Friday, 19 July 2024

एकीकडे वाघनखाचा सोहळा, दुसरीकडे विशाळगड सारख्या अनेक किल्ल्यांचा आक्रोश राजे पाहवत नाही हे ... !! .

 

एकीकडे वाघनखाचा सोहळा, दुसरीकडे विशाळगड सारख्या अनेक किल्ल्यांचा आक्रोश

राजे पाहवत नाही हे ... !! .

 


" अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या ज्या ठिकाणी पराक्रम गाजवला ज्या ज्या वस्तुंनी अन वास्तू वर लढा दिला ते सगळे महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी प्रिय आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात स्वराज्याची राजधानी असलेला विशाळगड हा तिथे चालू असलेल्या धार्मिक अतिक्रमण ने आक्रोश करतोय तर दुसरीकडे जी वाघनख घालून महाराजांनी ज्या अफजल चा कोथळा बाहेर काढला त्या वाघनखांचा सोहळा. छत्रपती या शब्दावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींनी ती वाघनख पाहून आनंद साजरा करावा कि महाराजांची जी गडकिल्ले राखली त्याची अवस्था पाहून दुःख करावं. इथले बांधकाम पाहिल्यास, गड नेमका कसा असतो हे विसरून जाऊ अशी भीती वाटते आज. किल्ल्यांची मालकी सध्या महाराष्ट्र सरकार च्या अंतर्गत राज्य पुरातत्व विभागाकडे असताना गडावर अतिक्रमण ला कारवाई करणाऱ्या अधिकारी यांचं निलंबित कधी करणार ? "

 

गडावरील अतिक्रमण विरोधात जे आंदोलक जमले त्यांना गडावर जाणाऱ्या दिशेने पोलिसांनी रोखलं. त्यामुळे तिथे जमलेल्या शिवप्रेमींच्या हातून पायथ्याशी असलेल्या गजापूर आणि मुस्लिमवाडी या दोन ठिकाणी अनपेक्षित घटना घडल्या त्याचा प्रतिसाद देशभरात उमटले, हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून या घटनेला दंगलीच रूप देण्याच पाप काही मंडळी जाणूनबुजून करताना दिसतायत. जे घडलं ते निषेधार्थ आहे. पण विशाळगडावर जे घडवलं जात आहे ते हि निषेधार्थ आहे हे आपले मुस्लिम बांधव कधी समजून घेणार ! विशाळगड जिंकण्यासाठी आलेला सरदार मलिक रेहान हा तुमचा देव कसा होऊ शकतो?

 

महाराजांना यवनांच्या तावडीतून सुखरूप पोहचण्यासाठी बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू या दोन सख्या भावंडानी या विशाल गडाच्या पायथ्याशी घोडखिंड उभी करत रक्ताने माखलेल्या अवस्थेत मावळ्यांच्या रक्ताच्या वाहत्या प्रवाहात शेवटचा श्वास घेतला ! पन्हाळा च्या वेढ्यातून छत्रपतींचा प्राण ज्यांनी वाचवला त्या दोन महापुरुषाच्या ह्या समाध्या आजही ऊन वारा पाऊस सोसत उघडयावर आहे. ना त्यावर दिवाबत्ती ना फुलांची माळ ना प्रकाश. उलट याच गडावर घरे आणि काही दर्गा मशिदी उभारले जातात. त्यांना वीज , पाणी , अन्नधान्य इतकंच नाहीतर दुकानांना परवानगी देखील दिली जाते. या वस्ती मुळे मोठ्या प्रमाणात होणारा कचरा अन अवैध्य रित्या चालवले जात असलेले हॉटेल्स. जे शिवप्रेमी गडाला भेट देण्यासाठी येतात त्यांना काही ठिकाणी दारू चे बाटल्या देखील आढळून आल्यात. अश्यावेळी त्या शिवप्रेमींकडून राग व्यक्त होणे हे साहजिकच आहे. आणि हाच राग गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर मांडला जात आहे. जे आजवर गडावर गेले नाहीत ते देखील तिथली अवस्था पाहून अस्वस्थ आणि राग व्यक्त करत आलेत. ह्याच रागाचा एक भाग म्हणजे झालेली घटना आहे हे मुस्लिम बांधव कधी समजून घेणार

 

विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेले काही दिवस आंदोलनाचा इशारा दिला जात होता. पण, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संभाजीराजे यांनीचलो विशाळगडचा नारा दिला. त्यानुसार राज्यभरातील शिवभक्त सकाळपासूनच गडावर पोहोचू लागले.  अतिक्रमण केलेल्या दुकानांची मोडतोड, तोडफोड केली. यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. दुपारनंतर गडावरील परिस्थिती आटोक्यात आली. दोषीवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली. ज्या काही घटना घडल्या त्या घडायला नको होत्या, पण तो शिवभक्तांचा आक्रोश होता. जर सरकारने दोन दिवस आधीच हा निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. प्रसंगी माझ्यावर गुन्हा दाखल करा पण शिवभक्तांवर गुन्हे दाखल करू नका, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. उलट याच शिवभक्तांना कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज अतिरेकी ठरवतात. तर याच दिवसांत साताऱ्यात शिवप्रेमी साठी सरकार तर्फे वाघनखांच दर्शन.

