Thursday, 4 August 2022

पुस्तकांचं गाव

 


२७ फेब्रुवारी, २०१५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा सांस्कृतिक मंत्री मा. श्री. विनोद तावडे यांनी भाषा गौरव दिनाच्या सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना इंग्लंडमधीलहे ऑन वेया पुस्तकाच्या गावाचा संदर्भ देऊन, महाराष्ट्रातही असेपुस्तकांचं गावनक्की आकाराला येऊ शकेल, असा विचार मांडला. दिनांक मे, २०१७ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देशातील या पहिल्या पुस्तकांच्या गावाचे लोकार्पण भिलार, ता. महाबळेश्वर येथे करण्यात आले. भिलार ह्या गावाची निवड करताना ह्या बाबी सरकारने लक्ष्यात घेतल्या त्या म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जास्तीत जास्त पर्यटकांची वर्दळ असणारे त्या ठिकाणाजवळचे गाव असावे, तसेच पर्यटकांसाठी राहण्याची/जेवणाची किमान सोय असणारे गाव असावे, तंटाबंदी, दारुबंदी, स्वच्छता आणि पर्यटनविषयक विविध शासकीय योजनांमध्ये अग्रेसर असलेले गाव असावे.

 

पुस्तकांचे वर्गीकरण झाल्यानंतर विविध साहित्याचा पुरवठा झाल्यानंतर प्रकल्पात सहभागी घरे सार्वजनिक ठिकाणे येथे साहित्यप्रकारनिहाय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी अत्यंत कल्पकतेने आणि अभिनव पद्धतीने पुस्तकांची मांडणी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी सुमारे ३५० ते ७०० अशा संख्येने पुस्तके ठेवण्यात आली. प्रथम टप्प्यात एकूण १५,००० पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली. या प्रकल्पात २५ ठिकाणचे ग्रंथालयात रुपांतर करण्यात आले. अशा प्रकारे संपूर्ण गावाचेच एका मोठ्या सार्वजनिक ग्रंथालयात रुपांतर झाले आहे. प्रकल्पात सहभागी झालेल्या घरे किंवा सार्वजनिक ठिकाणी शासनाकडून पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे, पुस्तकाचे फिरते स्टँड, टेबल, खुर्च्या, टिपॉय, बोधचिन्ह असलेली छत्री, बीन बॅग, नोंदवही, अभिप्राय वही, घरांवरील पाटी, घरांबाहेरील दिशादर्शक पाटी अशा विविध पूरक साहित्याचा पुरवठा करण्यात आला.

 

नामवंत लेखक, प्राध्यापक, ग्रंथपाल इत्यांदीचा समावेश असलेल्या पुस्तक निवड समितीने पुस्तकांची निवड करण्यासाठी वेळोवळी बैठका घेतल्या. बैठकांमध्ये उपलब्ध प्रकाशन सूच्यांच्या आधारे पुस्तके निवडण्यात आली. प्रत्यक्ष पुस्तके पाहिल्यानंतर अधिक नेमक्या आणि व्यापक पद्धतीने पुस्तक निवड होऊ शकते, हे लक्षात घेऊन थेट निवडक प्रकाशकांकडे जाऊन पुस्तकांची निवड करण्यात आली.कथा, कादंबरी, कविता, चरित्र-आत्मचरित्र अशा रूढ साहित्यप्रकारांसोबतच विज्ञान, क्रीडा, नियतकालिके, विविध कलांविषयक, परिवर्तन चळवळ, निसर्ग-पर्यटन-पर्यावरण, दिवाळी अंक, लोकसाहित्य, मराठी भाषा संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन इतिहास अशा वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारांची विविध घरांत मेजवानी आहे. ह्या प्रकल्पातील काही सहभागी घरांमध्ये आणि गावात इतरत्रही निवास भोजनाची सशुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. डॉ. .पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. हेच औचित्य साधून पुस्तकांचं गाव, भिलार येथे शनिवार दि. १२ रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी वाचनध्यास या एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


सचिन कृष्णा तळे



No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale