Monday, 17 July 2023

परिचय - सचिन तळे

 नाव - सचिन कृष्णा तळे

पत्ता - तिरुपती निवास,लेन नंबर , सुखसागर भाग १, कात्रज , पुणे

शिक्षण - बी कॉम

दूरध्वनी – ७७०९०९९६४६

ब्लॉग  - https://sachinktale.blogspot.com/

राजकीय सत्तेशिवाय तुम्ही लढू शकत नाही म्हणून मार्च २००९ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सांगली जिल्हा सह संपर्क प्रमुख म्हणून पदभार स्वीकारत एका राजकीय प्रवासाला सुरवात झाली. २००९ मध्ये सचिन तळे यांच्या नेतृत्वखाली सांगली समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील आंदोलन यशस्वी झाले आणि जिह्ल्यातील ४२ हजार ५०५ विद्यार्थींना २८ कोटी ४९ लाखाचा धनादेश वाटप झाला. शाळेची फी वाढ असो किंवा शाळेवरील अनधिकृत टॉवर तर कधी शाळेत घडलेल्या विनयभंगाच्या घटना सचिन तळे यांनी आवाज उचलून धरला. मुंबईतील ग्रंथालय वाचवण्यासाठी "ग्रंथालय वाचवा, वाचन संस्कृती जपा" हि मोहीम राबवली. विद्यार्थी वर्गांसाठी अनेक उपक्रम राबवून मुंबई उपनगर अन सांगली जिल्ह्यात

 राज्यातील ३८ हजार ४८ शाळांमध्ये स्वयंपाकगृह बांधण्यासाठी २००८ -०९ या वर्षी केंद्रातून २२८ कोटी २८ लाख मंजूर झाले परंतु काही कारणास्तव हि योजना तशीच पडून होती. सचिन तळे यांनी त्या योजनांचा पाठपुरावा केला आणि २०१६ मध्ये हि योजना पूर्ण झाली.

  माहितीच्या अधिकाराखाली अनेक माहिती गोळा करून सरकार दरबारी बसलेल्या अधिकारी वर्गाला प्रश्न विचारायचं काम सचिन तळे यांनी केले. महापालिकेचे १० मंडई खाजगी बिल्डरच्या घश्यात पालिकेने टाकली यावर असो किंवा मिठी नदीवरील अतिक्रमणांचा विषय असो किंवा पालिकेतील १० हजारी गुणवंतेचे कौतुक असो किंवा पुण्यातील ऐतिहासिक घोरपडे घाट सुशोभीकरण असो. अश्या अनेक महत्वपूर्ण विषय सचिन तळे यांनी त्यांच्या कार्यकाळात हाताळले. पुण्यातील बसमध्ये गरोदर महिलांसाठी राखीव सीट असावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले.

 पुण्यातील शुक्रवार पेठेतील साहित्य चपराक च्या साप्ताहिक आणि मासिकातून त्यांचे लेख अन कविता प्रकाशित होऊ लागल्या. हळू हळू हा साहित्य प्रवास चित्रपट श्रुष्टि कडे वळला अन " कन्फयुज " या मराठी चित्रपटात गाणी त्यांनी लिहिली तर " डॉ. तात्याराव लहाने " या चित्रपटात अलका कुबल यांच्या स्वरात चित्रपटाचा शेवट लिहिला. "कस्तुरी" ह्या प्रकशित झालेल्या मालिकेची १५ एपिसोड लिहून पूर्ण केले.

 अनेक वृत्तपत्रातून साप्ताहिकातून मासिकातून त्यांच्या कविता , लेख , पुस्तक परीचय, मुलाखत प्रकाशित झाले. दैनिक पुण्य नगरीतून संस्था परिचय हा सदर गेली दोन वर्ष त्यांनी चालवला. सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकावर गद्य पद्य लिखाण तसेच "रंगा" या नावाची एक कादंबरी लिहून पूर्ण झाली आहेनोकरी संभाळून समाजसेवा आणि स्वतःच छंद आवड जोपासत सचिनजी यांचे कार्य चालूच आहे.

 चित्रकार , लेखक , कवी , गीतकार तर कधी सामाजिक अन राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख समाजात निर्माण होत गेली. अश्या ह्या चळवळ्या धडपड्या कार्यकर्त्याचे पहिले पुस्तक १५ ऑगस्ट २०२३ रोजी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशित झाले. "दरवळ मराठी साहित्य संस्थांचा " या त्यांच्या पहिल्या मराठी पुस्तकाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,अन वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे शुभेच्या संदेश देखील मिळाला.


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale