Wednesday, 5 May 2021

सीमाभाग आणि राजकारण

 आपल्या महाराष्ट्रात १ मे १९६० पासून २१ वेळा कॉंग्रेस चे मुख्यमंत्री हाेते , शिवसेनेचे ३, भाजपचे १ , आणि पुलाेद चे १ असे २६ मुख्यमंत्री लाभले.  १७ फेब्रुवारी, १९८० ते ८ जून, १९८० तसेच २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ हा काळ राष्ट्रपती राजवटीचा. 


राष्ट्रपती राजवटीचा काळ साेडला तर राज्यात सर्वात जास्त सत्तेवर हाेत ते कॉंग्रेस त्यानंतर सेना. आता विषय हा आहे की सीमा भाग हा कधी निर्माण झाला आणि ह्याचा लढा केव्हा पासून सुरू आहे. बेळगावातील ७५ हून आधिक टक्के लाेक हे मराठी भाषिक आहेत आणि त्यात सर्व धर्माचे आहे फक्त हिंदू नाही. प्रत्येकांना महाराष्ट्रात यायच आहे. त्यासाठी अनेक संघटना अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि काही लाेक नेते निस्वार्थी लढा देत आहे. माझ्या परिचयाचे अनेक जण ह्या सीमा भागासाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत. मला देखील हिच अपेक्षा हाेती की कॉंग्रेस च्या मुख्यमंत्री कडून शिवसेनेच्या मुख्यमंत्री कडून सीमा भाग प्रश्न सुटका नाही ताे भाजपकडून सुटेल. पण तसे झाले नाही. पण आता ह्या घडीला राज्याच्या मुख्य पदावर शिवसेना आहे. तेव्हा हा प्रश्न ते साेडवतील ही अपेक्षा. 


स्व बाळासाहेब ठाकरे हे जसे सीमा भागाच्या प्रश्नावर बाेलायचे, संभाजी नगरच्या नामांतरावर बाेलायचे अगदी तसेच विद्यमान मुख्यमंत्री श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे बाेलतील आणि मार्गी लावतील हे दिसत नाही. बेळगावात जी निवडणूक झाली त्यात तरून मराठी उमेदवार ज्याला हार पत्करावी लागली त्यांचा मुळ हेतू हा बेळगावात भगवा फडकवणे नी मराठी भाषेला प्राधान्य देणे हे हाेते. पण काही जण असे चित्र रंगवतायत की बेळगावात फक्त १०० हिंदू हाेते आणि बंगाल मधे जी हिंदूची हत्या हाेतीय  तसेच आघाेरी प्रकार बेळगावात घडताेय. 


मित्रानाे .. प्रांत वाद, जातीवाद, भाषा वाद , धर्म वाद ह्यावर भाषणे देउन सत्तेत राहणार्या त्या प्रत्येक राजकीय पक्षापासून नेत्यांपासून जाे पर्यंत आपण लांब जात नाही ताेपर्यंत आपण असेच राहू.. एकमेकांशी भांडू.. एकमेकांचे रक्त सांडू.. शिव्या घालू आणि दुरावा निर्माण करू... 


जय महाराष्ट्र..!! 


#आहेतेआहे 

सचिन तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale