Thursday, 20 July 2023

भारताच्या “सीमा” आज सुरक्षित आहेत का?

 

भारताच्या “सीमा” आज सुरक्षित आहेत का?

 

भारतीय गणराज्यात २८ राज्यांपैकी १७ राज्य हे दुसऱ्या देशांच्या सीमांना लागून आहेत. भूसीमा आणि जलसीमा अश्या दोन प्रकारा पैकी भारताला १५२०० किमी चा भूसीमा लाभला आहे. बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भुटान आणि अफगाणिस्तान हे प्रामुख्याने आपल्या देशाच्या सीमेवरील देश. ह्या शेजारील देशांपैकी काही देशांची मानसिकता आणि आपल्या बद्दल असणारे त्यांचे मनसुबे हे जगजाहीर आहेत. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आपल्या देशात आहेत परंतु या विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य अन ह्या भारताची जागतिक स्तरावर होणारी प्रगती शेजारील देशांना न आवडणारी आहे. त्यामुळे भारताच्या देशांतर्गत वातावरण कसं ढवळून काढता येईल ह्याचा ते सदैव प्रयत्न करत असतात. 'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय. मग जो तेजात रममाण झालाय त्याला विचलित कसं करता येईल हाच त्यांचा मुख्य हेतू आहे.

 

सर्वगुण संपन्न असा असलेल्या भारताच्या सीमा आज सुरक्षित आहेत का? हा गंभीर प्रश्नचिन्ह आज पुन्हा उपस्तिथ होत आहे. साहजिकच हा प्रश्न आज सर्व भारतीयांना पडला पाहिजे. कारण भारतात कोणीही सहज येऊ शकत. ह्याच जिवंत आणि ताज उदाहरण म्हणजे "सीमा हैदर" ची पाकिस्तानातून नेपाळ मार्गे भारतात प्रवेश. एक २२ वर्षाची पाकिस्तानी महिला सोबत चार लहान मुलांना घेऊन भारतात नोएडा येथे येते, काही दिवस काही महिने ती सहज राहते. ना तिची चौकशी होते ना विचारपूस. पण जेव्हा तिच्यावर बातम्या रंगू लागतात चर्चा होते, तिच्या प्रेम कहाणीला चित्रपटातील कथेशी जोडून रंगून सांगितलं जात, तेव्हा तिची खरी ओळख जगासमोर येते. तिची विचारपूस होते. तिला अटक होते. तिचा नवरा, तिच्या साठी धमकी देणारे शस्त्र धारी आतंकवादी, पाकिस्तानी मीडिया आणि लोकांचे जनमत हे सर्व काही असं दाखवलं गेलं जस काही सीमा हैदर च्या बाबतीत पाकड्यांचे कोणतेच षडयंत्र नाही. सीमा हैदर शी निगडित जे जे कागदपत्रे आणि पुरावे मिळत चालले ते सर्व संशयात्मक आहेत. तिचे नातेवाईक हे पाकिस्तान सैन्यात देखील आहेत अशी माहिती समोर येतीय. जर तिचे आतंकवादी संघटनेशी काही संबंध असतील तर तिची सखोल चौकशी झालीच पाहिजे पण त्याआधी तिला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पहिजे. विना कागदपत्र अनधिकृती पणे लपून देशाची सीमा ओलांडणे हा गुन्हा आहे. सीमा हैदर प्रकरणातून हे सिद्ध होतंय कि नेपाळ आणि पाकिस्तान च्या सीमा मजबूत नाही. तिथे हवी तशी चौकशी केली जात नाही. आज न जाणे सीमा हैदर सारखे कित्येक पाकिस्तानी भारतात राहत असतील, येत असतील.

 

नेपाळ, भूटान आणि म्यानमारच्या सीमांवर लोक सहज ये-जा करू शकतात. त्यात बांग्लादेशच्या सीमेतून घुसकोरी च्या घटना जास्त दिसून आलेत. पुराव्या सहित काहींनी हे सिद्ध केलंय कि भारताच्या सीमा ओलांडून भारतात सहज येता येत. त्यात बांग्लादेश मधील नागरिकांची संख्या जास्त आहे. आपल्या पुण्यात देखील काही बांग्लादेशी नागरिकांना पकडून त्यांच्यावर कारवाई झाली आहे. घुसखोरांना भारतात शिरण्यापूर्वी ‘उडिया, ‘बंगाली, ‘असमिया आणि ‘हिंदी भाषा शिकवण्याचे  केंद्रेही उभारण्यात आले आहेत. घुसून आलेले प्रथम पडीक सरकारी जमिनींवर तळ ठोकतात व स्वस्त मजूर म्हणून शहरात लोकप्रिय बनतात. या घुसखोरांमुळे होणारा आर्थिक लाभ पाहता, शासकीय यंत्रणेला लाच देऊन त्यांना तेथे स्थायिक होण्यास कंत्राटदार व व्यापारी साह्यभूत ठरतात. कालांतराने त्यांच्याकडे भारतातील सर्व सरकारी कागदपत्रे तयार होतात.

 

महिलांना लव्ह जिहाद च्या नावाखाली त्यांना पळवून नेणे व अवैध व्यापार करणे इत्यादी घटना अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्या बहुसंख्य गावात करत आहेत. तिरंगा जाळणे, राष्ट्रीय सणात दहशतीचे वातावरण पसरवणे, घरफोड्या, चोर्‍या अश्या घटनेत हि घुसकोरी केलेले आढळून आलेत.  कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते, हा पहिला परिणाम आहे. तर देशातील कामगारांच्या पोटावर पडणारा पाय हा दुसरा परिणाम. स्वस्त दरात काम करणार्‍या बांगलादेशींना जेव्हा येथील व्यापारी व कंत्राटदार जवळ करतात, तेव्हा भारतीय मजूर मात्र बेरोजगारीच्या आणि उपासमारीच्या संकटात सापडतो. संपूर्ण भारतात घुसून बसलेल्या बांगलादेशींचा, आपल्या देशावर पडणारा आर्थिक बोजा हा आणखी एक स्वतंत्र परिणाम आहे. त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

 

भारत आणि बांग्लादेशच्या सीमेवरची घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर २०१९ मध्ये एक अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. सीमेवर स्मार्ट फेन्सिंगला सेन्सर बसवलेले आहेत. यामध्ये डाटा नेटवर्क, ओएफसी केबल, डीएमआर कम्युनिकेशन, दिवसरात्र हालचाली टिपणारा कॅमेरा ही सगळी यंत्रणा आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा सीमा सुरक्षा दलाच्या कंट्रोल रूममध्ये सगळी माहिती पोहोचवते. एखादा अतिरेकी भारतात काही घातपात करतो तेव्हा त्याला भारतातले पत्ते, महत्त्वाची ठिकाणे, वाहतुकीच्या सोयी, पासपोर्ट, मोबाईल कार्ड, फोन, राहण्याची जागा इत्यादी गोष्टी आपोआप मिळत नाहीत. कोणी तरी स्थानिक व्यक्ती त्यांना मदत करत असतेच, माहिती देत असते. म्हणूनच या घातपाती कारवाया यशस्वी होतात. घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांना त्यांची ओळख पटवून त्यांच्या देशात परत पाठवले पाहिजे आणि या लोकांना भारतात राजकीय आणि अन्य सर्व प्रकारचा आश्रय देणार्‍यांविरुद्ध, मग ते राजकीय नेते असले तरी, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. खरंतर भारताचे शासन अशा घसुखोरांना मदत करते. त्यांना रेशनकार्ड व निवडणुकीचे ओळखपत्र मिळवून देण्याचे काम आपलेच अधिकारी करतात. पाच हजारांचे ‘पॅकेजदिले की, त्याला बांगलादेशातून उचलून भारतीय शहरापर्यंत सुखरुप आणण्याचे सारेच काम उघड पणे केले जाते. आज भारतात राहत असलेली मुस्लिम लोकसंख्या हि पाकिस्तान पेक्ष्या जास्त आहे. भारतीय मुस्लिमांना भडकावून त्यांना दंगलीस प्रोत्साहन देण्याचे कार्य हीच मंडळी करतात. भारतात अशांतता निर्माण करून भारताचे लक्ष्य विचलित करण्याचे कार्य असो किंवा भारताची प्रतिमा खराब करण्याचे कार्य असो हि मंडळी ह्यात माहीर आहेत. म्हणून आपण आपल्या शेजारी, आपल्या गावात कोण नवीन व्यक्ती राहत असेल तर त्याची माहिती ठेवणे गरजेचे आहे. सीमेवर आपले सैनिक आहेतच पण नागरिकांनी सतर्कता दाखवली पाहिजे नाहीतर सीमा हैदर अन कसाब सहज भारतात भारतीय नागरिक म्हणून देशांतर्गत धार्मिक द्वेष पसरू शकतात. म्हणून सावधान हिंदुस्थान. 

 

सचिन तळे 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale