Wednesday, 13 July 2022

विचारवेध संमेलन

 


नागरिकांना विचार करायाला आणि ते व्यक्त करायला प्रोत्साहित करण्यासाठी, भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वासमावेशक विकास, समता, मैत्रीभाव, स्त्रीमुक्ती आणि जातीयता निर्मूलन यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना बोलकं करण्यासाठी विचार वेध साहित्य संमेलन भरवण्यात आले. विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात. आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन, स्त्री-साहित्य विचारवेध संमेलन आणि विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. विचारवेध संमेलनाचे मुख्य उद्देश हे जास्तीत जास्ती तरुणांना पर्यंत पोहचणे त्यांना लिहत करणे आहे.

वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचार-वेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे हे माध्यम आहे. अनेक विचारवंतांचीविचार वेचेही छोटी भाषणे सातत्याने रेकॉर्ड करून सर्वांना सहज आणि मोफत यू-ट्यूब वर उपलब्ध करून देणे, गावागावांतून व्याख्यानमाला भरवणे , वक्तृत्वस्पर्धा भरवणे , लेख आणि पुस्तके प्रकाशित करणे ,परिसंवाद आयोजित करणे असे अनेक उपक्रमांनी विचार वेध कार्यरत आहे. विचारवेध मधे व्यक्त होणारे विचार सामाजिक, राजकीय आणिक आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना आणि कार्यकर्त्यांना उपयोगी ठरावेत असा विचारवेधचा उद्देश आहे.

असहिष्णू, मनगटशाही, राडाबाजी, बंदी आणि खून यांच्या वातावरणात निर्भयपणे विचार मांडण्यासाठी एका मंचाची गरज असल्याचे जाणवल्याने परत एकदा अशी संमेलने भरवण्याची तातडीची गरज भासली. कारण 'आज सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक या संविधानातील मूल्यांची जाणीव स्वताला आणि समजला करुण देण्याची वेळ आली आहे.’ आम्ही भारतीय नागरिक आहोत, आम्हाला शांततामय आणि सहिष्णू मार्गांनी विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे ठासून सांगण्याची, कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार हे रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज बराच काळ रहाणार आहेसमाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचारवेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विचार-वेध संमेलने पुन्हा सुरू झाली. पुरोगामी महाराष्ट्राला भारतातील इतर राज्यांशी जोडण्याचे काम विचारवेधच्या माध्यमातून व्हावे, म्हणून विचारवेध प्रयत्नशील आहे.


सचिन कृष्णा तळे


Wednesday, 6 July 2022

तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन



अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करत. आत्मसंयमनाचे विचार ग्रामगीता या काव्यातून मांडून तुकडोजी महाराजांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. 


तुकडोजी महाराज यांच्या नावाने तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात. ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.


देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. त्यांच्या ह्या अश्याच क्रांतिकारी विचारणा घराघरात पोहचवण्यासाठी तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन भरवण्यात येते. वर्धा , मध्यप्रदेशातील सौंसर , छिंदवाडा , राळेगाव भंडारा, अकोला, बुलढाणा ,यवतमाळ सारख्या अनेक ठिकाणी हि संमेलने झालीत. भंडारा येथील संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते. २४ एप्रिल २०११ रोजी छिंदवाडा येथील संमेलनाध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे होते.२४-२५ नोव्हेंबर २०१७ या काळात ध्यक्षस्थानी ज्येष्ठ राष्ट्रीय ग्रामगीता प्रचारक सत्यपाल महाराज चिंचोळकर होते. तर वर्धा येथील संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जुल्फी शेख होत्या. 


सचिन कृष्णा तळे 



Wednesday, 29 June 2022

वारकरी साहित्य परिषद

 



अभंग हे वारकरी संप्रदायाचे मुख्य साहित्य आहे. भजन हे वारकऱ्यांचे मुख्य उपासना साधन. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचे फक्त भाषांतर नसून मराठीत केलेले भाष्य आहे. अद्वैतवाद, द्वैतवाद अन्य तत्वज्ञाना हून ज्ञानदेवांनी चिद्विलासवाद स्वतंत्र तत्वज्ञान मांडले यालाच अनुभवामृत अथवा अमृतानुभव असे म्हणतात. एकनाथी भागवत हा उद्धवाला केलेला उपदेश. रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, चांगदेव पासष्टी . हे सर्व वारकरी साहित्याची खरी ओळख आहे.

