Monday, 21 September 2020

वृत्तवाहिनींचा उतावळेपणा

 वृत्तवाहिनींचा उतावळेपणा


कामावरून घरी आलाे आणि नेहमीप्रमाणे फास्ट सुपर फास्ट बातम्या ( फक्त एका आेळीचे) पाहण्यासाठी टिव्ही चालू केला. ठळक बातम्या एका वरून एक एेकताना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांची एक बातमी पाहिली. कि राजसाहेब ठाकरे ह्यांना मास्क न वापरला म्हणून १००० रूपयाचा दंड भरावा लागला वैगेरे वैगेरे... म्हंटले छानच काेणी ही असाे चूक झाली तर दंड भरलाच पाहिजे. पण एक जवाबदार नेता विना मास्क असा बाहेर पडणार नाही हे मात्र खात्री हाेती आणि चूकून जरी ते विना मास्क बाहेर पडले तर त्यांनी दंड भरला हे उत्तम. 


पण विषय पहा.. राज साहेब ठाकरे बाहेर कुठे हि गेलेच नाही तरीही त्या क्लिप्स ची पडताळणी न करता सहज ठळक बातम्या आपल्या वृत्तवाहिनी ने प्रसारित केली. बातम्या दाखवण्याचा हा उतावळेपणा कितपत योग्य आहे. असे किती बातम्यांवर आम्ही विश्वास ठेवावा कितीवर न ठेवावे? राेज कामावरून थकून जेव्हा आपण घरी येताे तेव्हा वृत्तवाहिनी हि एकमेव पर्याय असताे जिथून आपल्याला आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचा समाचार मिळत असताे. त्या ठिकाणा पर्यंत आपण पाेहचताे. तिथली परिस्थिती जाणून घेताे. आज हा जिवंत उदाहरण. 


वांद्रे स्टेशनवर जमलेली गर्दी हि त्याचाच एक भाग हाेता... 


ह्या अश्या बातम्यामुळे चुकिच्या माहितीने वृत्तवाहिनीचा विश्वास कमी हाेउ नये ह्यासाठी त्यांनीच पुढाकार घेयला हवा तरच लाेकशाहीचा चाैथा स्तंभ मजबूत राहिल. 


सचिन कृष्णा तळे

#आहेतेआहे




Saturday, 19 September 2020

नेतेहाे .. पुतळे नकाे आम्हाला...

 नेतेहाे .. पुतळे नकाे आम्हाला... 


राज्यकर्ते हाे आता बस करा पुतळे उभारणी. तुम्ही ज्या व्यक्तीचे पुतळे उभारणार आहात आणि उभारले आहेत त्या व्यक्तीच्या कार्याची त्याच्या विचाराची पुस्तके आणि ती पुस्तके लिहिणारे तसेच नव्या पिढीपर्यंत पाेहवणारी लेखक वाचक घडवा. त्याची गरज आहे. भारतातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक विद्यार्थी हा आरक्षणचा आधार न घेता त्यांला हव ते शिक्षण माेफत मिळेल हव ते वाचायला मिळेल असे विद्यापीठ ग्रंथालय घडवा. त्यांनी आपला ईतिहास माहित पडवा ह्यासाठी सरकारी कागद पत्रात वारसा विभागात असणारी नाेंदी पाहून त्यांच पुन्ह निर्माण करा. आपल्या राजाचे छत्रपतींचे गड किल्ले ताे भव्य सभामंडप ताे नगरा उभारून अभिमानाने वाजवा. 


समुद्राच्या पाेटात भर टाकून शिव स्मारक नकाे आम्हाला देयच असेल तर शिवनेरी राजगड उभारून दाखवा. इंदू मिलवर बाबासाहेबांचा पुतळा नकाे आम्हाला. हव तर विश्वात कुठेच पाहायला मिळणार नाही असे विश्व रूपी ग्रंथालय आमच्या बाबासाहेबांच्या नावाने उपलब्ध करून द्या. चाैकात महापुरुषांचे पुतळे नकाे आम्हाला हव तर त्यांच्या नावाने शाळा कॉलेज हॉस्पिटल तयार करून त्यांच्या कार्याचे माहितीपट सादर दाखवा. 


नेतेहाे.. खरच पुतळे नकाे आम्हाला आधीच जे पुतळे आम्ही उभारले ते कश्या आणि काेणत्या अवस्थेत आहे ते पहा.. आणि थाेड बदला.. मतदारांना काय हवय ते पहा... 


सचिन कृष्णा तळे

#आहेतेआहे



Friday, 18 September 2020

DNA झी न्युज - सुधीर चौधरी

 DNA झी न्युज - सुधीर चौधरी 


मी सहसा बातम्या पाहणं आता सोडून दिलंय. त्याच मुख्यं कारण म्हणजे अभ्यास पूर्वक माहिती कमी आणि व्यर्थ बडबड जास्त पाहण्यास मिळते. पण जर कधी वेळ मिळाला तर झी न्युज वरील सुधीर चौधरी ह्यांचा DNA हा सदर नक्की पाहतो. समोरच्या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचंय ते अचूक जाणून उदहारण सहित माहितीच्या आधारावर सध्या घडणाऱ्या घटनांवर हा माणूस आपल्याशी सवांद साधत असतो. त्यात कुठेही मला त्याचा स्वार्थ पणा जाणवला नाही. त्याचे विषय हि सुंदर असतात. 


