Wednesday, 4 October 2017

पुणेकर मला वाचवा ...

पुणेकर मला वाचवा ...

   भारताच्या ऐतिहासिक इतिहासात महाराष्ट्र रुपी वटवृक्षाची ऐतिहासिक पाने काळाच्या ओघात आता झडत चालली आहे, अन त्या जागी उंच इमारती, मेट्रो, उड्डाणपूल, बुलेट ट्रेन ह्यांनी घेतलीय. आताच्या धावपळीच्या युगात आपल्याला ह्या सोयीसुविधा हवेचं. आपले गाव स्मार्ट सिटी व्हावं, आपल्या गावात शहरात सर्व सोयी सुविधा मिळावी हे स्वप्न सर्वच नागरिकांचं असत. माझं घर, माझं गाव, माझं शहर अन माझं ऐतिहासिक ठेवा. जो मला माझ्या पूर्वजांनी दिला. काहीदिवसांनी मुलांना शाळांची सुट्टी पडली कि गावाकडे जाणारी मुलांना त्यांच गाव आता बदलेल दिसेल. मामाच्या गावाला जाऊया असे म्हणणारी लहान मुलं जेव्हा शहरातून  पुण्यात येतील तेव्हा त्यांना शहरासारखंच गजबजलेलं गावं  दिसेल. खरा चिंतेचा विषय हा नसून दुसराच आहे. ह्या मुलांना इतिहासाची ओळख आता फक्त  कागदी पुस्तकातून भेटणार आता कागदी पुस्तक हि सोडा डायरेक्ट पुस्तक तेही नेट च्या जाळ्यातून सोशल मीडियावर. आपले गड , किल्ले , राजवाडे , राजे , महाराजे ह्यांच्या इतिहासात काय ठेवलंय ? त्यांचे योगदान बलिदान आताच्या काळात कुठे आहे महत्वाचं. ते जन्मले, त्यांनी केलं आणि ते जिंकले आणि गेले इतिहासाच्या पानांत हरवून. आठवड्यातून सुट्टी घालवण्यासाठी नाहीतर प्रेमी युगलांना प्रेम करण्यासाठी चं काय ती जागा उरलीय आता. थोडेफार जे काय अवशेष आहे त्यावर हि आपले नाव कोरून इतिहास गाजवणारे प्रेमवीर अन सुट्टीत ऐतिहासिक स्थळाला पिकनिक पॉईंट स्वरूप देऊन प्लॅस्टिक अन कचरा करणारे मंडळी. ह्यांना कसलं घेणं देणं त्या इतिहासाशी, सांडलेल्या रक्ताशी, संघर्षाशी. तरीही आज कुठेतरी माणुसकी म्हणा किंवा इतिहास प्रेमी म्हणा इतिहास वारसा जपावा म्हणून झगडत आहे. कित्येक तरुण वर्ग कित्येक सामाजिक संस्था सध्या ह्या इतिहासाचे पाने कुजण्यापासून वाचवत आहे, निस्वार्थी राबत आहेत,  कित्येक नागरिक ऐतिहासिक ठेवा जपण्यास तळमळतायत .

आपण आपल्या मुलांना इतिहास शिकवतो त्यांना इतिहासाची माहिती देतो त्यासाठी त्यांना ऐतिहासिक स्थळावर घेऊन जातो त्यांचा पराक्रम , त्यांनी केलेलं महत्वपूर्ण कार्य आणि त्यातून देव देश समाज कसा घडला ह्याची ओळख करून देतो . आपण जरा विचार करूया! जर हे स्थळ नष्ट झाले तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवू ... घाणीच्या साम्राज्यात कुजत पडलेले हे शौर्याचे वीरतेचे स्थळ कि एके काळी अमुक गोष्ट इथे घडली होती आणि अमुक असा इथे वाडा होता, हे सांगणार आहोत.. एके काळी सात मजली असलेला शनिवार वाडा आपल्या अद्याप उभारता आलेला नाही. शनिवार वाड्यात भेटी देणारे लोकांची संख्या दिवसंदिवस वाढतीय त्याप्रकारे तिकीट हि आकारली जाते. पण जेव्हा आत शिरतो तेव्हा काही अवशेष आणि काही माहिती फलक ते हि तुटके फुटके. आपण त्या विशाल सागरात मुंबई किनारी स्मारक उभे करू शकतो त्यासाठी पैसा राजकारण करू शकतो त्याची स्वप्ने जनतेला दाखवू शकतो परंतु आपण ज्या ठिकाणी इतिहास घडला ज्या जागेवर त्या वीर महा पुरुषांनी बलिदान दिल त्या जागेवर त्याकाळी जे वैभव होत, तेच वैभव पुढच्या पिढीसाठी पुन्हा उभारू शकत नाही किंवा त्या साठी आपल्याकडे अनुदान नाही किंवा वेळ नाही असाच म्हणावं लागेल.

आपल्या महाराष्ट्रातील पुणे हा हि तसाच ऐतिहासिक जिल्हा. जिथे भोसले, पेशवे तसेच शाहू, फुले, कर्वे ह्यांच्या पदस्पर्शाने अन तुकाराम, ज्ञानेश्वर सारख्या संतांच्या अमृतवाणी ने पावन असणारा पुणे कुठे तरी ऐतिहासिक वास्तू जपण्यास असमर्थ राहिलाय. एकीकडे जीवनाशी लढत शिव इतिहास सांगणारे महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे तर दुसरीकडे सरकारी नोकरीत मस्त असणारे, त्या ऐतिहासिक ठिकाणावर दुर्लक्ष्य करणारे अधिकारी. पुण्यातली वाढती लोकसंख्या, समस्या आणि कमी पडत चाललेले रस्ते ह्यातून पालिकेला, सरकारला कदाचित लक्ष्य देता येत नसावे. पण वारसा विभागात असणारे कर्मचारी आणि त्यांची कार्याची माहिती कोण घेत का ?  पुण्याच्या मध्यवर्गीय भागातून वाहणारी मुळा मुठा तिच्या पात्रात तसेच परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत जसे कि सिंहगड, शनिवार वाडा, पर्वती, घोरपडे घाट, पाताळें श्वर, नाना साहेब पेशवे समाधी, अनेक पुरातन मंदिरे, वाडे, विश्रांत बाग, महात्मा फुले वाडा . सरकारी कागद पत्राद्वारे हि सगळी स्थळे वारसा पुरातन विभागात मोडतात. परंतु  ह्या सगळ्या स्थळांसाठी सरकार कोणत्या यादीत मोडत हेच उत्तर अद्याप मिळलेलं नाहीय



 वारजे कर्वेनगर अन खडकवासला तसेच खेड शिवापूर इथून थेट दिसणारा सिंहगड म्हणजे स्वराज्याचा साक्षिदार शौर्याच प्रतीक. पण दुर्दव्य कि, गडावर गेल्यावर तिथे  स्वरज्यातलं इतिहास सांगणारे दगड मात्र कोसळलेले आढळतात. त्या ठिकाणी इतिहास काय होता कसा घडला ते महत्वाचं नसून आपल्याला सिंहगडावर मिळनारी कांद्याची भजी , पिठलं भाकर अन कुठे तरी लपून प्रेमाचे चाळे करणारे तरुणाई ची भुरळ दिसते. वारजे तुन निघाल्यावर नळ स्टॉप च्या मार्गे नदीपात्रात उतरल्यावर थेट स्टेशन गाटे पर्यंत आपले सर्वांचे मन वेधून घेणारे काही स्थळ आहेत ते पाहताना मन खूप अस्वस्थ होत. त्याची दुरावस्था पाहवत नाही. पेशवे हे नाव जरी ऐकलं तर उत्सुकता वाटते. ज्यांनी महाराष्ट्र नव्हे तर त्या अफगाणिस्थान पर्यंत मराठी झेंडे फडकावले त्या पेशव्यांची समाधी ह्याच नदीपात्रात आहे. जिथे त्यांचे निरंतर वास आहे,ज्यांनि त्यांच्या काळात ऐश्वर्य चे जीवन जगले आज त्यांची समाधी धूळ खात आहे . नदीपात्रात उतरल्यावर उजव्या हाताला भरती विद्यापीठ च्या बाजूला प्रथम लक्ष जात ते नाना साहेब पेशवे ह्यांच्या समाधी कडे . पेशव्यांना पाहत तिथून सरळ निघाल्यावर ओंकारेश्वर मंदिर त्याच्या कळसाला नमस्कार करावं. आतल्या भव्य दिव्य गाभाऱ्यातल्या शिव पिंडीला पाहून मन प्रसन्न व्हावं. सरळ वाट चालावी आपल्याला घोरपडे घाट नजरेस पडतो . त्याच्या थेट समोर शनिवार वाडा अन पुढे विश्राम बाग वाडा आणि आजून खूप काही.

गेल्या दोन तीन वर्षांपासून सतत माझ लक्ष वेधून घेतय ते म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या थेट समोर असलेल घोरपडे घाट . त्याची तटबंदी  कोरीव दगडी चिरा, सुंदर पायऱ्या .. अन तिथे विसावलेले सुंदर असं शिव पिंड आणि नंदी . हे पाहताना उत्सुकता वाढते अन तितकंच मन अस्वस्थ होत. त्याच्या भोवती असणारे घाणीचं साम्राज्य आन त्या देवाचा अपमान ... मान खाली टाकण्या शिवाय दुसरा पर्याय तरी काय? त्या संबधी पालिकेला विचारणा केली असता पाटबंधारे खात्या द्वारा ते परवानगी मिळाली नाही म्हणून आम्ही काहीच केलं नाही . गेली पाच वर्ष गप्प सरकारी पगारावर घर वाढवत गेलो,पण हालचाल करता आली नाही . हालचाल करण्यासाठी ते आपल्या घरातली वास्तू कुठे आहे. घोरपडे घाट आणि त्यासंबंधी साधी फलक सुद्धा आपल्याला लावता आला नाही. पुण्यात आलेल्या पुरात इथले भव्य शिवमंदिर हे वाहून गेलं परंतु देव तिथेच त्याच जागेवर राहिलाआपण आपली घरे वाढवत गेलो पण देवाचे दाराकडे मात्र दुर्लक्ष्य केलं.  तिथून शनिवार वाड्याला वेढा घातला तर त्याच्या तटबंदी भोवती अनेक विक्री वाले धंदे करत बसतात त्यावर पोस्टर लावणे स्वतःच्या उद्योगाची झायिरत करणे. इतिकेच नाही तर जिथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं ते लालमहाल काय इतका लहान असावं ? त्याच्या भवती चिपकून खाजागी इमारती उभे तरी कश्या राहिल्या. त्यात हि राजकारण करून समाज पेटवणे हे चालूच आहे.  हे सर्व चित्र पाहताना पुण्याच्या वारसा विभागाची किव करावी वाटे . पण हे नक्की कि जर असच दुर्लक्ष राहील तर एक दिवस पुण्यातील सर्व ऐतिहासिक वास्तूंची " पुणेकर मला वाचावा " अशी किंकाळी ऐकू येईल . पण तेव्हा आपल्या हातून वेळ गेलेली असेल.

सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६ 


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale