काही कवींच्या कविता त्यांचा काव्यसंग्रह हा वाचताना ताे वारंवार वाचावा अस वाटतं. तर काहींच्या कविता वाचता वाचता ताे काव्यसंग्रह बाजूला ठेवून द्यावासा वाटताे.
कारण एक वाचक म्हणून रसिक म्हणून मला जे हव तेच मिळाले नाही तर ते वाचून त्यावर वारंवार समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वेळ वाया घालवणे.
कविता मग ती काेणत्याही छंदात असाे काेणत्याही वृत्तात असाे लेखकाला जे सांगायचे आहे ते कमी शब्दात ताे मांडताे आणि नेमके त्यातूनच वाचणाचा आनंद मिळत जाताे
वाचता वाचता एक चित्र उभे राहते. जिभेवर " वाह " शब्द विरघळताे.. आणि हृदयात समाधानाची ..प्रेमाची ..विरहाची.. आपल्या पणाची.. दूखाची .. एखाद्या घटनेची भावना निर्माण हाेते .
हाेय.. मी त्याच कविता वाचताे ज्या कवितेत कवीची समाधी लागली आहे आणि ती कविता संपली कि दुसर्या कवितेत ताेच कवी पुन्हा जन्म घेताे माझ्यासाठी.
#आहेतेआहे
सचिन कृष्णा तळे
No comments:
Post a Comment