काल त्यांनी DNA मध्ये "नायक " ह्या विषयवार खूप सुंदर असं विश्लेषण केलं. तो जर तुम्हाला मिळाला तर नक्की ऐका आणि पहा. 


"नायक" आपण आपल्या जीवनात चित्रपट विश्वातल्या कलाकारांना खूप महत्वाचं स्थान देतो त्यांना भुलतो त्यांच्यावर अफाट प्रेम करताे त्यांच्यासाठी जीव हि देण्यास तयार रहताे. त्यांच्या त्याच भूमिकेवर त्यांना आपण आपला नायक बनवतो. त्यांना follow करतो. भारतात तर काही अभिनेते ह्यांना अगदी देवासमान स्थान आहे ( अमिताभ बच्चन, रजनीकांत, खान इ.). पण पडद्यावर पैशे घेऊन लेखकाच्या शब्दावर कला फक्त कलाच सादर करणारा अभिनेता त्याच्या मूळ स्वभावात अगदी तसाच आहे का हाे? त्यांचे विश्व नक्की तसेच आहे का? 


आपण ह्या कलाकार मंडळींना जितकं डोक्यावर घेतो त्यांच्या एका झलक साठी तडफतो . त्यांच्या मागे मागे त्यांना follow करतो. अगदी त्याच वेडात आपण आपल्या आसपास असणाऱ्या काही चांगल्या माणसांना कर्तृत्वान पुरुषांना आपला नायक का नाही बनवत ? अमली पदार्थ च्या सेवन तर कधी माेठ माेठ्या पार्ट्या तर कधी गुन्हेगारी विश्वात त्यांचे संबंध वरून आपले नायक सदैव चर्चेत असतात. अनेकांवर गुन्हे देखील दाखल आहेत. असाे...!! 


अगदी ह्याच विषयाला धरून सुधरी चौधरी ह्यांनी काल काही छान उदाहरण दिले. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या जीवनात तुम्हाला आदर्श हवा असले तुम्हाला नायक हवा असेल तर आपल्या सीमेवरील सैनिकाना तो स्थान द्या ... आपल्या आसपास चांगल्या समाजसुधारकांना , चांगल्या शिक्षकांना , चांगल्या डॉक्टरांना , चांगल्या लेखकाला , चांगल्या वकील , पोलीस आणि चांगल्या अधिकारी वर्गाना तो मानपान द्या. वेळ मिळाला कि त्यांच्या कार्याचे कौतुक करा त्यांना नायक म्हणा. त्यांच्या सोबत सेल्फी काढून त्याचे चांगले विचार चांगले कार्य इतर लोकांपर्यंत पोहचवा. कारण हि माणसे स्वच्छ मानाने कष्टाने समाजात काम करत असतात. ज्यावेळी तुम्ही ह्यांना फॉलो कराल त्यावेळी तूम्ही स्वतः तुमच्यात एक बदल जाणवलेला दिसेल आणि हा बदल तुम्हाला तुमच्या फायद्याचा ठरेल. 


फिल्मी दुनियेचे वेड असावं एक मनोरंजन म्हणून पण इतकं हि नसावं कि त्याला आपण आपला आदर्श बनवू....ज्यांना ह्या फिल्मी दुनियेत करियर घडवायचय त्यांनी नक्कीच त्यांच्याकडून त्यांची कला घ्यावी!! 


असे ही नाही कि ह्या फिल्मी दुनियेत चांगले माणसे नाहीत. उदा सांगायच तर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे सारखे लाेक आहेत ज्यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांना आपण आपला नायक आपला आदर्श बनवू शकताे.


सचिन कृष्णा तळे 

#आहेतेआहे



Wednesday, 2 September 2020

विझून जा रे

 ह्या बंदिस्त शरीरातून 

प्राण रूपी दिवा 

विझून जावा अलगत

आणि करून घ्यावी त्याने सुटका 

ह्या मायावी संसारातून

ह्या माणसांच्या वस्तीतून 

आपल्याच लाेकांतून 

जिथे दया माया क्षमा नाही 

जिथे प्रेम आपुलकी एकता नाही 

जिथे सहवास अन साेबत नाही 

जिथे चार शब्द बाेलणारा धनी नाही 


विझून जा रे

आणि पुन्हा कधीच मानवी जन्माला नकाे येउं


#सचिन_तळे

Tuesday, 18 August 2020

माणसांच्या भाेवती फक्त दाेनच गोष्टी आहे सुख आणि दूख. ताे ह्या दाेन गाेष्टीच्याच भाेवती सर्व आयुष्य खर्चून टाकताे. सुखात सुख भाेगण्यात आणि दूखात सुखाचा शाेध घेण्यात. पण ह्याही पलिकडे जी व्यक्ती फक्त आनंद आणि समाधान शाेधताे... जाे समाजात महत्वपूर्ण कार्य करताे... ताे माणूस मृतूलाेकी अमरत्वला पाेहचताे. अर्थात जीवनात असे कार्य करा ज्याने तुमच्या नावाला अमरत्व प्राप्त हाेईल.

#आहेतेआहे
#सचिन_तळे
www.sachinktale.blogspot.com


मंजूर मला फाशी

 मंजूर मला फाशी असेल ती जर देशासाठी

उगाच नका लटकावू कर्जाच्या माफी साठी


“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale