Tuesday, 16 August 2022

सावरकर साहित्य संमेलन

 

सावरकर साहित्य संमेलन




 

जयोस्तुते हे स्वातंत्र्य देवतेचं एकमेव स्तोत्र ज्यांना स्फुरलं ते स्वातंत्र्यवीर सावरकर, ने मजसी ने परत मातृभूमीला हे अजरामर महाकाव्य लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, अंदमानात कागद-लेखणी दिली नाही तरी भिंतीचा कागद आणि काट्या-खिळ्यांची लेखणी करून साहित्य सेवा करणारे एकमेव साहित्यिक सावरकर, महाकाव्य म्हणजे काय हे कळायचं वय नसताना महाकाव्य लिहिण्याची आकांक्षा ठेऊन ती पूर्णत्वास नेणारे महाकवी सावरकर, आपली लेखणी तलवारीसारखी चालवून ब्रिटिशांना त्रस्त करणारे वीर सावरकर, ज्यांच्या मॅझिनीच्या पुस्तकाच्या 25-26 पानी प्रस्तावनेलाच गीतेचा मान मिळाला ते सावरकर.

 

अनेक सावरकरप्रेमी एकत्र येतात आणि एक सावरकर साहित्य संमेलन भरवतात. त्यामुळे भारतात आणि भारताच्या बाहेरही अनेक सावरकर साहित्य संमेलने होतात. आपली लेखणी खड्गासारखी चालवणाऱ्या सावरकरांनी जेव्हा राष्ट्राला आवश्यकता होती, तेव्हा साहित्यिकांना लेखण्या मोडून बंदुका हाती घ्यायला सांगितलं. राष्ट्रसंरक्षणार्थ प्रथम रायफल क्लबात घुसा, रडगाण्यांच्या नि रडकथांच्या साहित्य संमेलनात नंतर अशी हाक देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव असलेली काही साहित्य संमेलने भारावली गेलीत.

 

- सावरकर सेवा संस्था आणि सावरकर मित्र मंडळ यांनी भरवलेले पहिले सावरकर विश्व संमेलन मॉरिशसमध्ये भरले होते तर दुसरे दुबई मध्ये.

- काठमांडू (नेपाळ) मध्ये तिसरे सावरकर मराठी विश् साहित्य संमेलन ११--२०१३ रोजी भरले होते.

- अंदमानच्या इतिहासात शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने पहिले सावरकर मराठी साहित्य संमेलन भरवले गेले तर दुसरे साहित्य संमेलन १० फेब्रुवारी २०१२ रोजी श्रीलंकेत भरले होते.

- स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यासमंडळ, मुंबईतर्फे दरवर्षी  सावरकरी विचारांचे साहित्य संमेलनं भरवण्यात येते.

- २०१७ साली ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन झाले होते.

- स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे कल्याणच्या कॅ. . मा. ओक विद्यालयात २२ डिसेंबर २०१९ रोजी 'अखिल भारतीय' सावरकर साहित्य संमेलन झाले.

-  महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथे फेब्रुवारी २०१९ रोजी एक अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन झाले.

-  स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ (औरंगाबाद) यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन भगूर येथे झाले.

- स्वातंत्र्यवीर सावकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई) स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या सहकार्याने सावरकर साहित्य संमेलन रत्नागिरी येथे २९-३०-३१ जानेवारी २०१६ या काळात झाले.

सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale