Friday, 12 April 2019

प्रचाराची धूळ

प्रचाराची धूळ

सावध हो अन कर मतदान हक्काचे
तूच आहेस हा देश तुझ्या मालकीचे

तुला भुरळ नसावी पैशाची खोट्याची
नेत्यांच्या शब्दांनी सजलेल्या मैदानाची

तुझ्या एक मताने चमत्कार घडतो
हा विश्वास ठेव देश तूच घडवतो

इथे धर्म जात भाषा वरुनी दंगल
इथे मिळतो फक्त घोषणांचे बंडल

तुझ्या मताने मिळो प्रश्नाचे उत्तर
प्रत्येक घरात .. विकासाचे अत्तर

दुष्काळावर कोण बोले दाखवा
प्रत्येकाचा एकच ठरलेला अजेंडा

पाण्यासाठी वणवण फिरणारी मुलं
नेत्यांच्या गळ्यात मात्र ताजी फुल

प्रचाराची धूळ आज दारोदारी
नेत्यांची हीच परीक्षा आहे खरी

सचिन कृष्णा तळे , पुणे कात्रज
७७०९०९९६४६



















No comments:

Post a Comment

फ्रान्समधील वणवा आणि भारताची वास्तववादी प्रगती: अराजकता नव्हे, तर विकासाचा मार्ग धरा!

    "फ्रान्समध्ये घडणाऱ्या दुर्दैवी घटनांचा गैरफायदा घेऊन भारतात अस्थिरता पसरवू पाहणाऱ्यांनी हा इतिहास आणि वर्तमानाचा डोळसपणे अभ्यास कर...