 

महाराष्ट्र संस्कृतीचे जतन संवर्धन करण्यामध्ये वारकरी संप्रदायाचे फार मोठे योगदान आहे. भक्ती बरोबरच सुधारणावादी दृष्टिकोन समोर ठेवून वाटचाल करणारा हा संप्रदाय बुद्धिनिष्ठ विज्ञाननिष्ठ आहे. वारकरी चळवळीतील संताच्या विचारांचा वसा वारसा जतन करून या संत साहित्याचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य वारकरी मंडळीनी एकत्र येऊन करण्याचे योजिले या विचाराने प्रेरित होऊन सन १९११ साली वारकरी साहित्य परिषद ही संस्था स्थापन झाली.

 

वारकरी साहित्य परिषद तर्फे महाराष्ट्रात आजवर आठ च्या आसपास अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन भरवण्यात आले. या संमेलनामध्ये राज्यातील संप्रदायाचे अभ्यासक, दिंडीकरी, कीर्तनकार प्रवचनकार यांचा मोठा सहभाग असे. तसेच ह्या संमेलनात वारकरी मंडळी साठी अन साहित्य निर्माण करणाऱ्या संस्थेसाठी , लेखकांसाठी खास चर्चासत्रे, भजन, भारूड, कीर्तन . कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आले. संत चोखोबा ह्यांचा समाज बांधवानी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे संत चोखोबांच्या अभंगांचे पारायण कोणीही करत नव्हते. अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा जि.सोलापूर येथे सन २०१३मध्ये थाटामाटाने सुरुवात केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान आव्हानाला प्रतिसाद देऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथेझाडू संताचे मार्गया उपक्रमाद्वारे सन २०१५ पासून वारकरी परिषद स्वच्छता अभियान राबवीत आहे. जानेवारी २०१६मध्ये ग्रंथ ज्ञानेश्वरीला ७२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मराठवाडयातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातुन वारकरी साहित्य परिषदने मराठवाडयातील जिल्ह्यातील ७६ तालुक्यामध्येज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात आली. नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबईतील विधान भवनात स्वच्छतेचा महाजागर या विषयी सर्व वारकऱ्यासोबत भव्य कार्यक्रम घेण्यात आले. संतसाहित्यातील विचार जनमानसात, शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचावा यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून संपूर्ण महाराष्ट्र दौरा करून अनेक उपक्रम राबविले जात आहेत.

 

सचिन कृष्णा तळे

Wednesday, 22 June 2022

मुस्लिम मराठी साहित्य परिषद

 

मुस्लिम मराठी साहित्य परिषद

 


मुस्लिम मराठी साहित्य हा नवा प्रवाह संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. मुस्लीम मराठी साहित्य म्हणजे मराठीतून लेखन करणाऱ्या मुस्लीम लेखकांचं साहित्य होय. नवीन पिढीला सक्षम, समंजस आणि सुदृढ घडवण्यासाठी दर्जेदार आणि स्थानिक भाषांमधून साहित्य वाचावयास आणि अभ्यासावयास मिळालं तरच वैचारिक क्रांती होऊ शकते. महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम परिवार हे मराठीत न बोलता उर्दू अन हिंदी ह्या भाषेला जास्त महत्व देताना दिसत आहेत. अश्यावेळी स्थानिक मराठी भाषेच्या दिशेने मुस्लिम युवकांना ओढ निर्माण कारण्याहेतू मुस्लिम मराठी साहित्य जास्तीत जास्त प्रकाशित झाले पाहिजे. महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी १९८९ साली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे, इकबाल मिन्ने, अजिज नदाफ, ए.के.शेख, मुबारक शेख, अब्दुल लतीफ नल्लामंदू यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.

 

२०१०मध्ये डॉ. इकबाल मिन्ने यांच्या पुढाकाराने मुस्लिम मराठी परिषदेच्या काही सदस्यांनी मिळून औरंगाबादमध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलने मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ नावाचे मंडळ स्थापन केले. प्रा. जेमिनी कडू ह्यांच्या मते “मराठी लिहिणाऱ्या, विचार करणाऱ्या आणि जाणीव असणाऱ्या मुस्लिमांनी साहित्यासारखे प्रभावी साहित्य निर्माण करणे म्हणजे ‘मुस्लिम मराठी साहित्य” होय”. १९३६ सालापासून सांगलीचे सय्यद अमीन यांनी ‘मुस्लिम मराठी साहित्य हा शब्द प्रयोग केला. तेराव्या आणि चौदाव्या शतकापासूनच मुस्लिम-मराठी संतांनी मराठीतून साहित्य निर्मिती केल्याचे अनेक पुरावे आढळतात. कोकण विभागातील मुस्लिम लेखकांनी कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके लिहिली आहेत. महाराष्ट्रात पंधराव्या शतकापासून ग्रामीण भागांतून मराठीतून भक्तिगीते, ओव्या आणि अभंग लिहिणारे ४९ मुस्लिम मराठी कवी होऊन गेले होते. कोकणात स्वातंत्र्यपूर्वकाळापासून कोकणी मुसलमान मराठीतून लिहीत होते. कॅप्टन फकीर महंमद जुळवे, हुसेनमियॉं माहिमकर, अबू काझी, परवेज नाईकवडे, बशीर सावकारपासून ते कवी खावर, अजीज हसन, मुक्री इत्यादींचे लिखाण मराठीत प्रकाशित आहेत.

 

मुस्लिम साहित्य परिषदेच्या प्रयत्नामुळे ‘मुस्लिम मराठी साहित्याच्या शोध लागला. नवनवे मुस्लिम तरुण लिहू लागले. संमेलनामधून समाजाच्या वेवेगळ्या समस्यावर विचारमंथन होऊ लागले. मुस्लिम मराठी साहित्याची व्याख्या मांडताना प्रा. फकरूद्दीन बेन्नूर लिहितात "मुस्लिम म्हणून मराठी प्रदेशात जगत असताना आणि त्याचप्रमाणे धर्माने निर्माण केलेले मुस्लिमपण आणि इथल्या सामाजिक वास्तवातून परंपरेने चालत आलेले भारतीय समाजातील गुणविषेश या दोन्हीमुळे इथल्या संवेदनक्षम लेखकांच्या मनात ज्या जाणीवा निर्माण होतात जो संघर्ष उभा राहतो, त्याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे ‘मुस्लिम मराठी साहित्य’ होय

 

सचिन तळे 

 

 

Monday, 13 June 2022

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे

 



               

नव्या युगातील नव्या वाचकांना छापील पुस्तक ऐवजी पुस्तकांनी जास्त भुरळ घातलेली आहे. त्यामुळे वाचकांची अभ्यासकांची जिथे जास्त गर्दी असायची असे ग्रंथालय वाचकांच्या भेटीला आतुरलेले आहेत. सध्याच्या युगात ग्रंथालयाला भेट देणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. पण ह्या ग्रंथालयाची खरी किंमत हि त्यांनाच माहित ज्यांना परिस्तिथी मुळे पुस्तक विकत घेणे सुद्धा परवडत नव्हते. गरजूना पुस्तके मिळावीत ह्या शुद्ध हेतूने ग्रंथालय उभे राहू लागले.

 

मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या एका सोळा सतरा वर्षाच्या मुलाला इतिहासाचं पुस्तक हवं होतं. तसं त्याने आपल्या वडिलांना सांगितलं. वडील म्हणाले दुस-या कुणाकडून तरी पुस्तक घेऊन काम भागव. परिस्तिथी मुळे त्या मुलाला पुस्तक विकत घेता नाही आले. आपल्या परिस्थिती ची जाणीव मनात होती. माझ्या सारख्या अनेक मुल महाराष्ट्रात असतील ह्या विचारावर शेवटी त्या मुलाने धाडसाने वयाच्या बावीसाव्या वर्षी जून १८९३ ला ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली आणि याच मुलाला महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे म्हणून ओळखू लागले. ब्रिटीश अमदानीत वाचनालयांची अन ग्रंथसंग्रहालयाची स्थापना झाली. पण ब्रिटीश राजवटीतला एक दोष असा होता की, त्या काळातल्या ग्रंथालयात वा वाचनालयात प्रामुख्यानं इंग्रजी ग्रंथांचा भरणा अधिक असे.त्या मानानं मराठी ग्रंथांना त्यात दुय्यम स्थान असे.

