एखाद्या कवीचा किंवा लेखकाचा, एखाद्या वाङ्मयप्रकाराचा, एखाद्या कालखंडाचा संपूर्ण व सूक्ष्म अभ्यास करून त्याबद्दलचे निर्णायक सिद्धान्त मांडण्याचे कार्य अनेक संशोधक संस्था सध्या करत आहेत. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एखाद्या विषयाचा बारकाईने केलेला सामिक्षातमक अभ्यास किंवा वैज्ञानिक चिकित्सा म्हणजे संशोधन होय. जिज्ञासा अथवा ज्ञान संपादन करणे ही माणसाची मुलभूत प्रवृत्ती आहे. भावी पिढी साठी अन खास करून मराठी विषयावर अभ्यास करू पाहणाऱ्या होतकरू तरुणांसाठी मराठी वाङ्मयाच संशोधनकार्य हि काळाची गरज आहे. मराठी वाङ्मयाचे, भाषेचे संशोधन व्हावे यासाठी खास स्वतंत्र, संशोधनाकरिता एक संस्था स्थापन व्हायला हवी अशी ईच्छा चिंतामण द्वारकानाथ देशमुख ह्यांनी १९४३ साली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या व्याख्यानमालेत व्यक्त केली होती. ह्याच विचारांवर प्रा. प्रियोळकरांनी मराठी संशोधन मंडळाची कल्पना १९४६ साली मांडली आणि त्यांच्या कल्पनेवर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या पाठिंब्याने १ फेब्रुवारी १९४८ रोजी मराठी संशोधन मंडळाची स्थापना हि नायगाव मुंबई मध्ये झाली. त्यावेळी मंडळाचे पहिले अध्यक्ष भारतरत्न पांडुरंग वामन काणे होते.
१ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी
संशोधन मंडळ हे ७५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. मंडळाचे शैक्षणिक कार्यात हि मोठे
योगदान आहे कारण मंडळा तर्फे मुंबई विद्यापीठात एम. ए. (मराठी) साठी लेक्चर्स तसेच
पीएच. डी.चे संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली नंतर अनेक नामवंत लेखकांनी , ख्यातनाम
विद्वान विद्यार्थ्यांनि त्यांची पीएच. डी. मंडळातून पूर्ण केले आहे. पोर्तुगीज राजवटीत
नाश पावलेल्या मराठी, कोंकणी बोलीतील अनेक पुस्तके मंडळांनी उजेडात आणले. मराठी भाषा
विषयी संशोधन करणे व संशोधनास सहाय्य करणे हे मंडळाचे मुख्य उद्दिष्टे असून प्राचीन मराठी ग्रंथाच्या चिकित्सक पद्धतीवर आवृत्या
काढणे , सेंट पिटर्सबर्ग कोश किंवा ऑक्सफर्ड इंग्रजी कोष यांच्या पद्धतीवर मराठी भाषेचा
कोश तयार करणे. थोडक्यात संशोधन प्रकल्प हाती घेऊन ग्रंथ प्रकाशन करणे , पुरातन मध्यकालीन
शिलालेख ताम्रपट अन हस्तलिखितांचा संग्रह जपणूक करणे , शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी
मित्रांना मार्गदर्शन करणे अश्या विविध बाबीतून मराठी संशोधन मंडळाचे कार्य चालू आहे.
संशोधन हि एक प्रक्रिया आहे.त्यासाठी
अनेक साधनांचा उपयोग करून त्याला संग्रहित करावी लागते. संशोधन करताना निरीक्षण करणे
, मुलाखती घेणे , प्रश्नावली तयार करणे , शोधिका सूची बनवणे , त्यावर पडताळणी करणे
आणि महत्वाची म्हणजे प्रत्येक ओळीवर साहित्यावर प्रामाणिक चाचणी करून साध्या सोप्या
शब्दात वाचकांपर्यंत पोहचवणे. ह्याच साधनांच्या
साह्याने मंडळाने मुक्तेश्वरकृत महाभारताच्या आदिपर्वाचा पहिला खंड १९५१ साली प्रकाशित केला. 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण'
, " देवनागरीची ध्वनिलिपी " , " भारतीय लिप्यांची तात्विक एकात्मता
", "साहित्यभ्यासाची शैलीलक्ष्य पद्धत", " प्राचीन कोरीव मराठी
लेख" , "अमृतानंद विरचित योगराज टिळक" इ . सुमारे १०० च्या आसपास छोटे मोठे ग्रंथ मंडळाने
वेळोवेळी प्रकाशित केले आहे. प्रामुख्याने ज्या विषयांवर सर्वसाधारण प्रकाशक हात घालणार
नाहीत असे विषय निवडून ते प्रकाशित करणे हि वैशिष्ठ मराठी संशोधन मंडळाचे आहे.
सचिन कृष्णा तळे
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment