरवले. हे स्वप्न तरुण भारताला स्वाधीन करण्या आगोदर नाथांना स्थानिक पातळीवरून ते राष्ट्रीय पातळी का गाटावी लागली. स्मारकाला परवानगी मिळवण्यासठी फक्त दोन दिवसात ३२३ खासदारांची सह्या घेवून कितीतरी अधर्मीय राजकीय लोकांचे मनसुबे नाथानी धुळीस कसे पाडले, शिक्षित कार्यकर्त्यांची संघटना तयार करून स्मारकासाठी निधी गोळा करण्या पासून ते शिळेला विरोध करणाऱ्या काही ख्रिश्चन मिशनरी गटांना सामोरे जाण्यापर्यंत आणि सरकारला स्मारकाचे महत्व पटवून देवून ,जातीने स्मारक निर्माती साठी दिवस रात्र एक करून, ह्या भव्य शिलास्मारकाची कथा ह्या पुस्तकातून उलगडली गेली आहे.
स्मारकाला होणारा विरोध पाहता नाथानी पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांना भेटण्याचा प्रयन्त देखील केला परंतु भेट झाली नाही. आता स्मारकाचं स्वप्न हे एकटे नाथानाच नसून विवेकानंदांच्या त्या प्रत्येक चाहत्यांचे होते त्यामुळे नाथानी राष्ट्र पातळीवर कार्य चालू केलं. अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. केवळ दगड धोंड्याचा स्मारक बांधून उपयोग नाही विवेकानंदाचे विचार त्यांचे कार्य देशभर पसरवण्यासाठी ५०० हुन अधिक शाखेत स्वाध्याय वर्ग , संस्कार वर्ग आणि योग्य वर्गाची सुरुवात केली. विवेकानंद स्मारक उभे राहू नये म्हणून त्या जागेवर काही ख्रिश्चन लोकांनी एक क्रॉस उभारला. १९३२ रोजी ती जागा हि हिंदू समाजासाठी पवित्र स्थान आहे हे सरकारला समजवून सांगून सरकारच्या आदेशाने शिळेवरचे क्रॉस हटवण्यात आले. परंतु पुन्हा ख्रिश्चन लोकांनी विवेकानंदांची शिला समुद्रात फेकून दिली. हा धार्मिक विरोध चालू असताना नाथानी स्मारकाचे स्वप्न पूर्ण केलं.
एकनाथांचे बालपण ते संघकार्यात त्याची भूमिका, लोहपुरुष वल्लभ भाई पटेल ह्यांच्यातील सवांद , संघाचा राजकीय पक्ष नको? , स्मारकासाठी लागणार निधी ते स्वप्नपूर्ती आणि शेवट पतंप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी त्यांच्या शब्दात विवेकानंद केंद्राची माहिती तसेच काही नावाजलेल्या मान्यवरांची प्रतिक्रिया ह्या पुस्तकात देण्यात आली आहे. हे पुस्तक तरुण युवा वर्गाला चिकाटी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी धडपड कशी असते हे वाचायला शिकायला मिळते.
पुस्तक - एकनाथजी रानडे ( जीवन आणि कार्य )
लेखक - सागर सुरवसे
प्रकाशक - चपराक
पाने - ५६
किंमत - ७५
सचिन कृष्णा तळे
No comments:
Post a Comment