Thursday, 18 January 2018

पुन्हा महाराष्ट्र माझा

पुन्हा महाराष्ट्र माझा जळाला होता
पुन्हा माणसाला तो कळाला होता

षडयंत्र होते आपल्याच लोकांचे 
सांगताना  जो तो त्रासला होता

हातात दगड अन होते शस्त्र थोडे
लेखणीला कलंक फासला होता

लोकशाहीच्या दारात संविधानचा;
गोंधळ जातीने मांडला होता

 सचिन तळे
  

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale