Thursday, 10 January 2019

आणिक तूझे हे रूप

हृदयाची भाषा मौनांची अक्षरे
स्पर्शाने फुलते प्रेमाचे अंतरे
स्वराने सजलेल्या
भिजलेल्या आवाजात
ओले चिंब मी आणिक तूझे हे रूप

त्या क्षणाची घेऊन ओंजळ
ओठांना फुटे सुखाची मोहर
नव्याने फुललेल्या
बहरलेल्या पानांत
ओले चिंब मी आणिक तूझे हे रूप

कागदावर लिहिलेल्या ओळी
गुलाबाची ती एक पाकळी
जपून ठेवलेल्या
छेडलेल्या आठवणीत
ओले चिंब मी आणिक तूझे हे रूप

शेवटच्या श्वासांसाठी शपथांची बोली
हवी सोबत तुझी हर एक जन्मी
तारुण्यात रुजलेल्या
लाजलेल्या वाटेत 
ओले चिंब मी आणिक तूझे हे रूप

सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale