Wednesday, 12 July 2023

भारताच्या हृदयस्थानी विसावलेले पारशी

 भारताच्या हृदयस्थानी विसावलेले पारशी





दुधात साखर जशी मिसळावी तसा हा शरणार्थी असलेला पारशी समाज भारताच्या संस्कृतीत असा काही मिसळला कि आज हि भारतीयांना या समाजाचा त्यांचा कार्याचा अभिमान वाटतो. ह्या भारत खंडावर अनेक धर्माचे अनेक देशाचे शरणार्थी देश सोडून स्थायिक झाले. पण त्या सर्वांमध्ये पारशी हा एकमेव धर्म समाज आहे ज्याने भारतीय संस्कृतीला जराही ठेच पोहचवता सदैव भारताच्या विकासासाठी योगदान  दिले आहे. आजही परकीय धर्मापासून देशांतर्गत सदैव दंगे दिसून येतात. पण पारशी धर्मातील लोकांमुळे दंगे झाले हे फार कमी प्रमाणात आहे. इतिहासाच्या पानांवर इराणच्या मातीत जन्मलेला अन एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक असलेल्या पारशी धर्म इस्लामी कट्टरतेच्या अन धर्मप्रवाहाच्या प्रवाहात स्वतःच अस्तित्व गमावून बसला.पारशी - इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर एक मोठा गट तिथून . ८०० च्या दरम्यान निसटला आणि गुजरात वाटे भारतात स्थलांतरित झाला. इराण चा मूळ पारशी धर्म हा इस्लामीकरणाच्या जबड्यात असा काही अडकला कि त्यांना धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारणे भाग पडला. आजच्या घडीला इराण हा मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित आहे. सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले. त्यांना इराणी म्हणतात. आपल्याला आसपास अनेक इराणी उपहारगृहे सहज दिसतील ते हीच मंडळी चालवीतात. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्यातील दुर्गम अशा ठिकाणी एक गाव आहे उदवाडा. या परिसरातील संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोकांनी १२०० वर्षांपूर्वी आपलं पहिलं पाऊल ठेवलं. भारतात खऱ्या अर्थाने अल्पसंख्यांक असलेला हा समुदाय या समुदयातील व्यक्तींनी भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या कर्तृत्वाची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे. भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य बदलणाऱ्या पैकी काही लोक हे पारशी समाजातून आहेत.  पारशी समुदायाने आपल्या कर्तृत्वाने भारतीय समाजाच्या प्रगतीत उल्लेखनीय असं योगदान दिलं आहे. भारतात मिळालेल्या प्रेमाची, सद्भावनाची अन आपुलकीची जाणीव पारशी लोकांनी ठेवली आणि त्याची परतफेड म्हणून त्यांनी सदैव भारताच्या प्रगतीचाच विचार केला. स्वातंत्रपूर्व काळात अफूचा व्यवसाय करून त्यांनी भारतभर उद्योग प्रणाली उभी केली.

 

अर्दशिर गोदरेज-

मुलीच्या लग्नासाठी कपाट खरेदी करायचे असो की दुकानासाठी तिजोरी, सगळ्यात आधी मनात विचार येतो तो एकाच भारतीय ब्रँडचा. तो म्हणजे गोदरेज कंपनीचा. आजही गोदरेज हा भारतातील लोकांचा आवडता ब्रँड आहे. ही देशातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक आहे. मे १८९७ रोजी अर्देशीर गोदरेज यांनी वकिलीची पहिली आवड सोडून एका शेडमध्ये गोदरेज ग्रुप सुरू केला. त्यांनी लक्षात घेतले की परदेशात बनवलेल्या कुलूपांमध्ये इंटिग्रेटेड स्प्रिंग होते, जे बऱ्याचदा तोडले जाते. यामुळे त्यांचे कुलूप इंग्लंडमधून आयात केलेल्या लोकांपेक्षा अधिक किफायतशीर झाले. यानंतर त्यांच्या या कुलूपाची विक्री खूप वाढू लागली. अर्देशिर गोदरेज हे अत्यंत खटपट्या स्वभावाचे उद्योजक होते. कुलुपाच्या यशानंतर कधी आंघोळीचा साबण, फर्निचर, फ्रिज अशा अनेक उद्योगांमध्ये गोदरेज कंपनीने हात आजमावला. सध्या प्रॉपर्टी व्यवसायातही गोदरेज कंपनीचं नाव आघाडीवर आहे. १९५१ साली स्वतंत्र भारतात पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांसाठी गोदरेज कंपनीने सुमारे १७ लाख मतपेट्या (बॅलेट बॉक्स) बनवल्या होत्या.