 

विशाळगड मार्गावर असलेल्या गजापूरला ऐतिहासिक महत्व आहे. या गावाने स्वराज्यात अनेक मोहिमा पाहिल्यात. अनेकांना आश्रय दिलंय. या गावातील लोकांचा देखील हेच म्हणे आहे कि "गडावरील अतिक्रमणाची शिक्षा आम्हाला का". आंदोलक येणार आणि तिथे काहीही होऊ शकत याची पूर्वकल्पना प्रशासन असताना प्रशासन ने पोलीस बंदोबस्त गडासोबत या मुस्लिम वस्तीत का वाढवली नाही हा सुद्धा एक प्रश्न इथे उपस्थति राहतोच. राग कोणत्या प्रकारे आणि कुठे निघेल हे सांगता येणार नव्हतं. खरंतर गडांचं अस्तित्व फार पूर्वीपासूनचं; पण निसर्गाच्या, संरक्षणाच्या, विकासाच्या व राजकीयदृष्ट्या गडकिल्ल्यांचे महत्व शिवरायांनी जाणले आणि त्यांच्याच आधारे इथली संस्कृतीही राखली. हीच संस्कृती पुन्हा राखण्यासाठी गजापूर चे रहिवाशी शिवप्रेमींना मदत करतील का? पायथ्याशी असलेल्या लोकवस्ती याना गडावर चालेल्या अतिक्रमण ची माहिती होती तर त्यांनी विरोध का केला नाही? याच गजापूर आणि मुस्लिम वाडीतील काही लोकांचे दुकाने गडावर नसतील का ?

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फायदा घेत कितीही राजकारण केले आणि 'जय भवानी जय शिवाजी' म्हणत कितीही मोठमोठ्या घोषणा दिल्या तरीही शिवाजी महाराजांच्याप्रती असणारी आस्था ही केवळ राजकीय स्वार्थासाठीच असल्यामुळे किल्ल्यांची दुर्दशा झालेली आहे. नुसता अभिमान बाळगून काय उपयोग? आपल्या पुढच्या पिढीसाठी किल्ल्यावरील बांधकाम मध्ये काही दुरुस्ती करून पुढील पिढी साठी संरक्षित करणे गरजेचे आहे. हे करताना मूळ वास्तूला धक्का न लावता काहीतरी चांगले करणेच गरजेचे आहे.महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे मूळ स्वरूपात जतन करणे, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखणे तसेच या किल्ल्यांची दुरुस्ती, संरक्षण-संवर्धन व देखभाल करण्यासाठी गड-किल्ले संवर्धन समिती नेमण्यात आली आहे तसेच पुरातत्व खात देखील आहे. विशाळगड एकेकाळी पूर्ण स्वराज्यतला अतिशय कणखर आणि सुरक्षित किल्ला.  किल्ला वर  शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन सिद्दी च्या वेढ्यातून सुटले आणि संभाजी महाराज च्या मृत्यूनंतर राजाराम महाराज पण रायगड वरून याच किल्ल्यावर आश्रय घेतला. असा हा बेलाग किल्ला हल्ली हा आता फक्त नवसा साठी पावणारा प्रसिद्ध दर्गा साठी प्रसिद्ध आहे. एकेकाळी स्वराज्याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या तसेच स्वराज्याचे वैभव असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंना अवकळा पसरली आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गडकिल्ल्यांच्या ढासळलेल्या भिंती आणि बुरुज, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, जीर्ण झालेले माहिती फलक अशी सद्यस्थिती महाराष्ट्रातील जवळपास सर्वच किल्ल्यांची आहे. किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे किल्ले दुर्लक्षितच राहिले. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी रान माजले आहेत, तट फोडून बाहेर झाडांची मुळे बाहेर आली आहेत, ठिकठिकाणी दलदल वाढले आहे यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांची दुरवस्था फारच बिकट आहे. किल्ल्यांच्या डागडुजी साठी महाराष्ट्रात निधी लवकर मिळत नाही आणि मिळाला तरी तो सगळाच निधी संवर्धन समितीपर्यंत पोहचत नाही. आपल्याला शिवाजी महाराज हे फक्त घोषणा द्यायला आणि त्यांच्या नावाने सत्तेचे आणि जातीपातीचे राजकारण करण्यासाठी हवे आहेत … त्यांचा वैचारिक वारसा, त्यांचे शौर्य, त्यांचा प्रताप, त्यांचा स्वाभिमान वगैरे गोष्टींशी आपला काहीही संबंध राहिलेला नाही  हेच सत्य आहे.

 

 - सचिन कृष्णा तळे 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale