सुर्यांश
साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर
http://epunyanagari.com/articlepage.php?articleid=PNAGARI_PUS_20221017_04_5&width=155px&edition=Smart%20Pune&curpage=4
नव्या लिहित्या हातानी एकत्र यावे, नवोदितांना हक्काचे लिहिण्यासाठी व्यासपीठ मिळावे आणि लिहित्या हातांना ऊर्जेचा स्पर्श व्हावा या हेतूने २००७ मध्ये काही होतकरू युवकांनी अन नव्याने लिहिणाऱ्या कवींनी सुर्यांश ही संस्था स्थापन केली. नंतर या संस्थेतील इरफान शेख, रंगनाथ रायपुरे, नीता कोंतमवार, मिलिंद बोरकर, सीमा पाटील आणि सुरेश गारघाटे सहित अनके कार्यकर्ते ह्या साहित्य चळवळीत सहभागी झाले.
सुरवातीच्या
काळात केवळ कवितेला वाहिलेल्या या संस्थेत नंतर अनेक बदल होत गेले आणि या संस्थेला
लोक चळवळीचे स्वरूप पर्याप्त झाले. कवी इरफान शेख या संस्थेचे आजीवन अध्यक्ष झाल्यापासून
एका पथदर्शी नेतृत्वात संस्थेची वाटचाल सुरू झाली. अनेक कवी लेखक कलावंत या संस्थेशी
केवळ जुळून आहे असे नव्हे तर या सगळ्यानी संस्थेला आपलं मानलं आणि हि संस्था दिवसेंदिवस
लोकमनात आपली छाप सोडत नावरूपाला आली. या संस्थेची लोकप्रियता पाहून नावात थोडा बदल
केला गेला आणि सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर या नावाने २०१२ ला रीतसर
धर्मादाय आयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी झाली. नावात बदल झाल्यावर या संस्थेला वलय मिळाले आणि
तेव्हापासून साहित्यक्षेत्रात कार्यरत ही संस्था चंद्रपूर जिल्ह्यातली महत्वपूर्ण साहित्यविषयक
लोकचळवळ झालेली आहे.
राज्यस्तरीय
स्त्रीशक्ती साहित्य संमेलन, अभिवाचन स्पर्धा, वाचन प्रेरणा दिवस आणि राज्यपातळीवरचे
आठ साहित्यप्रकारासाठी वाङ्मय पुरस्कार, असे उपक्रम घेत २०१८ च्या सुरुवातीला राज्यस्तरीय
साहित्य संमेलन या शीर्षकाखाली घेण्यात आलेले साहित्य संमेलन हे यशस्वी झाले अन त्याची
चर्चा बहुश्रुत झाली. २०१८ च्या शेवटी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या
अनुदानातून दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन झाले आणि संस्थेच्या सदस्यांनी आपण हे
करू शकतो याची प्रचिती सगळ्यांना दिली.
राज्यनाट्य
स्पर्धेत संस्थेतर्फे नाटक सादर झाले आणि ते तिसरे आले. केवळ साहित्यासाठी नव्हे तर
साहित्य आणि संस्कृती जपण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणाऱ्या या संस्थेने खेडोपाडी लिहिणाऱ्या
आणि उपेक्षित असणाऱ्या अनेक लिहित्या हातांना लोकांपुढे आणण्याचा सतत प्रयत्न केला.
नुकतेच झालेले ३ रे राज्यस्तरीय साहित्य संमेलन एक उत्तम साहित्य संमेलन कसे असले पाहिजे
याचा नमुना आहे. राज्यभरातील प्रतिष्टीत साहित्यिकांची उपस्थिती या संमेलनाला लाभली.
आजपर्यंत डॉ प्रतिमा इंगोले, राजन खान, राजन जयस्वाल, शंकर विटणकर, वसंत आबाजी डहाके,
डॉ यशवंत मनोहर, रामदास फुटाणे यांनी संमेलनात हजेरी लावली. यंदाच्या संमेलनात कवी
इंद्रजितय भालेराव आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी
उपस्थिती लावली.
लोकसहभागावर
ही संस्था काम करत असून मिळालेल्या देणगीच्या माध्यमातून सगळे आयोजन होत आहे. समर्पित
भान ठेवून तरुण लेखक कवी यात काम करताहेत. समर्पणाची समिधा अर्पित करत या संस्थेत काम
करणाऱ्या सगळ्या लेखक कवींना संस्थेप्रति आपुलकी, आत्मीयता, विश्वास आणि सहयोगाची आशा
असल्यानेच संस्थेचे काम योग्यप्रकारे सुरू आहे.
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment