Thursday, 21 September 2017

ज्या देशात ...
स्त्री चा ईतका सन्मान होतो...
कधी दुर्गा कालिका म्हणून
कधी लक्ष्मी ...
कधी विद्येची देवता म्हणून
तर कधी ....
कुमारी म्हणून ....
तीला पुजलं जातं ...
मुलींना दैवी रूप समजल जातं ..
नऊ दिवस देवी चा जागर करून
तीच्या महिमा गायला जातो..
जीच्या पुढे आपण
झोळी घेवून मायेची भीक मांगतो..
शक्ती मांगतो ..
भक्ती मांगतो ..
जीचा गोंधळ घालून
सुख व शांतीचे दान घेतो...

.
.
.
त्या माझ्या देशात
महिलेचा बलात्कार होतो...
तीचा भर रस्त्यावर विनयभंग केला जोतो...
वाईट नजरांनी तिला ....
लाजवलं जातं
तिची हत्या केली जाते...
वासणाच्या चिखलातं
तिला अपमानीत केल जातं
अन
तिच्याच योनीतून
पुन्हा मानवी जन्म घेतो....
पुन्हा
तिला...

#सचिन_तळे
#sachinktale

www.sachinktale.blogspot.com

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale