भारताच्या उत्तरेकडील सीमा ह्या आताच्या काळात खूप महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी आपले सैन्य हे २४ तास सतर्क अन वेळप्रसंगी स्वतः निर्णय घेणारी हवी. भारतीय राजकीय सत्ताधारी वर्गाने राजकारण विसरून ह्या विषयावर एकमत होऊन देश घट्ट एकजूट करून घेणे गरजेचे आहे. कारण भारताच्या सीमे लगत असणारी मुस्लिम राष्ट्रे आणि तिथे घडणाऱ्या घटना ह्या गाफील राहण्यासारख्या नाहीत. जर गाफील राहिलो तर चीन , बांगलादेश अन पाकिस्तान हे राष्ट्रे भारताला डोकेदुखी ठरेल. अमेरिका सैन्याने अफगाणिस्थान मधून मागे हटल्या नंतर तालिबान ह्या आतंकी संघटना सक्रिय झाल्या अन आज अफगाणिस्थान हे तालिबानी आतंकी संघटनेच्या हाती दुसऱ्यांदा गेले आहे हे प्रत्येक भारतीयांनी लक्ष्यात घेणे गरजेचे आहे. पुढील वीस एक वर्षात ह्या धार्मिक संघटना अधिक प्रभावशाली होऊ शकतात. १९९६ ते २००१ ह्या काळात देखील तालिबानी लोकांची सत्ता अफगाणिस्तान वर होती त्यावेळी त्यांच्या कडून अनेकवेळा अतिरेकी हल्ले झाले आणि त्याचे पडसाद आपल्या शेजारी राष्ट्र पाकिस्तानात देखील दिसून आल्या. त्यामुळे भारतासमोर कट्टरपंथीयांचे आव्हान अधिक गडद होत जाण्याचे चिन्ह आहे. सध्या भारताची भूमिका हि खूप महत्वाची असल्याने सावधान हिंदुस्थान इतकंच सांगावस वाटत.
काही वर्षांपूर्वी जर इतिहासात डोकावलं तर अफगाणिस्तानचा महाभारतात देखील उल्लेख आढळतो. कौरवांचा मामा व गांधारीचा भाऊ शकुनी ह्याच देशातला होता. सम्राट अशोकाचे साम्राज्य देखील अफगाणिस्तान पर्यंत विस्तारलेला होता. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे सरनौबत नेताजी पालकर यांना औरंगजेब ने जबरदस्ती मुसलमान करून अफगाणिस्तानात ठेवले होते. असा हा अफगाण वाळवंटी प्रदेश तेव्हापासून अखंड भारताच्या इतिहासात आहे. हे उदाहरण देण्यामागच कारण कि भूतकाळात भारतावर तेव्हापासून असल्या कट्टरपंक्ती लोकांकडून आक्रमणे होत आली आहे. भारतावर जितकी परकीय आक्रमणे झाली मग अलेक्झांडर असो किंवा मुघल सगळे उत्तरेच्या मार्गाने आलीत अन ती वारंवार भारताच्या उत्तरसीमेवर कोसळलीत. बहुतांश आक्रमणे हि धार्मिक विजय मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठी झाली. ह्या धार्मिक लाटेत अनेक लोकांचे इस्लामीकीकरण धर्मांतर झाले. इतके कि एक राष्ट्र निर्माण झाले आणि धर्माच्या नावावर देशाचे विभाजन झाले. धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर म्हणून सावधान हिंदुस्थान इतकाच सांगावस वाटत.
भारतापासून साधरणतः १८०० किलोमीटर वर असणारा हा देश जरी मित्र राष्ट्र असला तरी तो तालिबानी लोकांच्या नजरेत पहिल्यापासून आहे आणि तालिबानी संघटनेला मदत हा पाकिस्तान करत असल्याचा आरोप वारंवार केला जातोय.तालिबानी अतिरेकी संघटनेबददल त्यांच्या अमानवी कृत्याबद्दल अनेक बातम्या व्हिडीओ सहज उपलबध आहेत. अफगाणिस्तान वर विजय मिळवल्यानंतर तालिबानी संघटनेवर आंतराष्ट्रीय स्थळावरून जर दबाव लवकरात लवकर आणला नाही तर त्यांची महत्वकांक्षा हि वाढेल आणि ती पाकिस्तान काबीज करण्या इतपत जाईल. कारण तालिबानचा मूळ जन्म हा उत्तर पाकिस्तानात झाला आहे. आणि पाकिस्तान ह्या मुस्लिम राष्ट्राची भारताबद्दलची मते हि चांगली नाहीत. पाकिस्तानात सत्ता परिवर्तन चे सूर आधीपासून घोंघावत आहेत. इम्रान खान ह्यांच्या विरोधात त्यांच्याच देशात कट्टरपंक्ती लोकांकडून प्रचार सुद्धा चालू आहे. इतकंच नाही तर तालिबान ला समर्थन देणारे देखील पाकिस्तान आहेत. पश्तू भाषेत मदरसेत शिकणाऱ्या विद्यार्थी ला तालिबान म्हंटले जाते. ह्याचा अर्थ विद्यार्थी दशेतच मुलांवर अमानवी कट्टर धार्मिक संस्कार घडवून आतंकी सैन्य उभे करायचे आणि युद्धाच्या साह्याने धार्मिक विजय मिळवायचा. सध्याचा तालिबान युक्त अफगाणिस्तान भारतापासून हजारो किलोमीटर जरी दूर असला तरी पाकिस्तान सारख्या धूर्त देशावर विश्वास ठेवणे भारताला महागात पडेल. भविष्यात जर अफगाण , पाक अन चीन हे राष्ट्र एक झाली अन भारताविरुद्ध युद्ध पुकारले तर त्यासाठी भारत पुन्हा एकदा सर्व शस्त्रसाठ्यासह सज्ज असावा म्हणून सावधान हिंदुस्थान इतकंच सांगावस वाटत.
भारतातले काही हिंदुत्वादी नेते संघटना अखंड भारताच्या नकाशात जाहीरपणे अफगाणिस्तान चा उल्लेख करतात. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत म्हणून साजरा करतात. त्यांची महत्वकांक्षा हि अफगाण च्या सीमेपर्यंत जरी असल्या तरी त्या प्रत्येक्षात उतरवणे शक्य नाही कारण भारताची बहुतांशी जनता हे धार्मिक बाबीत एक नाही.देशांतर्गत आपल्या आपल्यातच आपण खूप धार्मिक वैर निर्माण केले आहे. सोशल मीडियावर धार्मिक दंगली आणि त्याचे तरुणाच्या मनावर पडणारे पडसाद हे भविष्यात देशाला देशाच्या प्रगतीला पोषक नाहीत. आपण कोणत्या धर्माचे आहोत ह्या पेक्ष्या आपण भारतीय आहोत आणि भारतीय हाच माझा धर्म म्हणून आपण एक नाही झालो आणि धर्मांतराच्या खोट्या प्रवाहात असाच वाहत गेलो तर आपले शेजारील शत्रू राष्ट्र त्याचा गैरफायदा घेऊन आपल्यावर अधिकार गाजवू शकतात किंवा धर्माच्या नावावर देशाचे पुन्हा एकदा विभाजन करू शकतात. हे लक्षात ठेवले पाहिजे कि सैन्य हे भारतीय सीमेचे रक्षण करू शकतात तिथे लढा देऊ शकतात पण देशांतर्गत प्रत्येक ठिकाणी पोहचणे सैन्याला शक्य नाही म्हणून सावधान हिंदुस्थान इतकंच सांगावस वाटत.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment