जे चांगले
ते वाचलेच पाहिजे, पण त्यासाठी चांगले साहित्य, ग्रंथ, वेगवेळ्या विषयावरील पुस्तके
हे तुमच्या हातात हवी. अनेकांना वाचनाची आवड असते पण ती सगळी पुस्तक विकत घेणे शक्य
नसते. अश्यावेळी आपण ग्रंथालय ची वाट धरतो. वाचनालय च्या शोधात निघतो. वाचनालय आपल्या
घरा शेजारी असेल तर ठीक नाही तर कंटाळा करतो. यावरून कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक या संस्थेचे विश्वस्त
श्री. विनायक रानडे याना एक कल्पना सुचली . वाचक जर पुस्तकांपर्यंत पोहचू शकत नसेल
तर पुस्तकांनी वाचकांपर्यंत पोहचायला हवे यातूनच
२००९ रोजी " ग्रंथ तुमच्या दारी " हि योजना अस्तित्वात आली आणि बघता
बघता देश विदेशात पोहचली.
वाचकांना
त्यांच्या घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचा हट्ट रानडे ह्यांनी धरला.
या उपक्रमांतर्गत वाचनालयापासून लांब राहणार्या ३५ वाचकांच्या गटाला १०० मराठी दर्जेदार
पुस्तकांची ग्रंथपेटी निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आले. हा ग्रंथपेट्यांचा विस्तार
वाढत गेला आणि आज सुमारे १७०० हुन अधिक पेट्या ह्या असंख्य वाचकांपर्यंत पोहचल्या.
विदेशातल्या मराठी माणसांसाठी आपल्या आवडत्या साहित्यिकांची ग्रंथ संपदा उपलब्ध व्हावी,
अशी विनंती महाराष्ट्र मंडळ नेदरलँड् ह्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वाचनालय समिती
कडे केली आणि प्रत्येकी २५ पुस्तके असलेल्या १२ पेट्या नेदरलँड्समधील मराठी वाचकांना
मिळाली. निवासी भागाबरोबरच छोट्या औद्योगिक कंपन्या, दवाखाने, पोलीस स्थानक, वनवासी
पाडे, इतकेच काय कारागृहातसुद्धा ग्रंथपेट्या आजवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
राज्याबाहेरील गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, सिल्व्हासा, कर्नाटक येथील मराठी वाचकांनादेखील
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आली. सातासमुद्रापार या
योजनेचा विस्तार होऊ लागला दुबई, यूएई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, फिनलँड,
वॉशिंग्टन डीसी, कॅलिफोर्निया, ओमान, मॉरिशस, सिंगापूर येथील मराठी वाचकांसाठी दीड
हजारहून जास्त ग्रंथपेट्यांद्वारे अंदाजे २ कोटीहून जास्त मूल्य असलेली १ लाखहून अधिक
पुस्तके उपलब्ध झाली. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या ६५ शाळांत १०० बोलक्या पुस्तकांची
एक पेटी याप्रमाणे वितरण सुरू आहे.
जगभरात जिथे
मराठी शब्द आहे, जिथे मराठी भाषा आहे, जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे हि योजना जावी
यासाठी रानडे सर प्रयन्त करत असतात. रानडे सर म्हणतात कि प्रिंटेड पुस्तके वाचून जो
आनंद मिळतो तो इ पुस्तकात नाही. प्रिंटेड पुस्तके हे जास्त परिणाम कारक असतात. १९९०
मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान अंतर्गत सुरु झालेली हि वाचन चळवळ आज खऱ्या अर्थाने लोकप्रिय
ठरत आहे. अनेक माध्यमातून ह्या चळवळीची अन रानडे सरांची दखल घेतली गेली आहे.
सचिन कृष्णा
तळे

No comments:
Post a Comment