मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
Tuesday, 5 December 2017
Thursday, 16 November 2017
Sunday, 12 November 2017
माझ्या भीमाची पुण्याई
भीमाची पुण्याई , सात जन्मा लाभली
त्याच्या कष्टाने , मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
माझ्या भीमाची पुण्याई, मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
बहुजनांचा मानवी हक्कांचा
कोट्यवधी पददलितांचा
राजा भीमराव आंबेडकर माझा
हाय निळ्या आभाळाचा
आरे ... निळी पालखी मी ही आज थाटात मिरवली
माझ्या भीमाची पुण्याई, मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
त्या चवदार तळ्याची
ह्या दिल्लीच्या तख्त्याची
संविधानात रंगवली
बाबानी भारताची लोकशाही
आरे .. गोरगरिबांचा हा त्यानं ज्योत ज्ञानाची पेटवली
माझ्या भीमाची पुण्याई, मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
अठरा अठरा तास अभ्यास
जीवनाचा होता ध्यास
राजकीय अन सामाजिक
विश्व वक्ता होता खास
आरे .. अश्या ह्या विश्वाची , मला मिळाली संजिवनी
माझ्या भीमाची पुण्याई, मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
तो अन्याया साठी लढला
तो माझ्या तुझ्या साठी झिजला
जो आला आणि जिंकला
जो शांती सूर्य झाला
आरे .. अश्या ह्या सूर्याची , प्रकाश वाट मी पाहिली
माझ्या भीमाची पुण्याई, मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
सचिन कृष्णा तळे
पुणे
त्याच्या कष्टाने , मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
माझ्या भीमाची पुण्याई, मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
बहुजनांचा मानवी हक्कांचा
कोट्यवधी पददलितांचा
राजा भीमराव आंबेडकर माझा
हाय निळ्या आभाळाचा
आरे ... निळी पालखी मी ही आज थाटात मिरवली
माझ्या भीमाची पुण्याई, मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
त्या चवदार तळ्याची
ह्या दिल्लीच्या तख्त्याची
संविधानात रंगवली
बाबानी भारताची लोकशाही
आरे .. गोरगरिबांचा हा त्यानं ज्योत ज्ञानाची पेटवली
माझ्या भीमाची पुण्याई, मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
अठरा अठरा तास अभ्यास
जीवनाचा होता ध्यास
राजकीय अन सामाजिक
विश्व वक्ता होता खास
आरे .. अश्या ह्या विश्वाची , मला मिळाली संजिवनी
माझ्या भीमाची पुण्याई, मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
तो अन्याया साठी लढला
तो माझ्या तुझ्या साठी झिजला
जो आला आणि जिंकला
जो शांती सूर्य झाला
आरे .. अश्या ह्या सूर्याची , प्रकाश वाट मी पाहिली
माझ्या भीमाची पुण्याई, मिळाली मानाची चाकरी ... मिळाली मानाची भाकरी
सचिन कृष्णा तळे
पुणे
Monday, 6 November 2017
आभाळ भरारी
आभाळ भरारी
आभाळ भरारी ,लक्ष बाऊंड्री, मारू चौके छक्के
नवे विश्व् साकारण्या ,चाल अशी, पैज मैदानी जिंके
ह्या मातीने त्या धावपट्टीवर
उधळू अधीर गुलाल,
धर पकड ,घे विकेट
विजयाची ललकर
कालचा अंकुर , उद्या असेल ह्या वेलीवर फुले
आभाळ भरारी ,लक्ष बाऊंड्री, मारू चौके छक्के
अभिमानाची झुंज ही
स्त्री शक्तीची झंकार
गाव देश अन विदेश
असेल संघाचे नाव
एक जुटीने , मेहनीतीने , पूर्ण व्हावे स्वप्न सारे
आभाळ भरारी ,लक्ष बाऊंड्री, मारू चौके छक्के
उभ्या जन्माचा पाऊस ओला
बरसला कसा घरी
डोळ्यात जाग उरात आग
पुन्हा शून्यातून उजळणी
