Tuesday, 10 August 2021

स्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण

 वंदे मातरम 

( नाव ) 

इथे उपस्तिथ असलेल्या सर्व भारतीयांना माझ्या कडून स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा... 


आजचा हा सोनेरी दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला कारण भारताला १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री नवा जन्म मिळाला. अनेक स्वातंत्र सैनिकांच्या परिश्रमाने बलिदानाने भारताची पारतंत्र्यातून सुटका झाली. अनेकांचे रक्त सांडले अनेकांचे घर उद्धस्त झाले. कोणी लेखणीतून , कोणी चळवळीतून , कोणी संघर्षांतून जमेल तस देशासाठी लढले म्हणून आपण आज जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव साजरा करू शकतोय आणि ह्याचा आपल्या सर्वाना अभिमान हवा. आपल्या देशात विविधतेमधे एकता आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, वेश यांची विविधता असतानाही सर्व भारतीय आम्ही एक आहोत आणि आमचा झेंडा हा सुद्धा एक आहे तो म्हणजे आपला तिरंगा . हा तिरंगा असाच फडकत विश्व विजयी होवो आणि आमच्या साठी भारत हा सदैव भाग्य विधाता राहो. मी माझं शिक्षण आणि माझ्या अंतर्गत असणारी कला ज्ञान देशाच्या प्रगतीसाठी कशी उपयोगी ठरेल ह्या साठी सदैव प्रयत्न करेल. 


आपल्या पूर्वजांच्या बलीदानास आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांना नमन करून आपणां सर्वांना स्वातंत्र्यतेच्या खुप खुप शुभकामना. आशा करतो की आपला देश प्रत्येक क्षेत्रात आपला विकास साधून जगात आपल एक आदर्श स्थापीत करेल . . . जय हिंद  ! जयभारत !


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale