Wednesday, 27 December 2017

रात्र ही वेडावली

रात्र ही वेडावली

चल चांदणे वेचू जरासे, रात्र ही वेडावली
दिवस हे प्रेमाचे सखे, मिठीत थोडी शहारली

सांग ना काय घडले ,काय घडले त्या रात्रीला
दोघांच्या मुक्या शब्दात ,वेळ होती गाराटली

कालचे रंग अजुनी, अजुनी आहे वस्ती फुलांची
दे पुन्हा तीच रात्र , तुझ्या माझ्या विश्वातली

चेहरा झाकू नकोस, लाजु नकोस जीवघेणे
तुझ्यासाठी रात्र माझी, जागली अन थांबली

वादळ अचानक कोणते हे अंगभर धावले
होता किनारा तुझा अन नाव माझी विसावली 



सचिन कृष्णा तळे 




No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale