साहित्य हे समाजाचा वास्तविक आरसा आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांवर तर काल्पनिक चित्रांच्या तीरावर सरस्वतीचं हे गाव वसलं आहे. जिथे शब्दांचं भांडार आणि शब्दांचा मार तर शब्दांचा आधार आहे. जिथे शब्दांचा खेळ रंगतो तिथे काव्याची अन कवीच्या कल्पनेची जादू हे चालणारच. मोजक्या शब्दात विश्वाची रचना विश्व दाखवण्या ची ताकद फक्त कवितेत आहे. साहित्याच्या मंदिरावर कविता हे सोनेरी कळस आहे. अभंग , संत वाणी , गाणी , पोंवडा , सोहळा , शाहिरांची बोली , सावरकरांची ती बंदिस्त खोली , महाभारताची कहाणी , स्वतंत्रतेचे उभारणी , सुख दुःखाची काळजी , आई ची अंगाई , बालपणाची आठवणी , नात्याची शहनाई , दुष्काळाची आरोळी कुठं कुठं नाहीय कविता . गझलांमधुन वृत्तांमधून छंदामधून ते सात सुरांच्या भेटीमधून , प्रेमातून विरहातून नात्यातून ते निसर्गाच्या मिठीतुन फुलापानांच्या श्रावणी सोहळ्यातून , अश्रूं पासून पावसाच्या थेंबातुन , एकांतात , चार चौघात फक्त कविता आणि कविताच तर आहे. बोलता बोलता बोली जाणारी शायरी ते लग्नात नवरा नवरी घेणारी नावे कवितांच्या चार ओळी .
कुठलीही कलाकृती हि कलावंतांच्या कल्पनाशक्तीने यशस्वी अन सुंदर होते. अशीच अनेक कलाकृती अनेक कवींनी त्यांच्या शब्दातून जिवंत ठेवली. आज हि जुन्या कविता आपल्याला जितक्या आवडतात त्याच ताकदीचे नव्या कविता लिहिणारे कवी आणि त्यांची लेखणी आहे. नव्या कवींची कविता म्हणजे सारस्वताच्या झाडावर फुटलेली पालवी आहे आणि ती जपणे आजच्या पिढीचे कर्तव्य. गर्भांतून जेव्हा मुलं बाहेर येत तेव्हा होणार तो त्रास आणि आनंद असतो तो कवी चा अनुभव आहे. कविता जन्माला घालताना त्याची मांडणी करताना त्याला जगासमोर सादर करताना प्रत्येक कवी हा श्रोत्यांकडून प्रेक्षकांकडून रसिकांकडून व्हा व्हा ची आशा बाळगून असतो. त्याने जन्माला घातलेली कविता काही क्षण समोरच्या व्यक्तीला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. त्याच्या कानावर कवीचे शद्ब हे अमृताचे बोल जणू.
चित्रकाराने रंग भरून रेखाटलेले चित्र जितके मोहक तितकेच कवीने शब्दातून रेखाटलेले काव्य चित्र सुंदर असतं. आजच्या काळात एक उदासीनता अशी हि आहे . नव्या कवींची कल्पना आपण लवकर स्वीकार करत नाही किंवा त्याला प्रोस्थाहन देण्या ऐवजी त्याचे खच्चीकरण केले जाते. प्रत्येक कवी हा कविप्रतिभेच्या आविष्कारातून रूपकातून व्यक्त होत असतो. कवीमनाचा एखाद्या वस्तूशी, घटनेशी , प्रसंगाशी संपर्क येतो. त्यातून त्याची मानसिकता विकसित होत जाते, त्या मानसिक अवस्थेतून अनेक प्रतिमा तयार होते , त्यातुन जे उत्तम आहे त्या प्रतिमेला घेऊन कवी एक मांडणी करतो नंतर ती कविता लोकार्पण केली जाते. त्याला संगीताची जोड मिळता ती फुलपाखरा सारखी अनेकांना मोहून घेते. पूर्वी राजदरबारी कवीला मानाचं स्थान असायचं त्याच्या शब्दाने राजदरबार रंगत होत. आज किमान लोकांच्या धगधगत्या जीवनातून थोडा वेळ नव्या कवींच्या कवितेला आणि त्यांच्या काव्य संग्रहाला मिळो.
सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६

No comments:
Post a Comment