बेधडक चालू , खेळू , साकारू विश्व बापजन्माचे
आभाळ भरारी ,लक्ष बाऊंड्री, मारू चौके छक्के
नवे विश्व् साकारण्या ,चाल अशी, पैज मैदानी जिंके
सचिन कृष्णा तळे
आभाळ भरारी ,लक्ष बाऊंड्री, मारू चौके छक्के
नवे विश्व् साकारण्या ,चाल अशी, पैज मैदानी जिंके
ह्या मातीने त्या धावपट्टीवर
उधळू अधीर गुलाल,
धर पकड ,घे विकेट
विजयाची ललकर
कालचा अंकुर , उद्या असेल ह्या वेलीवर फुले
आभाळ भरारी ,लक्ष बाऊंड्री, मारू चौके छक्के
अभिमानाची झुंज ही
स्त्री शक्तीची झंकार
गाव देश अन विदेश
असेल संघाचे नाव
एक जुटीने , मेहनीतीने , पूर्ण व्हावे स्वप्न सारे
आभाळ भरारी ,लक्ष बाऊंड्री, मारू चौके छक्के
उभ्या जन्माचा पाऊस ओला
बरसला कसा घरी
डोळ्यात जाग उरात आग
पुन्हा शून्यातून उजळणी
बेधडक चालू , खेळू , साकारू विश्व बापजन्माचे
आभाळ भरारी ,लक्ष बाऊंड्री, मारू चौके छक्के
नवे विश्व् साकारण्या ,चाल अशी, पैज मैदानी जिंके
सचिन कृष्णा तळे
Friday, 3 November 2017
कुठली ही स्वप्ने
कुठली ही स्वप्ने
इथल्या मातीचा, एवढा सत्कार करावा
पुरस्कार घेण्या, भूमिपुत्रांची बळी पडावी
सरकार कोणाचे, लोकांचे लाभार्थींचे
योजना राबवणारे, भेटतील कुठल्या गावी
जो तो मागास आहे, खुशाल बंगल्यामध्ये
रेशनींग कार्डच्या, त्या कुजलेल्या पानी
खड्डे मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत
कुठली ही स्वप्ने, दाखवली नेत्यांनी
त्या कर्ज माफीचे, भरता पाने चार
शोधून थकलो, खऱ्या गरजूंची यादी
मराठी जिवंत आहे, जागी आहे थोडी
थोडी मनामध्ये थोडी मुंबई बेळगावी
आम्ही पाहावे स्वप्ने, त्या स्मार्ट सिटीचे
सचिन कृष्णा तळे
पुणे
इथल्या मातीचा, एवढा सत्कार करावा
पुरस्कार घेण्या, भूमिपुत्रांची बळी पडावी
सरकार कोणाचे, लोकांचे लाभार्थींचे
योजना राबवणारे, भेटतील कुठल्या गावी
जो तो मागास आहे, खुशाल बंगल्यामध्ये
रेशनींग कार्डच्या, त्या कुजलेल्या पानी
खड्डे मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत
कुठली ही स्वप्ने, दाखवली नेत्यांनी
त्या कर्ज माफीचे, भरता पाने चार
शोधून थकलो, खऱ्या गरजूंची यादी
मराठी जिवंत आहे, जागी आहे थोडी
थोडी मनामध्ये थोडी मुंबई बेळगावी
आम्ही पाहावे स्वप्ने, त्या स्मार्ट सिटीचे
सचिन कृष्णा तळे
पुणे
वाहे वाट माझी...
वाहे वाट माझी...
एका नदी काठी, डोंगर झाडांमधुनी
वाहे वाट माझी, हिरव्या पानांमधुनी
ते उन कोवळे, ते आकाश मोकळे
सांगे रोज कानी, राना वनांमधुनी
विहिरीचे पाणी, जात्यावरली गाणी
दिसे वेस पुराणी, माझ्या गावामधुनी
कौलारू घरे, शेणामातीचे उंबरठे
ओढ लागे शेताची, ह्या कवितांमधुनी
पक्ष्यांची गाणी, संत वाहणारे झरे
सूर जुळते नवे, ह्या संगीतांमधुनी
सचिन कृष्णा तळे
पुणे
एका नदी काठी, डोंगर झाडांमधुनी
वाहे वाट माझी, हिरव्या पानांमधुनी
ते उन कोवळे, ते आकाश मोकळे
सांगे रोज कानी, राना वनांमधुनी
विहिरीचे पाणी, जात्यावरली गाणी
दिसे वेस पुराणी, माझ्या गावामधुनी
कौलारू घरे, शेणामातीचे उंबरठे
ओढ लागे शेताची, ह्या कवितांमधुनी
पक्ष्यांची गाणी, संत वाहणारे झरे
सूर जुळते नवे, ह्या संगीतांमधुनी
सचिन कृष्णा तळे
पुणे
Thursday, 2 November 2017
तरीही.. ह्या देशात रोज बलात्कार होतोय !
तरीही ह्या
देशात
रोज
बलात्कार
होतोय
!
संध्याकाळची
वेळ होती, आकाश… प्रकाशातून अंधाराच्या दिशेला झुकत होत. घडाळ्यात ७ वाजले होते.
स्वयंपाक घरातून आई ने दाराकडे
नजर फिरवली. ते आता येतील
म्हणून तिने नाश्त्याचा चांगला बेत आकला होता. मुलगी दारातच खेळत होती, घरात आतबाहेर करत होती ,आवाज देत होती. दिसायला गोंडस, सुंदर जशी की राजपरी. ३
वर्षाची ही चिमुकली चालत
पळत आपल्या बोबड्या बोली ने व खेळकर
स्वभावाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेई.आजूबाजूचे सगळ्यांची ती लाडकी होती.
तितकीच ती हुशार देखील
होती. नजर लागेल अशी होती ती. आई रोजप्रमाणे स्वयंपाकगृहात
काम करत होती. काही वेळा नंतर तिला त्या राजपरिचा आवाज
येत नव्हता " आता कुठे गेली ही ... " असं म्हणत आई स्वयंपाक गृहातून
बाहेर आली . दारात मुलगी नव्हती ! शेजाऱ्यांकडे पाहिलं , विचारपूस केली परंतु तिथे ही ती आली
नाही. कदाचित मुलामुलींबरोबर बाजूच्या बागेत गेली असावी , म्हणून तिने बाजूच्या बागेत गेली . तिथे पाहिलं पण तिथे ही
ती गोंडस राजकुमारी दिसे ना ? सगळी कडे पाहून झालं. तितक्यात त्या मुलीचे वडील आले. दारात माणसे जमा होती , बायको रडत बसली होती. तिचा जीव घाबरला होता. काय करावं सूचनास झालत तिला. नवऱ्याला पाहून तिने त्यांना सगळं सांगितलं . आता संपूर्ण विभागात माहिती गेली. मंदिर व मस्जिद च्या
लाऊडस्पिकर वरून संदेश दिला . विभागातल्या मुलांनी आप आपल्या बाईकस
वरून तिचा शोध चालू केला. आपल्या डोळ्यादेखत क्षणात आपली चमुकली गायब कशी झाली. तिला तर आजूबाजूचा परिसर
सुद्धा माहित नाही. तरीही ही कुठे गेली
असावी. रात्र उजाडत होती आणि त्या आई बापाच्या काळजाला
अनेक प्रश्नांनी गिळण्यास सुरवात केली. शेवटी आजूबाजूंच्या सांगण्यावरून त्या मुलीचे वडील अन काही नागरिक
पोलिसांच्या मदत घेण्यासाठी धावले. प्रसंग लक्ष्यात घेऊन पोलीस ही घटनास्थळी दाखल
झाले. मुलीची माहिती व फोटो आसपासच्या
पोलीस कार्यालयात तुरंत पाठवण्यात आले. पोलिसांनी ही त्यांच्या संशयी
नजरेने त्यांच्या अभ्यासाने कारवाई चालू केली. शोधाशोध चालू केली. रात्र उजाडून अंधाराची वाट चालू लागली पण विभागातले सगळे
जागे होते. कुठे गेली असेल ती ? ठीक असेल ना ती ? काही
झालं तर नसेल ना
तिला ? असे बरेच प्रश्नांची चर्चा चालू होती.
शेवटी
मुलीची जात! बलात्कार आणि त्याच्या बातम्या रोज येत असत कानावर . २ वर्षाच्या निष्पाप
मुलीचा सुद्धा ह्या वासनांच्या घाणररड्या वृत्तीने जीव गेला होता. काहि कळत नव्हतं , निर्भया हत्याकांड ,कोपर्डी हत्याकांड सारखे घटना समोर येत होते. रात्रीचे ३ वाजले पहाट
होणार होती. अद्याप त्या मुलीचा पत्ता लागला नाही. एका क्षणासाठी ही नजरेआड न
राहलेली त्या परीला पाहण्यास त्या आई वडिलांची डोळे
आतुरलेले होते.त्यांचे नातेवाईक सुद्धा जमा झालते. तितक्यात
एक व्यक्ती आला त्याने त्या मुलीच्या वडिलांस बाजूला घेतलं." पोलिसांचा निरोप आलाय एका ठिकाणी बोलावलंय " पोलिसांच्या
ह्या संदेश ने वडिलांचे काळीज
धाडकन उडालं , जीव घाबऱ्यासारखा झाला . त्या मुलीचे वडील आणि चार पाच जण त्या ठिकाणी
निघाले . विभागाच्या बाहेर हायवे ला एका शेतात
पडक्या झोपडी कडे ते पोहचले. पोलिसांनी
तिथे जमावबंदी केली . काही श्वान घेत पोलीस त्या झोपडीच्या आजूबाजूच्या चकरा मारत होते. हे सर्व पाहून
वडिलांचे पाऊल पुढे पडत नव्हतं . कस बस त्यांना
पोलिसांनी व नागरिकांनी धीर
देत त्या झोपडीत एका बालकाचा चेहरा दाखवला आणि क्षणात त्यांच शरीर धरतीवर कोसळलं आणि मुलीच्या हि अवस्था पाहून
एकचं टाहो फोडला. त्या बापाच्या काळजाचा ठोका दुपट्टीने धडधड करू लागलं. त्यांचा सारा आसमंत रडू लागला. क्षणात ही बातमी गावभर
पसरली, जिल्हाभर पसरली , राज्यभर पसरली , देश पसरली. एक
हत्या झाली पुन्हा कोपर्डी पुन्हा निर्भया मारली गेली… पुन्हा वासनेने एका निष्पाप मुलीचा जीव घेतला .
हो
हत्या झाली , हत्या झाली ... एका मुलीची , एका आई ची, एका स्त्री ची , विश्वाला आपल्या
पोटी जन्माला घालणाऱ्या एका चिमुकल्या विश्वाची, माझ्या तुमच्या आपल्या लेकीची , मंदिरात
अन नवरात्रीला नऊ दिवस जिची उपासना केली त्या देवीची, मैत्रिणीची. हत्या झाली ओ .. त्या सुंदर , कोमल चिमुकल्या परीची
. जिला अद्याप विश्व् सुद्धा कळलं नाही , जिला अद्याप स्त्री आणि पुरुष ह्यातला भेद
सुद्धा कळलं नाही. ती हरवली कायमची . तिथे तिचे निर्वस्त्र शरीर पडले होते, रक्त वाहत
होत . त्या नराधामाने जेव्हा तिच्या वर अत्याचार चालू केला असेल तेव्हा ते किंचाळली
असेल , रडली असेल, तिने तिचा विरोध केला असेल. तिच्या बोबड्या शब्दात त्याला
" काका .. मला सोडा " अशी बोली असेल. पण त्या माणसाच्या काळजाला जरा ही भीती
वाटली नाही त्याने बलात्कार करून त्या मुलीचा जीव घेतला. त्याने तिला ह्या विश्वातून
दूर केलं, तिच्या आईवडिलांकडून दूर केलं. तेव्हा एक नाही तर अनके लोक मारली गेली. त्यावेळी
आईची माया मेली , बापामधला बाप मेला , शेजारच्या लोकांविरोधी विश्वास मेला , नाती मेली
.
पत्रकार
जमा झाले. ज्या जातीची होती त्या जातीतले लोक जमा झाले. गावातले लोक जमा झाले. मोर्चे निघाले. आरोपी पकडला गेला , पिंजऱ्यात वर्षानुवर्षे जगाला . खटले चालू झाले , निकाल लागला , त्या नराधमाला फाशी झाली . पण त्या निष्पाप
चिमुकलीचा काय दोष होता ...? ती का मेली
, का तिला मारलं गेलं. आरे हरामखोरा काय पाहिलंस तिच्यात त्या लहान मुलीत. काय पाहिलंस रे ... ?
सरकार
आणि हा कायदा किती
दिवस अश्या निरपराधी निष्पाप मुलींची बळी घेणार आहे. वर्षानुवर्षे ह्या देशात , ह्या जगात मुलींना जीव मुठीत घेऊन चालावं लागतय . भावा पासून भीती , बापापासून भीती , मित्रा पासून भीती , काका पासून भीती , शेजारच्या आजोबा पासून भीती , शिक्षका पासून भीती. किती भिती बाळगायची महिलांनी . का मुली मुलांसारखे
फिरू नाही शकत ? का मुलींना बुरखा
घालून फिरावं लागत ? का मुली सुरक्षित
नाही आज ? का सरकार ठोस
कडक कारवाई करत
नाही ? शिवाजी महाराजांनी असल्या आरोपीचा चौरंगा केला , त्याची हात पाय छाटून भर चौकात रोज
चाबूकचे दहा फटके देत सडत ठेवलं. कारण त्या घटनेने लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून. तरीही ह्या देशात रोज बलात्कार होतोय !
अंधाराच्या
वाटेवरी भरडताहेत स्रिया
जन्मा
आधीच डोळे मिटताहेत स्रिया
आई
म्हणून कुणास कुणास म्हणून ताई
वासनांतरी
चिखलात रुजताहेत स्रिया
सचिन
कृष्णा तळे
पुणे
Subscribe to:
Posts (Atom)
“कलियुग सुरू आहे!”
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale
-
फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहासफाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास पाकिस्तानातील मुल्तानमध्ये आजही उभा असल...
-
महाराष्ट्र साहित्य सभा , इंदूर पुण्य श्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केल्यानंतर मल्हारराव होळकर माळव्याचे सु...
-
🔴 माझं मत 🔴 “भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!” शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत आपण सतत अस्थिरता, सत्तापा...




