स्मरावे गणेश
वाहवे शब्द ;
प्रेमेरूपी संत
आठवूनी
काय तो विठ्ठल
काय तो रंग ;
रंगवावे रंग
भक्तीरंगात
विठ्ठल पंत
आत्मारूपी;
जिवंत राही
लेकरांती
मराठीच्या नगरी
भाषा थोर ;
ज्ञानीयाचा मोर
नाचे अगंणी
माऊलीचा पदर
मुक्ताईचा ;
बाळ रांगला
हरीनामे
सोपान बंधू
गुरू निवृत्ती ;
अलंकापुरी
थोर ठरे
चालली भिंत
चांगदेवा भेटी;
चमत्कार नाही
साधा खेळ
एक महादेव
दूजा पांडूरंग;
साक्षीस
ह्या भूमंडळी
अशी ज्ञानेश्वरी
संजीवन ;
माणसास मिळाली
अमृतामयी
तूळस राहावी
फुलावी पानोपानी;
हरीनामे सदा
सुगंधीत
आळंदी ची
धरावी वाट ;
तिथे राही
ज्ञानीयाचा राज
सचिन तळे
http://marathi.pratilipi.com/sachin-tale/dnyaniyacha-raja?utm_source=android&utm_campaign=content_share
वाहवे शब्द ;
प्रेमेरूपी संत
आठवूनी
काय तो विठ्ठल
काय तो रंग ;
रंगवावे रंग
भक्तीरंगात
विठ्ठल पंत
आत्मारूपी;
जिवंत राही
लेकरांती
मराठीच्या नगरी
भाषा थोर ;
ज्ञानीयाचा मोर
नाचे अगंणी
माऊलीचा पदर
मुक्ताईचा ;
बाळ रांगला
हरीनामे
सोपान बंधू
गुरू निवृत्ती ;
अलंकापुरी
थोर ठरे
चालली भिंत
चांगदेवा भेटी;
चमत्कार नाही
साधा खेळ
एक महादेव
दूजा पांडूरंग;
साक्षीस
ह्या भूमंडळी
अशी ज्ञानेश्वरी
संजीवन ;
माणसास मिळाली
अमृतामयी
तूळस राहावी
फुलावी पानोपानी;
हरीनामे सदा
सुगंधीत
आळंदी ची
धरावी वाट ;
तिथे राही
ज्ञानीयाचा राज
सचिन तळे
http://marathi.pratilipi.com/sachin-tale/dnyaniyacha-raja?utm_source=android&utm_campaign=content_share
No comments:
Post a Comment