 

दादाभाई नौरोजी -

 

दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय होय. ८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला. मुंबईच्या गिरगांव भागात जेथे दादाभाई रहात होते त्या रस्त्याला नौरोजी स्ट्रीट म्हणतात. लहान वयातच प्रागैतिक विचारांनी त्यांना आकर्षित केलं. १८४० मध्ये दादाभाईंनी मुलींसाठी शाळा उघडली. महिलांना या जगात खुलेपणाने जगण्याचा, आपल्या विचारानुसार कृती करण्याचा, अधिकार आणि कर्तव्यं निभावण्याचा समान अधिकार आहे, असं दादाभाईंनी त्यावेळी म्हटलं लैंगिक समानतेचा मुद्दा मांडला. भारतात तात्काळ सुधारणांची गरज आहे, हे ब्रिटनमधल्या मोठ्या वर्गाला पटवून देण्यात दादाभाई यशस्वी झाले. महिलांना मतदानाचा अधिकार, कामगारांना आठ तास काम करण्याचा नियम, अशा सुधारणांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. महात्मा गांधी यांच्याआधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते, म्हणूनही मान होता.

 

होमी जहाँगीर भाभा -

 

अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. भारताच्या अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉ. होमी जहाँगीर भाभा यांना ओळखलं जातं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर .. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. डॉ. होमी भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला. भाभा यांचा जन्म मुंबईतील एका सधन पारसी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. भाभा यांना पाचवेळा भौतिकशास्त्र विषयात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. 19४५ मध्ये आण्विक कार्यक्रमाला चालना देण्यासाठी टाटा इंन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. त्यांनी अन्वीकक्षास्त्र निर्माण केले.

 

जमशेदजी टाटा आणि रतन टाटा -

 

टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. १८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला. त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये. उद्योगजगतात त्यांचा इतका प्रभाव होता की जवाहरलाल नेहरूंनी टाटा यांना वन-मॅन प्लॅनिंग कमिशन म्हणून संबोधले होते. टाटा स्टील ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी आहे.

 

१९३७ मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत. देश जेव्हा जेव्हा संकटात असतो तेव्हा तेव्हा भारतीयांसाठी धावून येणारा पहिला उद्योजक हे रतनजी टाटा आहेत. त्यांनी टाटा टी मिळवून टेटली विकत घेतली, टाटा मोटर्स घेऊन जग्वार लँड रोव्हर विकत घेतली आणि टाटा स्टील घेऊन कोरस कंपनीचे अधिग्रहण केले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच .. १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली होती . ` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. त्यांनी त्यांचे औद्योगिक संबंध इंग्लंड, अमेरिका, चीन तसंच जपान या देशांमध्ये प्रस्थापित केले.त्यांनी पुढे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा-टी आणि व्होल्टास या कंपन्यांचं जाळं उभं केलं. तसंच भारताची पहिली विमान कंपनी टाटा एअरलाईन्सची स्थापनाही त्यांनीच केली होती.

 

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ-

 

आपल्या तब्बल ४० वर्षांच्या लांबलचक लष्करी कारकिर्दीतील वर्षे ते भारताचे लष्करप्रमुख राहिले. इतकंच नव्हे तर सुरुवातीच्या काळात ब्रिटिश सैन्याकडून त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही सहभाग नोंदवला होता. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या १९७१ च्या युद्धादरम्यान माणेकशॉ हे भारताचे लष्करप्रमुख होते. ते पंजाबमधील एका लष्करी अधिकाऱ्याच्याच घरी जन्माला आले. त्यांच्या वडिलांनी लष्करी अधिकारी म्हणून पहिल्या महायुद्धात ब्रिटिश लष्करात सेवा दिली होती.बर्मा येथे एका मोहिमेवर असलेल्या सॅम माणेकशॉ यांच्यावर जपानी सैन्यातील एका सैनिकाने गोळीबार केला होता. मशीननमधून झाडलेल्या सात गोळ्या सॅम यांच्या पोटात, आतड्यात घुसल्या.पण या हल्ल्यातून सॅम हे चमत्कारिकरित्या बचावले. त्यानंतर १९४६ साली त्यांना दिल्ली येथे लष्कराच्या मुख्यालयात नेमणूक देण्यात आली.

 

-सायरस आणि आदर पुनावाला

 

पुनावालांचं कुटुंब ब्रिटिशांच्या काळात 19 व्या शतकात पुण्यामध्ये आलं असं म्हटलं जातं. अनेक पारसी कुटुंबं ब्रिटिशांच्या वसाहतींमध्ये त्यांच्यासोबतच प्रशासनात, व्यापारात जवळकीचे संबंध प्रस्थापित करत स्थिर झाली. ज्या भागात ते स्थिर झाले तिथली नावं या कुटुंबांनी घेतली असंही आपल्याला दिसतं. स्वातंत्र्यपूर्वकाळात बांधकाम व्यवसायात या उद्यमी कुटुंबानं जम बसवला होता. राजे, ब्रिटिश अधिकारी, उद्योगपती असा सगळा 'एलिट' वर्ग घोड्यांच्या शर्यतीशी जोडला गेला होता. त्यामध्ये जम बसवून पुनावालांच्या साम्राज्याची पायाभरणी झाली. भारतातील श्रीमंत लोकांसाठी एखादी गोष्ट तयार करण्यापेक्षा भारतातील सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाची वस्तू आपण तयार करायला हवी आणि त्यातूनच पुढे सिरम इंन्स्टिट्यूटची स्थापना सायरस पूनावाला यांनी केली. सिरम सध्या जगातील सर्वाधिक लशींचे डोस निर्माण करणारी कंपनी आहे.

 

सचिन कृष्णा तळे

 

 

 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale