मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
Saturday, 8 December 2018
Monday, 3 December 2018
Sunday, 18 November 2018
दारुड्याची भूक उपाशी
थोडी देशी थोडी विदेशी, दारुड्याची भूक उपाशी
थोडी गुंगशी थोडी वीकशी, घरातली भांडीकुंडी
घरातली भांडीकुंडी , संसाराची तीच रे तिजोरी
दारूसाठी पार्टीसाठी , घरादाराची राखरांगोळी
घरादाराची राखरांगोळी, कोणास हवी हि दिवाळी
मुलांबाळांसोबत खावी , घरातली ती चटणी भाकरी
घरातली ती चटणी भाकरी, सुखाची अन आनंदाची
दारूपायी उध्वस्त झाली, लाखो घरांची तरुणाई
लाखो घरांची तरुणाई, ती पालकांची खरी कमाई
डोळयांदेखत घेऊन जाते, दारू म्हणजे यमाची स्वारी
दारू म्हणजे यमाची स्वारी, हवी कश्याला हि पायरी
जगण्याचा आनंद मोठा, दारुविना होऊ दे साजरी
दारुविना होऊ दे साजरी, मनाची कर हि तयारी
तुझ्या ह्या वाटेवर मित्रा, नकोच दारुड्यांची मैत्री
नकोच दारुड्यांची मैत्री, नकोच ती नशेची धुंदी
थोडी देशी थोडी विदेशी, दारुड्याची भूक उपाशी
- सचिन कृष्णा तळे , पुणे
७७०९०९९६४६
थोडी गुंगशी थोडी वीकशी, घरातली भांडीकुंडी
घरातली भांडीकुंडी , संसाराची तीच रे तिजोरी
दारूसाठी पार्टीसाठी , घरादाराची राखरांगोळी
घरादाराची राखरांगोळी, कोणास हवी हि दिवाळी
मुलांबाळांसोबत खावी , घरातली ती चटणी भाकरी
घरातली ती चटणी भाकरी, सुखाची अन आनंदाची
दारूपायी उध्वस्त झाली, लाखो घरांची तरुणाई
लाखो घरांची तरुणाई, ती पालकांची खरी कमाई
डोळयांदेखत घेऊन जाते, दारू म्हणजे यमाची स्वारी
दारू म्हणजे यमाची स्वारी, हवी कश्याला हि पायरी
जगण्याचा आनंद मोठा, दारुविना होऊ दे साजरी
दारुविना होऊ दे साजरी, मनाची कर हि तयारी
तुझ्या ह्या वाटेवर मित्रा, नकोच दारुड्यांची मैत्री
नकोच दारुड्यांची मैत्री, नकोच ती नशेची धुंदी
थोडी देशी थोडी विदेशी, दारुड्याची भूक उपाशी
- सचिन कृष्णा तळे , पुणे
७७०९०९९६४६
Friday, 16 November 2018
तो
घरच्या सिमा घरच्यांसाठी
देशाच्या सिमा देशासाठी
जो नसतोच बंधनात या
तो जगतो कोणासाठी ?
भगव्या हिरव्या निळ्या
हर रंगात त्याची लीला
ज्याचा रंगच कळला नाही
तो रंगतो कोणासाठी ?
उत्सव जल्लोष त्याचा
दंगलीत अपमान त्याचा
जो सोसतो सर्व काही
तो रमतो कोणासाठी ?
प्रकाश वारा पाणी
चार दिशांची गाणी
हर ग्रंथात ज्याची कहाणी
तो दिसतो कोणासाठी ?
- सचिन कृष्णा तळे , पुणे
७७०९०९६४६
देशाच्या सिमा देशासाठी
जो नसतोच बंधनात या
तो जगतो कोणासाठी ?
भगव्या हिरव्या निळ्या
हर रंगात त्याची लीला
ज्याचा रंगच कळला नाही
तो रंगतो कोणासाठी ?
उत्सव जल्लोष त्याचा
दंगलीत अपमान त्याचा
जो सोसतो सर्व काही
तो रमतो कोणासाठी ?
प्रकाश वारा पाणी
चार दिशांची गाणी
हर ग्रंथात ज्याची कहाणी
तो दिसतो कोणासाठी ?
- सचिन कृष्णा तळे , पुणे
७७०९०९६४६
Tuesday, 30 October 2018
Wednesday, 17 October 2018
हिन्दुरत्न श्री प्रभो शंभूराज
हिन्दुरत्न श्री प्रभो शंभूराज
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौ रिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
छत्रपती
शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान. मंदिरातला देव आज ज्या
दैवीशक्तीमुळे जागृत राहिला ती दैवीशक्ती म्हणजे महाराज. स्वराज्याचे मालक. त्यांच्या
कार्यातून विचारातून बांधणीतून स्वराज्याचा कळस हा इतिहासाची पाने रचू लागला. घराघरातून
देव देश धर्मसाठी मावळे तयार होऊ लागले जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी लढू लागले.
त्या छत्रपतींना आज सर्व जग मुजरा करत. मोठमोठ्या कार्यक्रमातून अगदी आताच्या प्रजासत्ताक
दिनापर्यंत छत्रपती कसे घडले ह्याची छबी मानाने अभिमानाने मिरवली जाते. त्यांचे पुतळे
उभारले जातात. अरबी समुद्रात त्यांचा भव्यदिव्य पुतळयाचे धाडस केले जाते. इतकच नाही
तर दोनदा काय तर महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हा रोज महाराजांचा जन्मोस्तव साजरा
करेल. महाराज होतेच त्या ताकदीचे. मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना महाराजांचा अंश ज्या
व्यक्तीच्या अंगात आहे त्या सवाई शिवाजी छत्रपती
संभाजी महाराजांना आपण कसे काय विसरतो. लहान वयात राजकीय धडे गिरवणारे आणि धर्मासाठी
स्वराज्यसाठी ४० दिवस यमयातना सहन करत त्यागातून उजाळणारे शूर शिवाचा छावा संभाजी महाराज
, आज खरंच महाराष्ट्राच्या गावोगावी घरोघरी मनामनात पोहचले का ? संभाजी कळाले ते फक्त चरित्र हीन म्हणून , बंडखोर
म्हणून... शूर म्हणून , हिंदूवीर म्हणून , राजा म्हणून , मुलगा म्हणून ,युवराज म्हणून,
एक नवरा म्हणून , बाप म्हणून , त्यागाची मशाल म्हणून , मित्र म्हणून , ग्रंथकार म्हणून
, ज्ञानी म्हणून , सवाई शिवाजी म्हणून ... आपल्याला कळालेच नाही? किंवा त्यांना समजून
घेता आलेच नाही ? किंवा जाणूनबुजून इतिहासाच्या पानात संभाजी हे नाव वगळले असावे ?
हे अखंड हिंदुराष्ट्राचे दुर्भाग्य. महाराष्ट्राच्या मातीला मराठीच माणसांनी कलंक लावला.
राजकीय स्वार्थिय डावपेचात एका नरवीराचा अंत झाला. पुरंदरच्या गाभारातून निघालेली किंकाळी
स्वराज्यासाठी स्वराज्य रक्षणास ज्वालामुखी होऊन ,म्लेंच्छांचा कडेलोट करून, आखा मुघल
प्रांतावर शिव तांडव करून , स्वराज्याच्या
सीमेचा विस्तार करून, विखुरलेल्या मराठा साम्राज्याला एकत्र करून त्या वढू गावी तुळापूर संगमी शांत झाला. रायगडचा
हा शिव गुलाल छावा उधळला गेला तो स्वराज्यासाठी, भगव्यासाठी, आपल्या हिंदुत्वासाठी.
"बाळ
शिवाजी जन्मावा परंतु तो शेजारच्या घरात "
ठीक आहे ! मग आज काळाची गरज म्हणून हर घरात संभाजी जन्माला पाहिजे कारण ज्यावेळी
तुमच्या माझ्या घरात संभाजी जन्मेल तेव्हा आपल्या हृदयात आपोपाप शिवाजी जन्मास येईल.
जेव्हा तुमच्या हृदयात आणि घरात हे दोन हिन्दुरत्न जागतिल तेव्हा तुमच्या आईबहिणीवर ,घरावर ,देशावर , धर्मावर अन समजावर कोणाचीच वाईट
नजर सुद्धा फिरकणार नाही. संभाजी महाराज लोकांपर्यत जसे पोहचायला हवे तसे पोहचले नाही
. आपण राजे शिवाजी वाचले, लिहिले, नाटकातून चित्रपटातून पाहिले, अनुभवले . खंत इतकीच
जितकं शिवाजी महाराज लिहले गेले तितकं संभाजी महाराज लिहिणारे हात घडले नाही, घडवता
आले नाही किंवा घडूनच दिले नाही. ज्यांनी स्वतःच्या लेखणीतून अभिनयातून संभाजी महाराज
दाखवण्याचा प्रयत्न केला त्या सर्व कलाकार साहित्यिकांचा ग्रंथकारांचा इतिहासकारांचा
आभार मानावा तेवढा कमी. धन्य ते कवी कलश ज्यांनी ह्या शिव सूर्याला मिठी मारून त्याच
शिव सूर्याच्या शोर्याची साक्ष त्यांच्या लेखणीतून अजरामर केली.
ज्वलज्वलनतेजस
संभाजी - डॉ. सदाशिव शिवदे , शिवपुत्र संभाजी
- डॉ. कमल गोखले , खरा संभाजी- नामदेवराव जाधव , शाक्तवीर संभाजी महाराज - ॲडव्होकेट
अनंत दारवटकर , आम्ही यातनांचे स्वामी - वा.ना. देशपांडे ,इथे ओशाळला मृत्यू - वसंत
कानेटकर , छावा - शिवाजी सावंत , धर्मवीर छत्रपती
संभाजी महाराज - अरुण जाखडे , मी मृत्युंजय संभाजी -संजय सोनवणी , राजसंन्यास - राम
गणेश गडकरी, रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत
मोरे , वज्रदेही संभाजी - ना.ल. मोरे . ह्या सगळ्यांनी जे लेखनातून कार्य केले
ते शिवकार्यच.
१९८८
ला माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी औरंगाबाद ला संभाजी नगर नाव दिले ते नाव अद्याप
बदलता आले नाही. आज हि महाराष्ट्रातील जनता ह्या निर्णयाची वाट पाहतोय. सुरेश चिकाळे
लिखित आणि राकेश दुलगज निर्मित २०१७ ला " संभाजी १६८९ " हा चित्रपट आला आणि
गेला सुद्धा. प्रेमावर प्रदर्शित चित्रपटाला अलोट गर्दी होते पण देव देश धर्मावर मिटनेवाला
संभाजी महाराजांना चित्रपट गृह च मिळत नाही. त्याची जाहिरात तर किंचितच कुठेतरी दिसली
असेल. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांना दाखवणे म्हणजे अवघडच. असे चित्र
असताना झी निर्मित डॉ. अमोल कोल्हे ह्यांची " स्वराज्यरक्षक संभाजी महाराज
" हि मालिका लोकप्रिय झाली. न चुकता आज घराघरात हि मालिका पहिली जाते . लहान मुलांना
आवर्जून दाखवली जाते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांची नजर ज्या राजाला पाहण्यासाठी
समजण्यासाठी आतुरलेली होती त्या छाव्याला ह्या मालिकेने पुन्हा जीवदान दिले. या मालिकेने
आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडीं सोबतच बारीकसारीक प्रसंगांवर
प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी
महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय अगदी प्राण
फुंकूलाय . विशेष कौतुक करायचं तर शंतनू मोघे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज साकारले
, अमोल कोल्हे ह्यांना संभाजी म्हणून पसंती मिळू लागली , स्वराज्याचे कुलमुखत्यार म्हणून
महाराणी येसूबाई ची भूमिकेत प्राजक्ता गायकवाड , महाराणी सोयराबाईंच्या भूमिकेला आहे
तसे साकारणारे स्नेहलता वसईकर , राणूबाईंची व्यक्तिरेखा साकारणारी अश्विनी महंगडे
,मातृत्वाचा पाझर म्हणजे पुतळाबाईं म्हणजेच पल्लवी वैद्य , आणि सर्व टीम . उत्सुकता असते आज काय
होणार उद्या काय होणार , एकीकडे पेशवे कुरणीस सारखे अष्टमंडळ तर दुसरीकडे सत्तेचे राजकारण
,तिसरीकडे स्वराज्यावर येणार संकट. ह्या सगळ्यांना पुरून उरणारे आपले राजे शंभू महाराज.
पोवाडे
गावे तेवढे कमी , लिहावे तेवढे कमी , सांगावे आणि ऐकावे तेवढं कमी , दाखवावे तेवढं
कमी असे दिव्यतेज स्वराज्याचे युवराज धाकले धनी शंभू महाराज आहेत. हिंदूवीरांचा पांडुरंग
म्हणजे शंभूराज . असे
ह्या विठ्ठलाचे धारकरी घरोघरी जन्मा येवो , इतिहासकारांच्या लेखणीला सांडलेल्या रक्ताची
अन बलिदानाची आठवण व्हावं , काव्याची धारा शुभूराजांच्या शौर्याने सतत वाहत तरुणांना
प्रेरणा मिळो. ह्या छाव्या सारखे धर्माशी एकनिष्ठ राहत देश घडवणारे राजकीय कार्यकर्ते
घडो . आपल्यासाठी शंभूराजांनी जे बलिदान दिल
त्या बलिदानाची , त्यांनी सहन केलेल्या वेदनाची जाणीव महाराष्ट्रालाच काय तर अखंड हिंदुराष्ट्राला
होवो.
दिव्य तेज रवी किरण शिवपुत्र शंभूराज
केशरी ध्वज हिंदू रत्न महाराज शंभूराज
कीर्तिवंत, बुद्धिवंत, शौर्यवंत, निष्ठावंत
स्वराज्य शिखर जय छत्रपती शंभूराज
हिंदहृद्य तीरावर मराठमोळ्या शिरावर
यौवन स्वबळावर विजयी श्री शंभूराज
संस्कार अविष्कार मैदानी शूर धुरंदर
मावळ्यांचा मैतर राजाश्रय तो शंभूराज
म्लेंछ संहारक अन जनतेचा पालक
मालक महाराष्ट्राचा छावा तो शंभूराज
धर्म रक्षक त्यागवंत अवतार हा हनुमंत
रामराज्य भूषण प्रभो शिवांश शंभूराज
सचिन कृष्णा तळे - ७७०९०९९६४६
Sunday, 30 September 2018
Swaradnya Arts
New YouTube channel
#SwaradnyaArts
Please visit and like and subscribe
https://youtu.be/pAARgGY-6pU
#SwaradnyaArts
Please visit and like and subscribe
https://youtu.be/pAARgGY-6pU
Subscribe to:
Posts (Atom)
“कलियुग सुरू आहे!”
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale
-
फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहासफाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास पाकिस्तानातील मुल्तानमध्ये आजही उभा असल...
-
महाराष्ट्र साहित्य सभा , इंदूर पुण्य श्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केल्यानंतर मल्हारराव होळकर माळव्याचे सु...
-
🔴 माझं मत 🔴 “भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!” शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत आपण सतत अस्थिरता, सत्तापा...





