नागरिकांना विचार करायाला आणि ते व्यक्त करायला प्रोत्साहित करण्यासाठी, भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वासमावेशक विकास, समता, मैत्रीभाव, स्त्रीमुक्ती आणि जातीयता निर्मूलन यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना बोलकं करण्यासाठी विचार वेध साहित्य संमेलन भरवण्यात आले. विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात. आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन, स्त्री-साहित्य विचारवेध संमेलन आणि विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. विचारवेध संमेलनाचे मुख्य उद्देश हे जास्तीत जास्ती तरुणांना पर्यंत पोहचणे त्यांना लिहत करणे आहे.
वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचार-वेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे हे माध्यम आहे. अनेक विचारवंतांची ‘विचार वेचे’ही छोटी भाषणे सातत्याने रेकॉर्ड करून सर्वांना सहज आणि मोफत यू-ट्यूब वर उपलब्ध करून देणे, गावागावांतून व्याख्यानमाला भरवणे , वक्तृत्वस्पर्धा भरवणे , लेख आणि पुस्तके प्रकाशित करणे ,परिसंवाद आयोजित करणे असे अनेक उपक्रमांनी विचार वेध कार्यरत आहे. विचारवेध मधे व्यक्त होणारे विचार सामाजिक, राजकीय आणिक आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना आणि कार्यकर्त्यांना उपयोगी ठरावेत असा विचारवेधचा उद्देश आहे.
असहिष्णू, मनगटशाही, राडाबाजी, बंदी आणि खून यांच्या वातावरणात निर्भयपणे विचार मांडण्यासाठी एका मंचाची गरज असल्याचे जाणवल्याने परत एकदा अशी संमेलने भरवण्याची तातडीची गरज भासली. कारण 'आज सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक या संविधानातील मूल्यांची जाणीव स्वताला आणि समजला करुण देण्याची वेळ आली आहे.’ आम्ही भारतीय नागरिक आहोत, आम्हाला शांततामय आणि सहिष्णू मार्गांनी विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे ठासून सांगण्याची, कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार हे रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज बराच काळ रहाणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचार–वेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विचार-वेध संमेलने पुन्हा सुरू झाली. पुरोगामी महाराष्ट्राला भारतातील इतर राज्यांशी जोडण्याचे काम विचारवेधच्या माध्यमातून व्हावे, म्हणून विचारवेध प्रयत्नशील आहे.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment