सांगली, सातारा, सोलापूर
अन कोल्हापूर हे चार जिल्हे म्हंणजे आपलं दक्षिण महाराष्ट्र. शेती अन कारखान्यांसाठी
तसेच कामगारांचा प्रदेश म्हणून ओळख असणाऱ्या ह्या भागाला खूप मोठा सांस्कृतिक अन अध्यात्मिक
वारसा हि लाभलेला आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची, छत्रपतींच्या स्वराज्याची,
साहित्यकारकांची अन देवांची हि देवभूमी म्हणजे आपली दक्षिण महाराष्ट्र. ह्या दक्षिण
महाराष्ट्रात अनेक कवी, विचारवंत, रसिक तसेच अनेक नवोदित लेखक उदयास येत आहेत. ह्या
सर्वांसाठी एका व्यासपीठाची गरज निर्माण झाली होती आणि ह्याच विचारांवर १९८२ साली यशवंतराव
चव्हाण यांच्या प्रेरणेने दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना झाली. द म सा हि
एक महाराष्ट्रातील महत्वाची साहित्यसंस्था आहे. तीन दशकांहून अधिक काळ ती पश्चिम महाराष्ट्र
व सीमावर्ती भागात वाङ्मयीन सुरुपाचे कार्य करीत आहे.
दक्षिण महाराष्ट्र, बेळगाव,
कारवारपर्यंत पसरलेल्या गोवा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच कोकण मुलुखातील साहित्यिकांसाठी
चर्चा, मंथन, मार्गदर्शन आणि उदबोधन करण्या हेतू कृ गो सूर्यवंशी ह्यांच्या अध्यक्षतेखाली
१४ एप्रिल १९८२ रोजी कोल्हापूर इथे ह्या संस्थेचे कार्य सुरु झाले. ह्या संस्थे मार्फत
अनेक उपक्रम राबवले जात आहे त्यात प्रामुख्याने साहित्यिकांचे मेळावे, कृतिसत्रे, चर्चासत्रे,
कार्यशाळा, नवलेखक शिबीर, परिसंवाद भरवणे, पुरस्कार प्राप्त लेखकांचा सत्कार करणे,
ग्रंथ प्रकाशन करणे तसेच ग्रंथ स्पर्धा घेऊन पुरस्कार हि दिले जातात. मराठी वाचकांसाठी
वाचकांची अभिरुची समृद्ध व्हावी, नवोदित लेखक, कवी, समीक्षक याना व्यासपीठ लाभावे यासाठी
द म सा तर्फे दरवर्षी साहित्य संमेलन भरवण्यात येते. संस्थे मार्फत ग्रामीण शब्दकोश
समिती स्थापन केली असून "ग्रामीण शब्दकोश" तयार करण्याचं काम हि चालू आहे.
तसेच ह्या संस्थे तर्फे "दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका" या त्रैमासिक
अंक नियमितपणे प्रकशित केला जात आहे. कथा, कविता, समीक्षा विषयक लेख, पुस्तक परिचय
या स्वरूपाच्या प्रस्थापित आणि नवोदित लेखकांच्या लेखनातून ह्या त्रैमासिक ला भरभरून
प्रतिसाद मिळत आहे.
सध्या द म सा चे अध्यक्ष
डॉ. विजय चोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या संस्थेचं कामकाज चालू आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस फाऊन्डेशन पुणे तर्फे देण्यात
येणार प्रथम क्रमांकाचा "स्वामी" कार "रणजित देसाई पुरस्कार" ने
या संस्थेचा गौरव हि करण्यात आला अशी माहिती डॉ. विनोद कांबळे ह्यांनी दिली. ह्या संस्थेची
महत्वाची बाजू म्हणजे दक्षिण महाराष्ट्रात जी छोटी साहित्य संमेलन भरवली जातात जसे
कि "ग्रामीण साहित्य संमेलन" "जागर कलासाहित्य संमेलन" याना मार्गदर्शन
करून त्यांना योग्य ते सहाय्य केले जाते. महाराष्ट्रातील संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांचे
लेख प्रसिद्ध करून, साहित्यिक उपक्रम राबवून वाङ्मयीन चळवळ पुढे नेणारी हि संस्था असल्याने
तिचे एक वेगेळेपण सिद्ध झाले आहे.
सचिन कृष्णा तळे


No comments:
Post a Comment