कंत्राट म्हणजे सगळ्यात माेठा सट्टा....
कंत्राट करार पध्दतीवर लाेकांना कामावर ठेवून त्यांना हव तेव्हा हव तसे राबवून त्यांच्या कडून कष्टाचे काम करून घेउन त्यांना हव तेव्हा कामावरून सहज कमी करता येत. हा सर्वात माेठा फायदा हा कारखानदार लाेकांना असताे. काही टिकाणी त्यांची युनियन असते तर काही ठिकाणी नसते. ६ महिने ११ महिन्याच्या ह्या कंत्राटी पध्दतीने अनेकांचा जीव घेतलाय अनेकांना बेराेजगार केलय. कारखानदारांचा एकमेव फायदा म्हणजे जेव्हा उत्पादन कमी हाेत तेव्हा त्यांना कमी करायच आणि स्वताची आर्थिक बाजू शाबूत ठेवायची.
कंत्राटी वर मुल मुली किवा कामगार भरती साठी एक कंत्राटदार हि नेमला जाताे जाे ह्या मुलांचा त्यांच्या मेहनतीचा काही हिस्सा भाग स्वता खाताे तसेच त्या कंपनीच्या अधिकारी वर्गाला ही खाउ घालताे. बर ईतकच नाही तर काही ठिकाणी हा कंत्राटदार दूसरा तिसरा काेणी नसून तिथला स्थानिक नेता हि असताे आणि आहेत आज ही. पुण्यात जर विचार करायचा तर रांजणगाव चाकण उद्योग वसाहत मध्ये माेठ्या प्रमाणात हा कामगारांचा श्रमिकांचा जुगार खेळला जाताे.
हाे हा खूप माेठा जुगार सट्टा आहे जाे राजकिय नेते आणि कारखानदारांच्या मधे खेळला जाताे. त्यात बळी कामगारांचा जाताे. सुरूवातीच्या काळात ह्या कंत्रीट पध्दतीचा खुप माेठा ताेठा मी सहन केलाय आणि खूप जवळून पाहिले देखील. आज ही अनेक कामगार हे दहा बारा वर्षे काम मेहनत करून फक्त परमनंट हाेण्यासाठी लढा देत आहेत.
जवळच उदाहरण सांगायच तर ह्या २०२० मधे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन कमी झाले म्हणून राताेरात कामगारांना कमी केले गेलय. त्यावर ते काहीच करू शकत नाही कारण कामावर रूजू हाेताना तसा त्यांचा एक agreement करार केला जाताे ज्यावर त्या कामगारांची सही असते त्याची त्या सर्व अटी नियमाची तयारी असते( अर्थात त्या वेळी त्या कामगाराला कामाची गरज असते त्यामुळे ताे मिळेल त्या कागदावर सही करताे ) .
बर हा प्रकार काही खाजगी क्षेत्रात आहे असे नाही तर सगळ्यात जास्त कंत्राटी कामगार हे सरकारी क्षेत्रात अाहे. फक्त एका आशेवर की त्यांना काही वर्षानंतर परमनंट केले जाईल. पण सगळ्यांचा च वशिला नसताे हाे. ज्याचा वशिला त्याचा बाप काशीला म्हणतात ना.
असाे मी स्वतः ह्या कंत्राट पध्दतीच्या विरोधात आहे आणि पुढे हि राहणार...
सचिन कृष्णा तळे
#आहेतेआहे

