Wednesday, 28 June 2017

काय सांगू व्यथा कलयुगात विठ्ठला
बुडाला तूझा धर्म कलयुगात विठ्ठला

राबणारा शेतकरी आज मांगे जिवदान
संत सावता माळी कर्ज फेडित विठ्ठला

झोपडी साठी नाही जागा रिकामी
ऊंच ईमारती लय म्हागात विठ्ठला

मंदिर मस्जिद विहार चर्च गुरूद्वारा
राहू नकोस तू खोट्या जगात विठ्ठला

ऊन वारा पावसात चाले तूझी दिंडी
कोण खरा खोटा ह्या वारीत विठ्ठला

जातीपातीचे सांडपाणी वाहे समाजात
भीमा तूझ्यासाठी आजून दारात विठ्ठला

सीमेवर शहिदांच्या रक्ताचा अभिषेक
कौरव चारी बाजूनी भारतात विठ्ठला

सचिन कृष्णा तळे
पुणे
7709099646

"विठ्ठला", वाचा प्रतिलिपि वर :
http://marathi.pratilipi.com/sachin-tale/vitthala?utm_source=android&utm_campaign=content_share

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale