महाराष्ट्र
ग्रंथोत्तेजक संस्था
'महाराष्ट्र
ग्रंथोत्तेजक संस्था' ही महाराष्ट्रातील सर्वांत
जुनी साहित्य संस्था आहे. आधुनिक महाराष्ट्राचे आद्द्य प्रवर्तक न्या. महादेव गोविंद रानडे, जागतिक कीर्तीचे संस्कृत पंडित डॉ. सर रामकृष्ण भांडारकर,
प्रसिद्ध कादंबरीकार हरी नारायण आपटे, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा पंचवीस द्रष्ट्या महाराष्ट्रीय समाजधुरीणांनी २९ ऑक्टोबर १८९४
रोजी ही संस्था स्थापन
केली. त्या वेळी संस्थेचे नाव 'डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी' असे होते. १९४८ मध्ये ते 'महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था' असे करण्यात आले.ही संस्था १२५
हुन अधिक वर्षे उत्कृष्ट मराठी ग्रंथांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचे कार्य करत आहे.
पेशव्यांच्या
राजवटीत दरवर्षी चातुर्मासात विद्वानांना दक्षिणा दिली जात असे. त्यामध्ये वैदिक विद्वान, इतर पंथीय विद्वान आणि अन्य धर्मातील पंडितांचा समावेश असे. पुढे इंग्रजांच्या राजवटीत ब्रिटीशांनी दक्षिणा प्राइझ कमिटी या नावाने एक
स्वतंत्र कमिटी स्थापन केली.1895 साली या कमिटीचे सर्व
काम संस्थेकडे आले. संस्थेच्या संग्रही 1895 पासून विद्वानांनी केलेली परिक्षणे आहेत, शंभर वर्षांपूर्वीपासूनची हस्तलिखिते आहेत आणि दुर्मीळ ग्रंथ, पेशवे दप्तर, विविध प्रकारचे 32 कोश, जुन्या पोथ्या, न्यायमूर्ती रानडे यांचा राइज ऑफ मराठा पाॅवर
हा ग्रंथ देखील आहेत. संस्थेकडे असलेल्या सुमारे 7000 हजार ग्रंथांचे स्कॅनिंग आणि डिजीटायझेशनचे कार्य सध्या सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 3000 ग्रंथांचे डिजीटीयझेशन पूर्ण झाले आहे. संस्थेची आणखी एक योजना म्हणजे
आदिवासी बोलींचे संवर्धन. सेंटर फाॅर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस) याच संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात
येतो. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील आदिवासी
समाजाची बोलीभाषा, त्याच्या बोलीतील म्हणी, त्यांचे संगीत, नृत्य आदी सर्वांचे जतम करण्याचा प्रकल्प संस्था पूर्ण करणार आहे.
महाराष्ट्र
ग्रंथोत्तेजक संस्थेला वनाझ कंपनीतर्फे पुण्यात पौड रस्त्यावर १०००० चौरस फुटाची जागा देणगी म्हणून प्राप्त झाली. त्या जागेत दक्षिणा भवन या नावाची वास्तू
उभारण्याची कल्पना असून. संस्थेचे कार्यालय, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, पाहुण्यांची राहण्याची सोय अशा प्रकारची वास्तू उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. वृत्तपत्रे, रस्त्यांवरील पाट्या अशा सार्वजिनक ठिकाणी होत असलेल्या अशुद्ध मराठी भाषेचा वापर थांबावा यासाठी काही मोहीम संस्थे मार्फत राबवले जात आहेत. मराठी भाषा कशी शिकवावी या विषयावर संस्थेत
एक अभ्यासक्रम चालवला जातो. शारदा शिंत्रे या मराठीच्या अभ्सासक
हा उपक्रम चालवतात. संस्थेला अन्यही बरेच उपक्रम सुरू करायचे आहेत. त्यासाठी संस्थेला तरूण अभ्यासक आणि धनाची मदत करणारे दानशूर अशा दोहोंच्या मदतीची गरज आहे, जेणेकरून आणखी शेकडो वर्ष संस्था मजबूतपणे काम करत राहील.

No comments:
Post a Comment