तुम्हाला काय मिळाले.. ?
राजकीय पुढार् यांना सत्ता मिळाली
त्यांच्या मुलांना पद मान सन्मान मिळाले
सत्तेत असणार्याना फुल पगार मिळाला
माजी आजी सगळ्यांना हप्ते मिळाले
प्रसिद्धी मिळाली
खुर्ची मिळाली
काेणाला आर्ची सुध्दा मिळाली
कमवण्याची भ्रष्टाचाराची एक संधी मिळाली
भाषणे ठाेकण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली
काहींना पुरावे
तर काहींना कराेनाची संधी मिळाली
तर
काहींना स्मशानातही गर्दी मिळाली
काहींना हॉस्पिटल चे भले मोठे बील मिळाले
काहींना आत्महत्या
तर काहींना ऑक्सिजन मुळे मृत्यू मिळाले
काहींनी रस्त्यावर जीव साोडला
काहींनी बस स्थानका बाहेर
काहींचा बेड शाेधता शाेधता
तर काहींचा औषधाच्या काळाबाजारात जीव गेला
काहींना रिपोर्ट उशीरा मिळाला
काहींना मानसिक त्रास मिळाला
काहींना अर्धा पगार मिळाला
काहींची नाेकरी गेली
काहींचे उद्याेग बंद पडले
काहींचे वाचन लिखान बंद पडले
तर काहींना २४ तास ड्युट्या लागल्या
काहींना घरात बसावे लागले
काहींना एकांतात हसावे लागले
काहींचे सारा परिवार उध्वस्त झाले
काहींना शहर साेडाव लागल
घर दार साेडाव लागल
माणसे दूरावली ना भेटी ना गाठी
ना सण ना जल्लोष
ह्या सगळ्यात तुम्हाला काय मिळाले
तुम्ही काय गमावले
विचार करा..
तुम्हाला काय मिळाले?
सचिन तळे
#आहेतेआहे
No comments:
Post a Comment