आम्ही
‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार
बहुजनांना
शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक, आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे लोककल्याणकारी राजा, अठरा पगड जातीनां एकाच पंगतीत जेवू घालणारा एक महामानव, शेतकरी
बांधवांचा खरा बळीराजा, सत्ता, संपत्ती, वैभव सारे हाती असताना जनसेवेसाठी तळमळीने कार्य करणारा दानशूर राजा, माणसातला माणूस जपणारा आणि दुर्बल वंचितांचा आवाज आणि नेत्तृत्व म्हणजेच आपले कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत आणि आपण त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. २६ जुन हा
शाहु महाराजांचा जन्म दिवस ”सामाजिक न्याय दिन”म्हणून साजरा करतो. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ अशा शब्दांत त्यांना गौरविलेले आहे.
शाहू
महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी
कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत घाटगे, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव
राधाबाई होते. २००५ पर्यंत महाराष्ट्रासह देशभरात राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिनांक २६ जुलै म्हणून
प्रचलित होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० साली महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात शाहुजन्म २६ जूनला झाल्याचे
लिहिले होते. त्यामुळे शाहू महाराज यांची खरी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये इतिहासतज्ज्ञांनी व साहित्यिकांची एक
समिती नेमली. संशोधनांती उपलब्ध कागदपत्रांनुसार समितीने १५ जून २००६
रोजी असा निष्कर्ष काढला की छत्रपती शाहू
महाराजांची जन्म तारीख २६ जून १८७४
आहे.
कोल्हापूर
संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी
१७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे
नाव ठेवले. सन १८८९ ते
१८९३ या चार वर्षांच्या
कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१
रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू
विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे
वय १७ वर्षांचे होते
आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून
कमी होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू
अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते.
इ. स. १८८५ मध्ये
त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर
धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम.
क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले.
इतिहासाने
मान्य केले आहे कि, राजा हा कधी जन्माला
येत नसतो, तर तो आपल्या
कर्तृत्वाने नावलौकिक मिळवतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शाहू महाराज होय. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार
केला. शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा केला. स्त्री पुनर्विवाह कायदा केला. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले. कोल्हापूर येथे “शाहपूरी” ही गुळाची बाजारपेठ
सुरु केली. शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली. अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वस्तीगृह स्थापन
केले.१५ टक्के शिष्यवृत्तीची
घोषणा केली. हातात आलेला राजदंड वापरुन शाहू महाराजांनी सर्व प्रथम वर्णभेदाची उतरंड उध्वस्त केली. शेतकऱ्यांची दुष्काळाच्या दारातून मुक्तता व्हावी यासाठी राधानगरीचे धरण बांधले. कुलकर्णी वतन नष्ट करुन तलाठीपद निर्माण केले, बलुते पध्दती नष्ट केल्या, पुर्वाश्रमीच्या गुन्हेगारांना मुक्त केले त्यांचे कार्य असे होते कि, त्याला मर्यादाच नव्हती. ४८ वर्षांचं आयुष्य
मिळालेल्या शाहू महाराजांनी सर्वांसाठी शिक्षण, स्त्रियांच्या हक्कांसाठी कायदे, जातीभेदावर प्रहार, दुष्काळ निवारण, पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि शेती-उद्योग क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले म्ह्णून आज समाजात एकता
दिसून येते. ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’
इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता.जे पालक आपल्या
मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड
आकरण्याची कायदेशीर तरतूद महाराजांनी केली. अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली.
सचिन
कृष्णा तळे

No comments:
Post a Comment