Saturday, 15 January 2022

टार्गेट फत्ते - ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा

 

*सचिन तळे ह्यांचा हा लेख वाचण्यासाठी येथे क्लीक करा -*
https://www.digitalmarathi.co.in/2022/01/24/varanbhatloncha/

मी अद्याप हा चित्रपट पाहिला नाही आणि मी १८ वर्षाच्या वर गटात मोडत असल्याने हा चित्रपट कुटुंबा सोबत पाहिलं ह्याची खात्री नाही. ज्या प्रकारे चित्रपटाची प्रसिद्धी झाली त्यानुसार परिवाराला घेऊन आवर्जून हा चित्रपट पाहण्याच धाडस सहसा तरी कोणी करणार नाही. कारण आपले संस्कार आपल्या पेक्ष्या वयाने मोठे असणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांसोबत नग्न अवस्थेत असणारे क्षण जे चित्रपटात दाखवले गेले ते पाहण्यास अनुमती देत नाही. सेक्स म्हणा किंवा शारीरिक संबंध म्हणा ह्या सारखा सुंदर क्षण प्रेत्येकाला हवा हवासा वाटतो मग ती महिला असो वा पुरुष. प्रेत्येकाच्या मनात सेक्स बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतोच. हा सुद्धा एक प्रेमाचा भाग आहे पण विकृती हा प्रेमाचा भाग नाही, विकृती हा असुरी आनंदाचा भाग आहे. हा फरक समजून घेणे आधी गरजेचं आहे. मग जे चित्रपटात दाखवलं गेलंय ते प्रेमातून आहे कि विकृतीतून ह्याच उत्तर महेश मांजरेकर देतील.

प्रत्येक दिगदर्शकाला त्याचा चित्रपट हा लोकप्रिय होऊन जास्तीत जास्त त्याची चर्चा व्हावी ती चुकून माकून वादात हि अडकावी अशी छुपी ईच्छा असते. त्यात एकशे एक टक्का दिग्दर्शक अन निर्मात्याचा फायदा असतो. एकदा का तो चित्रपट वादात अडकला कि त्याची मार्केटिंग हि आपोआप होते. त्यामुळे जाणूनबुजून काही मान्यवर हे वादग्रस्त डायलॉग किंवा सिन चित्रपट मध्ये समावेश करतात. चित्रपट श्रुष्टीत हि सत्य परिस्तिथी आहे. तरुणांची अन आंबट शौकीन लोकांची गर्दी खेचण्यासाठी मनोरंजन ड्रामा सोबत थोडेफार का होईना सेक्स सीन द्यावाच लागतो. अंगप्रदर्शन करावंच लागत . निर्माता चित्रपट बनवताना कोणत्या ऑडियन्स ला टार्गेट करायचं हे आधीच ठरलेलं असत. त्यानुसार त्या चित्रपटाची आखणी होऊन त्यावर चित्रीकरण केलं जात.  

वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा ह्या चित्रपटात जे दाखवलं गेलं त्याबद्दल नक्कीच समाजातून विरोधाचे सूर उमटू लागले असतील पण हेच दृश्य जर हिंदी किंवा इंग्रजी किंवा तामिळ कन्नड चित्रपटात असेल तर ते आपण डोळे फाडून पाहतो. वाह वाह काय सीन शूट केलाय म्हणून तारीफ करतो. पुष्पा ह्या बहुचर्चित चित्रपटात हि असेच काही क्षण होते ते सुद्धा वादात अडकले आणि दिग्दर्शकाला हवं तशी त्याची प्रसिद्धी झाली. तब्बू च्या चित्रपटातून तब्बूचा बोल्ड लूक आपल्याला आवडला , राधिका आपटे चा बोल्ड लूक आपण हिंदी चित्रपटात  पाहिला अन ह्या सगळ्यात आपली सई ताम्हणकर ला कस विसरू शकतो. ८० -९० च्या दशकात हेलन चे नृत्य प्रत्येक चित्रपटात दिसून यायचे. टायटॅनिक ह्या चित्रपटात अभिनेता अभिनेत्रीची जी पेंटिंग काढतो तो क्षण लोकप्रिय ठरला. भारतात हि तो अनेकांनी पहिला. इतकच काय तर अनेक चित्रकारांनी सुद्धा त्याच्या चित्रात स्त्री पुरुष ह्यांचे नग्न चित्र रेखाटले आहे. काही वृत्तपत्रात तर काही मासिकात सेक्स वर आधारित लहान कथा सुद्धा प्रकाशित केल्या जातात. युट्युब वर तसेच आजच्या ताळेबंदीत थेटर बंद असताना जे वेब सिरीज तयार झाले त्यात देखील खुलेआम शारीरिक संबंध दाखवले गेले आहे. अनेक पॉर्न साईट नेटवर उपलब्द आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याच भारतातून पॉर्न साईट ला भेट देणारे चोरून पॉर्न पाहणारे अगणित आहेत. हे सगळं उदहारण सांगण्याचं कारण म्हणजे इथे प्रत्येक जण आपापल्या परीने ऑडियन्स टार्गेट करतो. ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा ह्या वादग्रस्त चित्रपटात देखील मांजेरकर ह्यांनी एक ऑडियन्स टार्गेट केला आणि तो यशस्वी झालाय. 

 

सचिन कृष्णा तळे - 7709099646





 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale