संस्कार भारती…
संस्काराशिवाय
जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्कारांशिवाय जीवन भरकटलेल्या जहाजांप्रमाणे असते. संस्कार म्हणजे मानवाच्या व मानव समाजाच्या
चांगल्या सवयी होय. ज्याच्या अंगी चांगले
संस्कार तो भेदभाव
मानत नाही, लहान-मोठे मानत नाही, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, असं काहीही तो मानत नाही.
या निरीक्षणांधारे भारतरत्न नानाजी देशमुख, भाऊराव देवरस, विष्णू श्रीधर वाकणकर, माधवराव देवळे, योगेंद्रजी अशा एकविचारी महारथींनी लखनऊ येथे ११ जानेवारी १९८१
रोजी ’संस्कार
भारती’ची स्थापना केली.
संस्कार
भारती हि ललित कला
आणि साहित्य क्षेत्रात काम करणारी अखिल भारतीय संस्था आहे. ‘ सा कला या
विमुक्तये’अर्थात वाईटांच्या बंधनांपासून मुक्तता देणारी कला. अशा आशयगर्भ घोषवाक्याला, धारण करणार्या ‘संस्कार भारती’ने सर्वच कलाप्रकारांना,
सादरीकरणाच्या व्यासपीठावर एकत्रित आणले. ‘संस्कार भारती’च्या तब्बल १२०० हून अधिक शाखा भारतभर कार्यरत आहेत. राष्ट्रीय भावना, भारतीय सांस्कृतिकतेचं जतन करणारी आणि अशा आशयाचा प्रचार व प्रसार करणारी
नाटके, नृत्य, रांगोळी, मेंदी, चित्र, काव्य, साहित्य अशा विविध वैविध्यपूर्ण कलाप्रकारांना प्रोत्साहनाच्या रुपाने अनेक तरुण-तरुणी, अनेक बालगोपाळ आणि असंख्य ज्येष्ठ-श्रेष्ठांना एकत्र आणण्याचे महान कार्य ‘संस्कार भारती’ने अथक तसेच
अव्याहतपणे सुरू ठेवलेले आहे.
संस्कार
भारती पुणे समिती च्या वतीने अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात आले तसेच साहित्य विभागाच्या वतीने व्याख्यानमाला भरवणे , पुस्तकांवर परिसवांद , कविसंमेलन भरवणे त्याच बरोबर स्वराज्य ७५ च्या निम्मिताने
अनाम क्रांतिवीर हा विषय घेऊन
निबंध स्पर्धा घेण्यात आले होते. भारताच्या अस्मितेची पाळंमुळं ज्या कलाप्रकारात रूजलेली आहेत, अशा सर्व कलांचा कलेकलेने प्रचार व प्रसार करीत
‘संस्कार भारती’ ही भारतीय संस्कार
नावानेच ओळखू लागली. कला
आणि मनोरंजन, प्राचीनता आणि आधुनिकता, दृश्यकला आणि सादरीकरण कला अशा विविध संस्कारमूल्यांची सांगड घालत एखाद्या रोजनिशीप्रमाणे ‘संस्कार भारती’ ने भारतीय भूमीत
कलासंस्कारांची बीजे रोवायला सुरुवात केली. मासिक संगीत कार्यक्रम असो , राष्ट्रीय विषयांवरील चित्रकला स्पर्धांचे आयोजन असो की, साप्ताहिक नाट्यवर्गांचे आयोजन असो, ‘संस्कार भारती’ चा ‘भूअलंकरण’ हा सोहळा तर
प्रत्येक भारतीयांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला. भारतमाता पूजन, नटराज पूजन, नववर्षाभिनंदन, भरतमुनी जयंती, दिवाळी परिवार मेळावा, कृष्णजन्माष्टमी अशा उत्सवांमधून समाजात काही मूल्यं प्रस्थापित करण्याचं कार्य ‘संस्कार भारती’ सातत्याने करत आली आहे .
सचिन
कृष्णा तळे

No comments:
Post a Comment