 

शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या संस्थेचे, मराठी ग्रंथांचे, भाषेचे संवर्धन जतन करणे हे प्रमुख उद्दिष्ट ध्येय आहे. ठाणे जिल्हा वर्ग मुक्तद्वार वाचनालय म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मान्यता मिळाली असून जिल्ह्यातील उत्कृष्ट वाचनालय म्हणून शासनाकडून डॉ. आंबेडकर पुसस्कार देखील मिळाले आहे. दरवर्षी संस्थेच्या प्रशस्त सभागृहात पंधराचे आसपास विविध विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. वाचनालयात बसून वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके वाचण्याची मोफत सोय आहे. कथा-कादंब-यांपासून अध्यात्म-कोशापर्यत विविध विषयांवर 1 लाख 15 हजारांवर पुस्तके उपलब्ध आहेत. समाजाभिमुख सांस्कृतिक कलोत्तेजक कार्य करणा-या संस्थाना संस्थेचे सुसज्ज सभागृह उपलब्ध आहेत. हे सभागृह  ठाण्यातील नौपाडा अन सुभाष पथ येथे आहे. ह्या संस्थेची खास वैशिष्टे म्हणजे संस्थेमार्फत " ग्रंथयान " हि चालती फिरती पुस्तकांची बस वाचकांना उपलब्द करून दिली आहे. साखळी योजनेच्या सभासदपदी ठाण्यातील अनेक मंडळ, वाचनालय, एज्युकेशन सोसायटी, प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

Wednesday, 1 June 2022

आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद

 



 

तेलुगू, कानडी, तामिळ, हिंदी आणि मराठी या भाषांचे हैदराबाद संगमस्थान आहे. या भाषाभगिनीच्या साहित्याचा मराठी भाषकांना परिचय करून द्यावा, भाषिक आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाचे सौहार्द निर्माण करावे ही मुख्य उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून .. १९५८ मध्येमराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेशया संस्थेची स्थापना झाली. भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद येथे असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबादला स्थलांतर झाले. त्यामुळे हैदराबादमधील मराठी साहित्यिक वातावरण विचारात घेऊन न्या. श्री. गोपाळराव एकबोटे, प्रा. रा. . माढेकर, प्रा. भा. शं. कहाळेकर, प्रा. . . भुसारी, डॉ. श्रीधरराव कुलकर्णी, आणि दिवाकर कृष्ण केळकर यांनी आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद ची स्थापना केली.

ही मंडळी वेगवेगळ्या व्यवसायात होती आणि महाराष्ट्र मंडळ, विवेकवर्धिनी शिक्षण संस्था, मराठी ग्रंथ संग्रहालय आदी संस्थांमध्ये विश्वस्त किंवा पदाधिकारी होती. त्यांपैकी काही लेखक आणि संशोधकही होते. हैदराबादच्या या मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून कार्यकर्ते असलेले .पं. जोशी (१९३२-२०११) यांनी सुमारे ४० वर्षे परिषदेची कार्यपताका फडकवत ठेवली होती. आंध्र प्रदेशची मराठी साहित्य परिषद.. १९५८ सालापासूनपंचधारानावाचे त्रैमासिक काढते. हे त्रैमासिक या परिषदेचे मुखपत्र आहे. गेली 54 वर्षे हे त्रैमासिक सुरू असून हैदराबादसारख्या ठिकाणाहून नियमितपणे निघत आहे. मनोरंजन नाही, अनुकरण नाही, म्हणून सवंगपणाही नाही, सर्वदूर पसरलेला सुबद्ध मराठी माणूस हेच पंचधारेचे लक्ष आहे. डॉ. श्रीधरराव कुलकर्णी, नंतर प्रा. दं. . जोशी, यांनी 1974 ला या मासिकाचे संपादकपद स्वीकारले आणि पंचधारेचे स्वरूप बदलायला सुरुवात झाली. जे साहित्य वाङ्मयीन कसोटीला उतरते तेच साहित्य छापायचे. विनाकारण तडजोड स्वीकारायची नाही हे पंचधारेचे सूत्र आजही कायम आहे. उर्दू, कन्नड, हिंदी, तेलुगूमधले चांगले साहित्य अनुवाद करून पंचधारामधून यायला सुरुवात झाली. तेव्हा अनुवादित साहित्याचा फारसा बोलबालाही नव्हता. संशोधनपर आणि समीक्षात्मक लेखन हे पंचधाराचे महत्त्वाचे अंग आहे.

 

पंचधारेने जवळ जवळ साठ विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्यापैकी तेलुगू विशेषांक, दक्षिणी भारतातील स्त्री लेखिका विशेषांक, उर्दू साहित्य विशेषांक, दक्षिणी भाषा शब्दकोश, वा भाषाशास्त्र विशेषांक, कै. नरहर कुरुंदकर विशेषांक, कुमार गंधर्व विशेषांक, नरहर कुरुंदकर विशेषांक, गालिब विशेषांक.  कै. यशवंतराव चव्हाण आणि आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद यांचा निकटचा संबंध होता.

सचिन कृष्णा तळे

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale