गोऱ्या गोमट्या गाली
गोऱ्या गोमट्या गाली लाली लाली लाजते रे
होता इशारा तिचा जीवास हुरहूर लागते रे ...
तिच्या स्पर्षांच्या सरी, अंग अंग भिजतो मी
तिच्या शब्दाची जादू, रात रात मागतो मी
अलगद सांजवेळी बावरी वेडी ती थोडी
सांगत एक कहाणी, कुशीत जागते रे
गोऱ्या गोमट्या गाली लाली लाली लाजते रे ...

हा दरवळणारा गंध, फक्त तिच्यासाठी
हा उनाड वारा भिरभिरतो कोणासाठी
चंद्र चांदण्या आडुनी पाहे ती थोडी थोडी
हरवून जाते अशी , छेडीत सूर सारे

ऊन पावसाचे खेळ, होते सावली ओली
भरे नभाचा उर, कोवळ्या पावलांनी
अश्या श्रावण खेळी भेटते ती थोडी थोडी
गंधाळते गीत माझे , मयुरी होते साजरी रे

सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६

No comments:
Post a Comment