एक
प्रेरणादाई प्रवास... !!
आज
हि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव हे
आदराने घेतलं जात. ग्रामीण तसेच शहरात आज हि अनेक
विद्यार्थी यु ट्यूब वर
एका व्यक्तीचे भाषण ऐकतात त्यांच्या कडून प्रेरणा घेतात. मी स्वतः वारंवार
त्यांचे भाषण ऐकतो. शून्यातून स्वतःच विश्व तयार करत समाजाला राज्याला एक नवी दिशा
एक नवं नेतृत्व देत, खंबीर निर्णय घेत, जनतेच्या पाठी उभा राहणारा एक प्रेमळ नेता,
लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते
म्हणून प्रसिद्ध असणारे, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री म्हणजे स्वर्गीय रावसाहेब रामराव पाटील आपले आर आर पाटील
आपले आबा.
१६
ऑगस्ट १९५७ रोजी अंजनी गावी ,तासगाव सांगली जिल्ह्यात आबांचा जन्म झाला आणि ह्याच त्यांच्या कर्म भूमीतून त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली. आबांचा साधे पणा हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य आकर्षण होत. पक्ष सोडला तर आजच्या राजकारणात
सामन्यातून घडलेला स्वच्छ चारित्र्याचा नेता शोधून हि सापडणार नाही.
पाठीशी एक हि राजकीय
वारसा नसताना अंजनी सारख्या खेड्या गावातून आबा महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतात. तरुण पिढी समोर एक आदर्श ठेवत
त्यांना राजकारणात येऊन देश चालवण्याचे आव्हान करतात. "मी कसा घडलो"
ह्या पुस्तकात आबा त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या तारुण्याच्या
प्रवासात आलेले उतार चढ आणि काही
गमतीदार गोष्ट सांगतात. एका दिवसात वाचून पूर्ण होईल अश्या साध्या सोप्या भाषेत आबांचा हा प्रवास संस्कृती
प्रकाशन ने प्रकाशित केला
आहे.
काही
काही प्रसंग इतके वाईट आबांच्या पदरी पडले त्याचा विचार हि आपण कधी
केला नसेल. गावात दुष्काळ अन वडिलांचा आजार
तसेच वाढत्या जवाबदारीत शिक्षण पूर्ण करायचं होत. येन परीक्षेच्या दिवशी वडिलांचा मृत्यू होतो. शिक्षणासाठी लांब असणाऱ्या आबांना त्याच्या वडिलांचे शेवटचे दर्शन सुद्धा होत नाही. जनकार्य पुढारपण चालू होत आणि गरिबी दारात मुक्काम करून बसली होती. आबांकडे एक फटका शर्ट
होता. नवीन शर्टास पैसे नाही म्हणून वडिलांचाही शर्ट काढून तो पुन्हा शिवून
आबांनी घातला. साधारण पाने मृत माणसाचे कपडे घालत नाही पण परिस्तिथीने ते
घालावं लागलं. जिल्ह्या परिषेदेवर निवडून आल्यावर लोक स्वतः त्यांना घरून जेवण आणत होती. एक दिवस शाळेच्या
पायरीपाशी रात्र काढली होती आबांनी. एवढा मोठा माणूस शाळेच्या पायरीवर झोपलेला पाहून मास्तरांनी शाळेची बेल देखील वाजवली नाही. असे अनेक किस्से आबांचे ह्या पुस्तकात आहे. माननीय शरद पवार, अजित पवार तसेच अनेक मान्यवरांसोबतच्या आठवणी ते पोलिसांच्या घरा
घरात पोहचलेले आबा. त्यांचं हा प्रवास आणि
शब्द राज्यातल्या प्रत्यक तरुणांना एक प्रेरणा देणारा
आदर्श सांगणारा आहे.
"ध्येय
निश्चित होतं, उद्देश पक्का होता त्यामुळे खेड्यातल्या खाचखळग्यांच्या काट्याकुट्यांनी भरलेल्या पायवाटेवरून अनवाणी चालत जाताना दुःख जाणवत होतं पण साथीला होता...
आईचा आशीर्वाद आणि पुस्तकांचा आधार"
पुस्तक
- मी कसा घडलो
पाने
- ६४
प्रकाशक
- संस्कृती प्रकाशन
लेखक - आर आर पाटील( आबा )
सचिन कृष्णा तळे
No comments:
Post a Comment