Monday, 13 June 2022

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे

 



               

नव्या युगातील नव्या वाचकांना छापील पुस्तक ऐवजी पुस्तकांनी जास्त भुरळ घातलेली आहे. त्यामुळे वाचकांची अभ्यासकांची जिथे जास्त गर्दी असायची असे ग्रंथालय वाचकांच्या भेटीला आतुरलेले आहेत. सध्याच्या युगात ग्रंथालयाला भेट देणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. पण ह्या ग्रंथालयाची खरी किंमत हि त्यांनाच माहित ज्यांना परिस्तिथी मुळे पुस्तक विकत घेणे सुद्धा परवडत नव्हते. गरजूना पुस्तके मिळावीत ह्या शुद्ध हेतूने ग्रंथालय उभे राहू लागले.

 

मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या एका सोळा सतरा वर्षाच्या मुलाला इतिहासाचं पुस्तक हवं होतं. तसं त्याने आपल्या वडिलांना सांगितलं. वडील म्हणाले दुस-या कुणाकडून तरी पुस्तक घेऊन काम भागव. परिस्तिथी मुळे त्या मुलाला पुस्तक विकत घेता नाही आले. आपल्या परिस्थिती ची जाणीव मनात होती. माझ्या सारख्या अनेक मुल महाराष्ट्रात असतील ह्या विचारावर शेवटी त्या मुलाने धाडसाने वयाच्या बावीसाव्या वर्षी जून १८९३ ला ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली आणि याच मुलाला महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे म्हणून ओळखू लागले. ब्रिटीश अमदानीत वाचनालयांची अन ग्रंथसंग्रहालयाची स्थापना झाली. पण ब्रिटीश राजवटीतला एक दोष असा होता की, त्या काळातल्या ग्रंथालयात वा वाचनालयात प्रामुख्यानं इंग्रजी ग्रंथांचा भरणा अधिक असे.त्या मानानं मराठी ग्रंथांना त्यात दुय्यम स्थान असे.

 

शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या संस्थेचे, मराठी ग्रंथांचे, भाषेचे संवर्धन जतन करणे हे प्रमुख उद्दिष्ट ध्येय आहे. ठाणे जिल्हा वर्ग मुक्तद्वार वाचनालय म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मान्यता मिळाली असून जिल्ह्यातील उत्कृष्ट वाचनालय म्हणून शासनाकडून डॉ. आंबेडकर पुसस्कार देखील मिळाले आहे. दरवर्षी संस्थेच्या प्रशस्त सभागृहात पंधराचे आसपास विविध विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. वाचनालयात बसून वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके वाचण्याची मोफत सोय आहे. कथा-कादंब-यांपासून अध्यात्म-कोशापर्यत विविध विषयांवर 1 लाख 15 हजारांवर पुस्तके उपलब्ध आहेत. समाजाभिमुख सांस्कृतिक कलोत्तेजक कार्य करणा-या संस्थाना संस्थेचे सुसज्ज सभागृह उपलब्ध आहेत. हे सभागृह  ठाण्यातील नौपाडा अन सुभाष पथ येथे आहे. ह्या संस्थेची खास वैशिष्टे म्हणजे संस्थेमार्फत " ग्रंथयान " हि चालती फिरती पुस्तकांची बस वाचकांना उपलब्द करून दिली आहे. साखळी योजनेच्या सभासदपदी ठाण्यातील अनेक मंडळ, वाचनालय, एज्युकेशन सोसायटी, प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale